लीव्ह इन रिलेशनशिप

Submitted by नीतु on 20 February, 2012 - 23:29

लिव्ह इन रिलेशनशिप या विषयाला नागपूर मध्ये अरविंद गोडबोले या ज्येष्ठ नागरिकाने वाचा फोडली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप असावी असे त्यांना वाटते. यासाठी त्यांना सगळीकडून भरगोस प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या संस्थेचा सभासद होण्यासाठी बरेच जेष्ठ नागरिक उत्सुक आहेत. आपल्या माय बोलीकरांची याबाबत काय मते आहेत? आपण आपल्या आई वडीलांना किंवा घरातील अन्य जेष्ठ नागरिकांना या रिलेशनशिन मध्ये बघू शकाल का? ही केवळ एक चर्चा आहे. माझ्या मते या वयात अशी रिलेशनशिप ठेवण्यापेक्शा त्यांनी रजिस्टर लग्न करावे. काय आहेत आपले विचार जरुर लिहा.

गुलमोहर: 

मला वाटते एक समाजमन म्हणून 'वुई शूड ग्रो अप नाऊ'.

प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य व व्यक्तीस्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. संस्कृतीच्या आणि रूढींच्या बंधनात राहणे आजच्या अतीवेगवान जगात अशक्य होऊ लागले आहे. 'लोक काय म्हणतील' म्हणून काही करणे कमी व्हायला पाहिजे / थांबायला पाहिजे.

उदाहरणार्थ, व्यक्तीशः, माझी आई गेल्यानंतर माझ्या ८० वर्षाच्या वडिलांना मी अशा एखाद्या रिलेशनशिपमध्ये पाहू शकेन की नाही या प्रश्नाचे उत्तर 'हो' देणे हे माझ्याही बुरसटलेल्या मनाला थोडे अवघडच आहे. पण मी माझ्याकडून तरी प्रयत्न करायलाच हवा. (यात वडिलांची अशी काही इच्छा आहे असे सांगायचे नसून एक उदाहरण दिले. पण उद्या जर खरंच ते आम्हाला म्हणाले की त्यांना तसे करायचे आहे तर आर्थिकदृष्ट्याही ते सक्षम असल्याने आम्ही कोण ऑब्जेक्शन घेऊ शकणार? समजा नसले आर्थिकदृष्ट्या सक्षम तरीही आम्ही हरकत घेता कामा नये असे म्हणायचे आहे). Happy

-'बेफिकीर'!

माझ्या पूरते याचे उत्तर 'हो' असे असेल .
अर्थात नविन व्यक्ति बरोबर adjust करायला थोडा वेळ लागेल . . एखाद्या प्रसंगी "माझे/झी आबा/जी असते/ती तर असे नसते वागले" असे विचार सुद्धा येवू शकतात. पण 'लोक काय म्हणतील' ?? .. .. म्हणून मि 'नाहि' म्हणतो . . असे नसवे (- हे माझे मत).

बापरे !!! खुप विचार करायला लावणारा धागा. कौतुक तुमचं.

खरच हा विचार केला न्हवता कधी. माझे वडिल जावुन २ वर्षे झाली. आई एकटीच रहाते. ती त्यामानाने तरुण आहे ( ६३-६४). तब्येत नरम गरम असते कारण तीला क्रॉनिक डायबेटीस आहे. मी तिला इतर कोणा सोबत लिव्ह इन रीलेशन शीप ह्या प्रकारात कदाचीत बघु शकणार नाही. नुसती मैत्री चालेल. पण घरात एकत्र रहाण..... ह्या करीता मलाच थोडा वेळ जावु द्यावा लागेल. पण तिने जर असे काही प्रपोज केलं तर उडवुन मात्र लावणार नाही. हेच जर कम्युनीटी लिविंग असेल तर माझी एका पायावर तयारी आहे. म्हणजे एका संकुलात रहाणं असेल जे फक्त सीनीयर लोकांसाठी असेल, अशा ठीकाणी सगळ्यां नी एक्मेकात मिसळुन रहाणे असेल तर ठीक आहे.

मला नाही वाटत ह्या प्रकाराला ती ही कधी तयार होईल. मुळात तीला माणसांची फारशी सवय नाही. उलट एकट रहाण स्वतंत्र रहाणं आवडतं. तसाच ती बाबां च्या जागी दुसर्‍या कोणाला पाहिल ही शक्यता कमी वाटते. कारण बाबा तिचा लहानपणा पासुनचा मित्र होता. त्यांच रेलेशन फार वेगळं होतं. नंतर नंतर बाबा आणि ती एकमेकांना एकमेकांची पुर्ण स्पेस देत होते. एकामेकांच्या आयुष्यात ढवळा ढवळ न्हवती. त्यामुळे ती कदाचीत मैत्री ठेवु शकते पण लिव्ह इन रेलेशन कठीण वाटते आहे. कारण मुळात एखाद इतर माणुस जरी रहायला आलं (अगदी तिची आई सुध्धा) तरी तीच शेड्युल बिघडुन जात.

मला वाटते लिव्ह इन रेलेशन शीप ला लोक तयार होत असतिल, कारण त्यात एकमेकांचा फक्त सहवास मिळणे येवढेच अपेक्षित आहे. लग्न केल तर लीगल भानगडी खुप होतात. मग मुलांचे हेवे दावे रोष, ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. उदा. जो अश्या उतार वयात लग्न करेल त्याची/तिची खुप प्रोपर्टी असेल तर मग ती बायको/नवर्‍याला जाईल. मग तिकडे भांडणे, गैरसमज ह्या प्रकारांना वाव मिळेल. म्हणजेच आहे त्यात नवा हक्क निर्माण होइल.

लग्न करण्या पेक्षा मी अशा रहाण्याला पसंती देइन.

मोहन की मीरा,

धन्यवाद, संप्पती साठी ते विल करु शकतात. तिला संपत्तीत वाटा द्यायलाच हवा असे नाही. आधी या गोष्टी ठरवता येऊ शकतात.

नीतु

एक वकील व सीए म्हणुनच मी हे सांगते आहे. मी एका बील्डर कडे मी गेली १२ वर्षे काम करत आहे. प्रॉपर्टीची लफडी आम्ही भरपुर पाहिली आहेत. विल हे लोकांना वाट्तं की शेवटचा शब्द आहे. पण नाही तसं नसतं वील कधीही च्यालेंज होवु शकतं. मुख्यत्वे अशा उतार वयात लग्न केलेल्या परिस्थीतीत तर विल नक्किच च्यालेंज होत. कारण ती प्रॉपर्टी करण्यात त्याच्या म्रुत स्पाउस चा सहभाग असतो. मग मुलं हक्क सोडायला तयार नसतात. ( आमच्या चुलत घरात सेम प्रकार सुरु आहे)

जरी ती प्रॉपर्टी त्या माणसाच्या स्वकष्टार्जीत असेल तरी मुलं त्यात हक्क मागु शकतात. नीदान कोर्टात तरी नकी जावु शकतात. त्यात मग त्या नव्या आई/वडिलांच्या अवस्थेचे काय? हे म्हणजे विकतचं दुखणं. त्या पेक्षा उतार वयात लीव्ह इन रीलेशन शीप मध्ये राहिले तर हक्क निर्माण होत नाहीत. सहवास मिळतो. आपल्या टर्म्स वर आपण राहु शकतो.

हे सर्वस्वी माझ्या अनुभवांतुन आलेले आहे. कारण आमच्या कडे अशा अनंत केसेस येतात. हा फक्त लीगल अँगल आहे. भावनीक बाजु सर्वस्वी वेगळी आहे.

>>माझ्या पूरते याचे उत्तर 'हो' असे असेल .
अर्थात नविन व्यक्ति बरोबर adjust करायला थोडा वेळ लागेल . . एखाद्या प्रसंगी "माझे/झी आबा/जी असते/ती तर असे नसते वागले" असे विचार सुद्धा येवू शकतात. पण 'लोक काय म्हणतील' ?? .. .. म्हणून मि 'नाहि' म्हणतो . . असे नसवे (- हे माझे मत).

चारुदत्त यांना अनुमोदन.

अतिशय वेगळा पण, चांगला विषय --- चांगला ह्या साठी की कदाचित आपणही उद्या ह्यामधे असू. आज सुपात आहोत, उद्या जात्यात येऊ शकतो.

पण खर सांगायच तर, थोड जड जातय हे स्विकारायला --- हो किंवा नाही म्हणण लगेच शक्य होणार नाही पण सकारत्मक विचार जरूर करेन.

खरतर एका विशिष्ठ वयानंतर प्रत्येक व्यक्त्तीची विचार सरणी ठाम बनलेली असते, पुर्वायुष्यात बर्‍याच तड्जोडी केलेल्या असतात किंवा कराव्या लागलेल्या असतात --- ह्या सर्व गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे - लिव्ह इन रिलेशनशिप मधे रहाण्याचा विचार करणार्‍यांनी आणि त्यांना अनुमोदन देणार्‍यांनी Happy

पण खर सांगायच तर, थोड जड जातय हे स्विकारायला --- हो किंवा नाही म्हणण लगेच शक्य होणार नाही पण सकारत्मक विचार जरूर करेन.>>> अनुमोदन सुरश.. Happy

याबाबतीत बर्‍याच वेळा काही बाही वाचनात येत असल्याने अगदी खोलवर विचार करून झालेला आहे.
आमच्या आईबाबांपैकी कुणावरही अशी वेळ आली (अशि वेळ येण्याच्या व योगटात ते आत्ता आलेत) आणि त्यांनी एखादा जीवनसाथी पाहिजे म्हटलं तर आम्ही नक्कीच 'हो' म्हणू. अर्थात त्यांच्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी समोरच्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करून. त्यांनी कमावलेल्या पैशांवर त्यांचा हक्क आहे म्हणून त्यांना ते पैसे आपल्या नव्या साथीसाठी वापरायचे असतील तरी चालेल. लग्न करावं कि असंच राहावं हि त्यांची मर्जी. जर लग्नच करायचं असेल तर रजिस्टर काय नी धार्मिक काय ,काय फरक पडतो ?
आई,बाबा,सासूसासरे यांपैकी कोणीही असा पर्याय निवडला तरी त्यांची आमच्यावर असलेली जबाबदारि कमी होणार नाही. उलट त्यांच्या आरोग्याची तेव्हाही काळजी घेऊ आणि खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा असेल तर खर्चही आम्ही करू. इतकेच नव्हे जर त्यांच्या साथीबरोबर त्यांची खूप जास्त अ‍ॅटॅचमेंट असेल आणि आम्हाला साथीचं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व पटलं असेल तर मी त्यांच्यासुद्धा आरोग्याचा खर्च,जबाबदारी पार पाडेन.

दोघांच्याही आईवडिलांनी इतके कष्ट करून वाढवलंय की त्यांच्या सुखासाठी असं काहिही केलं.मान्य केलं तरी कमीच.

अर्थात.. हो!

प्रत्येकाने स्वतःचे आयुष्य कसे/कोणासोबत घालवावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. (असे मी मानते) तसेच लिव्ह इन रीलेशनशिपला वयाचे बंधन नसावे. त्यामुळे जर तरूण्/तरूणी सर्रास लिव्ह इन मध्ये राहु शकतात, तर वयस्क व्यक्ती हा पर्याय निश्चितच स्वीकारू शकतात. आणि समाज त्याला आडकाठी करू शकत नाही, रॅदर करू नये. हेमावैम.

ही गोष्ट एकदम पचवायला जड आहे हे खरंच. पण logically विचार केला तर वाटतं की काय हरकत आहे? त्यांना हक्क आहे हे ठरवायचा की त्यांना काय करायचं आहे.

साती, अगदी छान लिहीलंय. अनुमोदन.

साती, पोस्ट आवडली. +१००.

माझे उत्तर हो असे आहे आणि उतार वयात सोबत शोधताना वर्षभर तरी लिव इन केल्याशिवाय लग्न करु नये हे माझे स्पष्ट मत आहे.

अजून काही पर्याय जर लिव्ह इन रिलेशनशिप किंवा लग्न नको असेल तर आपल्यासाऱख्या अजून सहचारिणी जमवून जिचे घर मोठे असेल तिच्याकडे सर्वांनी मिळून रहाणे व खर्च वाटून घेणे. किंवा दोन तीन जोड्प्यांनी एकत्र रहाणे. हा नवीनच पर्याय आहे. पण विचार करण्यासारखा आहे.

स्वीकारायला नक्कीच जड जाईल. पण समजा त्यातील एक व्यक्ती जर खूप आजारी झाली, अन्थरुणाला खिळली, तर काय? पुन्हा नव्या एकत्र कुटूंबात राहणे,जुळवून घेणे, स्त्रीला नक्कीच कठीण जाईल. ते उतारवयात सासरी जाण्यासारखच झाल ना!

साती आणि स्वाती२ +१.
लिव्ह इन केल्याशिवाय लग्न करू नये हे एकदम पटले.

मी माझ्या सगळ्या जवळच्या ज्येष्ठ नातेवाइकांना याबाबतीत पाठिंबा देईन, नक्कीच.

मला आठवतय, कि इथे पुर्वी अशी एक समस्या मांडली होती. तारुण्यातल्या अशा
नात्यासंबंधी सविस्तर चर्चाहि झाली होती.

याबाबतीत माझे काहि मुद्दे.

१) आज जे ५०/६० वर्षांचे आहेत, त्यांची उमेदीची वर्षे खुप कष्टात गेली आहेत. कायम
हौसमौज टाळून, मुलांसाठी, घरासाठी राबावे लागले आहे. होममेकर स्त्री असली तर
आर्थिक स्वातंत्रही फारसे नव्हते.
कधीकधी तर जोडीदारालाही सहन करावे लागलेले असते. अशावेळी जर मृत्यूने ताटातूट झाली असेल, तर मागे राहिलेल्या जोडीदाराला खुपदा सुटका झाली, असे
वाटू शकते. त्या काळात त्यांना मोकळीक देऊन त्यांचे निर्णय घ्यायला, मदत करणे
हेच आपण करु शकतो.

२) या वयातील माणसे नेहमीच आपल्याला उपलब्ध होती, त्यामूळे आपल्या मनात
त्यांच्याबद्दल मालकी हक्क निर्माण झालेला असू शकतो. त्यांनी जर कुठे घराबाहेर मानसिक आधार शोधला, तर कदाचित आपण याच भावनेतून विरोध करत असू.

३) पण कधी कधी, जोडीदार मात्र आपल्याला तितकासा विश्वास ठेवण्यासारखा वाटत
नाही. (इथे मांडलेली व्यथा अशीच होती. त्या वयस्क स्त्रीने एका तरुण मूलाशी
संसार मांडला होता.) असे नाते असूच शकत नाही, असे मी म्हणत नाही. पण दुसर्‍या
व्यक्तीचा हेतू मात्र तपासून घेऊन, आपल्या नात्यातील व्यक्तीला सावध करणे,
गरजेचे असते. तरीही जर आपल्या नात्यातील व्यक्तीला असे नाते जोपासायचेच
असेल, तरीही तिला तोडू नये असे माझे मत आहे. आपली मुलगी, जर आपल्या
मनाविरुद्ध विवाह जमवत असेल, तरी तिला त्या विवाहानंतरही मानसिक आधार
द्यावा, अशा मताचा मी आहे. आणि हेच मत मी इथे लागू करेन.

४) आपल्या नात्यातील व्यक्तीने जर असे घराबाहेर नाते जोपासायचे ठरवले तर
मला वाटते, आपल्याला आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीला,
मी घरात अडगळ आहे, मी कुणालाच नको आहे, असा विचार करायला भाग पाडतो
आहोत का ? आपल्यातला संवाद खुंटलाय का ? असे स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
असा संवाद असेल तर, ती व्यक्ती देखील आपला मनोदय सर्वांना सांगून, चर्चा
करेल.
ही झाली भावनिक बाजू. आर्थिक बाजूचा मीराने योग्य तो परामर्ष घेतला आहेच.

>>आपल्या नात्यातील व्यक्तीने जर असे घराबाहेर नाते जोपासायचे ठरवले तर
मला वाटते, आपल्याला आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीला,
मी घरात अडगळ आहे, मी कुणालाच नको आहे, असा विचार करायला भाग पाडतो
आहोत का ? आपल्यातला संवाद खुंटलाय का ? असे स्वतःला विचारणे गरजेचे आहे.>>
हे पट्ले नाही. अवती भवती मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे वगैरे जिव्हाळ्याची माणसे असली तरी जोडीदाराची उणीव ती नाही भरुन काढू शकत. तशी अपेक्षा करणे हे दोन्ही बाजूनी चुकीचे. अपत्याशी/नातवंडाशी असलेल्या नात्याचे रंग वेगळे आणि जोडीदाराशी असलेल्या नात्याचे रंग वेगळे. त्यामूळे आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवण्यासाठी नव्याने जोडीदार शोधल्यास इतर नाती त्यांच्या दायित्वात कमी पडली असे मानणे मला तरी पटत नाही. जोडीदार हवाय म्हणून जोडीदार शोधावा. मुलं विचारत नाहीत म्हणून जोडीदार शोधणे हा पर्याय सशक्त नाही वाटत.

माझ्या मते अशा लोकांनी रीतसर लग्न करावं आणि समाजाने ते स्वीकारावं. (दुसरा भाग जास्त अवघड आहे आपल्याकडे अजूनही.)

या विषयावर मी एक कथाही लिहिली होती. (ही रिक्षा नाही कारण ही खूप जुनी कथा आहे :))

http://www.maayboli.com/node/10216

स्वाती२,
आपल्या समाजात तरी होममेकर स्त्रियांची कुटुंबात इतकी मानसिक गुंतवणूक असते, कि जोडीदाराची कमतरता नाही जाणवत. नवरा स्वर्गवासी झाल्यावर पण अशा स्त्रिया, आपले आयुष्य आनंदाने कुटूंबात जगू शकत. एकाकी पडलेले पुरुष मात्र सैरभैर होत.

व्यवसाय नोकरी करणारर्‍या स्त्री / पुरुषांच्या बाबतीत मात्र तेवढी गुंतवणूक नसते.
ते आपला व्यवसाय, कारकिर्द यात बरेच गुंतलेले असतात.

आणि पारंपारीक रीत्या, भारतीत स्त्री नवरा सोडून आणखी कुणाचा विचार जोडीदार म्हणून नाही करु शकत. कितीही क्रूर आणि साचेबंद वाटले तरी ते वास्तव होते. अगदी आता आता स्त्री अशा जोखडातून मुक्त झालेली दिसतेय.

माझ्या आजीच्या वयाच्या एका स्त्रीच्या बाबतीत मला दिसले, नवरा असताना सगळे
आयुष्य त्याच्याभोवती बांधलेले होते. कुठेही जास्त वेळ थांबायचे नाही, कुठे जास्त
दिवस रहायचे नाही. गाठीला पैसा नाही.
ते गेल्यावर मात्र तिच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आत्मविश्वास आला. हातात पैसा आल्यावर, मनाजोगता प्रवास (मग तो धार्मिक कारणांसाठी वा नातवंडाकडे जाणे एवढाच असला तरी ) करु लागली. पण तिने दुसर्‍या जोडीदाराचा विचार केला असता, असे नाही मला वाटत.

अर्थात हे माझे निरीक्षण.

>>ते गेल्यावर मात्र तिच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आत्मविश्वास आला
आयदानमध्ये उर्मिला पवारांनी याला 'रंडकीसूज' शब्द वापरला आहे. शब्द जुना आहे.

मला वाटते, लिव्ह इन त्यामुळे जास्त सोयीचे आहे. पटले नाही तर सहज वेगळे होता येईल, मालमत्तेचे कज्जे होणार नाहीत. मित्रमैत्रिणींच्या गटाने एकत्र राहणेही छान होईल..

दोनापेक्षा अधिक व्यक्तींनी रहायचा पर्याय पण एका मायबोलीकर सभासदानेच सुचवला होता. समान आवडीनिवडी असलेले, असे गट नक्कीच आनंदात राहतील.

दिनेशदा, जोडीदाराची गरज भासत नसेल तर प्रश्नच येत नाही. माझ्याही नात्यात जोडीदार गेल्यावर नातवंडात रमून गेलेले स्त्री/पुरुष आहेत. तसेच मुलगा/लेक यांच्याबरोबर न रहाता एकटे रहाणारे, नविन जोडीदार शोधायचा विचार न करणारेही आहेत.
मात्र एखादी व्यक्ती जेव्हा पुन्हा जोडीदाराचा विचार करते तेव्हा 'आम्ही सगळे व्यवस्थित करतो मग ही थेरं कशाला किंवा या वयात लग्न करायची वेळ आणली मुलांनी' असा विचार केला जातो ते पटत नाही.

आपल्या समाजात तरी होममेकर स्त्रियांची कुटुंबात इतकी मानसिक गुंतवणूक असते, कि जोडीदाराची कमतरता नाही जाणवत. नवरा स्वर्गवासी झाल्यावर पण अशा स्त्रिया, आपले आयुष्य आनंदाने कुटूंबात जगू शकत. <<<
हे एक प्रकारचे माइंड कंडिशनिंगच आहे. वस्तुस्थिती बोलून दाखवणे, कुणाला दिसू देणे हे शक्यच नसते अश्या स्त्रियांना. नाहीतर लगेच घाणेरडी लेबलं चिकटतात, अगदी पोटच्या पोरांकडूनसुद्धा त्यामुळे कमतरता जाणवत नाही, आनंदाने जगू शकतोय हे दाखवावेच लागते.

Pages