नीळा पक्षी

Submitted by पेशवा on 2 September, 2008 - 01:37

नीळा पक्षी
मिटून बसला
पंख उराशी
झेप झोपली,
निळाईचे ओघळ उरले
चिकट थारोळ्यात ...
रुतू बहराचे
थर थरावर
उजेडातला अंधार
नीळा पक्षी
जखम भोगतो
पाते सुखाचे जाड
शीळ सुजली
स्वप्ने सुजली
त्याचा सुजला साक्षात्कार

गुलमोहर: 

वाह ! पेशवा, फाऽऽऽरा दिवसांनी.
>>> निळाईचे ओघळ उरले
चिकट थारोळ्यात
सही !

    ***
    ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

    पेशवे???????? नक्की पेशवेच का?

    निळाईचे ओघळ उरले
    चिकट थारोळ्यात ...

    हे सुचक आहे, तु निळ्या राजकराणाला मरलेला चाबुक आहे का?

    असो नेहमी सारखिच, गुंतागुतीची.

    शीळ सुजली, स्वप्ने सुजली...

    .. अजुन ४-५ अन्तरे लिही मग कविताही सुजेल तुझी..

    Happy

    Happy

    अहो पेशवे, जरा अर्थ सांगा हो कवितेचा !

    काय गूढ अर्थ आहे कोणास ठाऊक?पेशवे कविता जर उलगडून दाखवा ना!!!!

    डो़क्यावरुन गेले मालक. उलगडले तर आनंद मिळेल.

    काय उलगडणार आता ? पक्ष्याचे पन्ख उलगडण्यापल्याड गेलेले आहेत एवढाच अर्थ ..!