राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृश्चिक राशी - चंद्र रास ? -८ आकड्याचा चंद्र?
यांनी आशावाद आणि हट्ट यात फरक असतो हे लक्षात ठेवले तर त्रास कमी होतो. ठरवतो तसं होत नाही/ होणारच असं नाही हे बजावलं तर डिप्रेशन येईलच कसे.

स्वभाव म्हणून विचार करताना सूर्य रास ( पाश्चिमात्य पद्धत, तारखेप्रमाणे रास) पाहू नये.

@srd - वृश्चिक राशी - चंद्र रास ? >> विशाखा नक्षत्र - वृश्चिक रास
पत्रिके प्रमाणे आहे , इंग्रजी तारखे प्रमाणे नाही

चंद्राचा माणसाच्या मनावर तुफान प्रभाव असतो. म्हणूनच चंद्र रास महत्वाची मानली जाते. पत्रिकेतला अशुभ चंद्र मनाची अस्थिरता, चंचलपणा, जास्त हळवेपणा दाखवतो. प्रश्न कुंडली मांडतांना व्यक्ती समोर हजर असेल तर तिच्या मनाची अवस्था चंद्र दाखवतो. वृश्चिकेची माणसे वरुन कठोर वाटली तरी आतुन हळवी असतात. चंद्र आई व रवी पित्या स्वरुप मानतात. अजून बरेच आहे, पण वेळे अभावी थांबते, परत लिहीन.

मनुष्यास राजा करण्याची कुवत फक्त चंद्र ( अल्पवयीन किंवा लोकप्रियता यामुळे) आणि शनि (दीर्घकाळ, मुत्सद्देगिरी, दूरदर्शीपणा यामुळे ) यांचेकडे आहे. मंगळ हा किंचित काळ झटपट राजा करतो ते सैन्य, उठाव,मिलिट्री या पद्धतीने पण लगेच दूरही होतो.
गुरू,शुक्र,बुध काही कामाचे नाहीत.
मुख्यमंत्री हे पद संभाळायला लग्नी(प्रथमस्थानात) रवी+बुध फारच श्रेष्ठ.

नवरा:
चंद्ररास: कन्या
लग्नरास: धनु
सूर्यरास: सिंह

मी:
चंद्ररास: वृषभ
लग्नरास: धनु
सूर्यरास: तूळ

आता सांगा पाहू आमच्या घरात काय रामायण/महाभारत चालत असेल

अर्रे धनु लग्न मला फार आवडतं. आई बाबा दोघेही धनु लग्नाचे. अफाट मित्रसंग्रह. गप्पा, गप्पा, एकंदर घरात सकारात्मक वातावरण, पुस्तकांचा नाद.
माझं लग्न मिथुन अम्हणजे विवाहस्थान = धनु. त्यामुळे धनु रास मला मस्त सुट होते.

तुम्ही पर्यटन करता का आस्वाद. म्हणजे पर्यटनाची आवड तर आहेच दोघांनाही मला वाटतं. तुम्ही भरपूर मैत्रिणी असलेल्या व सोशल आहात बहुतेक.

सूर्यरास यापेक्षा सूर्य कुठल्या स्थानात आहे हे त्या व्यक्तीची प्रवृत्ती दाखवते. राशीपेक्षाही स्थानाप्रमाणे अधिक प्रभावी होतो.

'रामायण' होण्याचे कारण कन्या ही चंद्ररास वाणीवृत्ती दाखवते. बारीकसारीक हिशोबात अडकून राहाणारी. वृषभ रास -आली आहे संधी तर मज्जा करून घेऊ ही वृत्ती. त्यामुळे . . . .

बरोबर, नवरा फार तपशिलात अडकतो. त्याला सगळंच परफेक्ट लागतं. घरही अगदी चित्रातल्यासारखं 'नेहमी' हवं असतं. मी त्याच्या विरुद्ध आहे. बऱ्यापैकी 'चलता है' attitude. मग तो सतत घरात आवराआवरी करत बसतो. मला घर आवराआवरी करण्यापेक्षा स्वयंपाक करणे, जास्त महत्वाचं वाटतं. घर आहे, हॉटेल नाही, असं माझं मत.आवराआवरी is the least अँड लास्ट थिंग ऑन मय माईंड. पण त्याने खूप खटके उडतात.
पण नवरा खूप agressive आहे आणि मी नाही. ही थिंक्स बिग अँड आय थिंक अबाऊट स्मॉल pleasures. जर स्वतःच रेस्तरॉंट चालू करायचं ठरवलं तर तो MacDonaldस सारखं empire बनवायचं म्हणेल आणि मी बुटीक/classy (आमची कुठेही शाखा नाही) रेस्ट चालू करायचं म्हणेन.

सामो: हो, मला प्रवासाची प्रचंड आवड आहे. नवऱ्याला फारशी नाही.

>>>>बऱ्यापैकी 'चलता है' attitude. मग तो सतत घरात आवराआवरी करत बसतो. मला घर आवराआवरी करण्यापेक्षा ...
इथपर्यंत आपण डिट्टो आहोत पण त्यानंतर मात्र मी वाक्य असे पूर्ण करेन की मला घर आवराआवरी करण्यापेक्षा आराम, ब्राउझिंग, भटकंती, कॉफीशॉप ला जा कुठे मेटॅफिझिकल शॉपमध्ये चक्कर मार कुठे रोप विकत आण इअर रिंग्ज आण, लोळत लोळत पुस्तक वाच इ इ. महत्वाचे वाटते Wink Proud

>>>>>>>सामो: हो, मला प्रवासाची प्रचंड आवड आहे. नवऱ्याला फारशी नाही.
अरेच्च्या मला वाटले त्यांना जास्त आवड असेल कारण त्यांचा सूर्य हा ९ व्या घरात म्हणजे फॉरिन ट्रॅव्हल व एकंदर भटकंतीच्या घरात आहे .

मुख्यमंत्री हे पद संभाळायला लग्नी(प्रथमस्थानात) रवी+बुध फारच श्रेष्ठ.>> हायला भारीच की , वाट बघायला हरकत नाही म्हणजे Wink मेष लग्नरास, धनु चन्द्र रास.

मीही बुधादित्य बाराव्या घरात, गुरू शुक्र युती, चंद्र रास मीन, रेवती नक्षत्र, सूर्य रास कर्क ! एका मैत्रिणीच्या आजोबांनी माझ्या पत्रिकेत गूढ विद्या, वशिकरण,संमोहन अवगत होते वगैरे पण लिहिले होते, माणसं धार्जिण , लोक चटकन विश्वास ठेवतात, वाक्चतुर असतात, लवकर प्रभाव पडतो वगैरे, पण मला गूढ विद्या वगैरे फारच नकारात्मक वाटते म्हणून शिवाय अजिबात रूचीही नाही.

मी बुधादित्य बाराव्या घरात असणारे लोक बघितले तर अलिबाबाचे जॅक माह वगैरे आले , आधी संघर्ष आहे खूपच पण यश मिळतंच म्हणे!
आपण मिळून वाट बघू लंपन Happy

गेल्या १० वर्षापासुन तूळ राशीच्या व्यक्तींना पाऊल ठेवेल तिथे कटकट आणि निर्णय घेईल तिथे अपयश येतंय अशी परिस्थिती आहे. शनीची महादशा असल्यासारखं असेल, कि सर्व देवांची महादशा असेल कुणास ठाऊक.

nervousness , डिप्रेशन , self blame ह्याचा राशी शी काही संबंध आहे असा कोणाचा अनुभव आहे का ?

लग्न कुंडली , चलित कुंडली , राशी कुंडली , नवमांश कुंडली ह्यातली कोणती कुंडली कधी पाहतात ?
जन्म राशी मधली रास खरी कि लग्न कुंडली मधली रास खरी ? (जन्म रास - वृश्चिक , लग्न रास - मकर )

भविष्य व इतर बाबींकरता लग्नकुंडलीच बघीतली जाते. कारण लग्न म्हणजे प्रथम स्थानात जी राशी असते ती आपला जन्म होतांना पूर्व दिशेला उदीत ( प्रकट म्हणा हवे तर ) असते. उदा. लग्न कुंडलीत १ आकडा असेल तर मेष लग्न धरले जाईल.

नवमांश कुंडली ही लग्न कुंडली जर जमत ( लग्ना साठी वगैरे ) नसेल तर बघीतली जाते. कारण ती त्या सर्वाचा सार असते.

जन्म रास आणि लग्न रास एकच असेल तर ? त्याने राशीचे गुण-अवगुण एन्हान्स होतात का ? याबद्दल एक्स्पर्ट ओपिनियन काय आहे ?

आमच्या कुटुंबात आम्ही असे बरेच प्राणी आहोत.

Pages