तिचा वाढदिवस.

Submitted by किंकर on 10 February, 2012 - 23:01

तिचे वाढदिवस अजूनही स्मरतात
शुभेच्छांचे संदेश ओठावर थांबतात

कधी एका गुलाबाने डोळे तिचे बोलले होते
आज त्या सुगंधाने मन माझे विव्हळले होते

आजही तिचा वाढदिवस आला
डोळ्यांच्या कडा पाणावून गेला

अशाच एका वाढदिवशी,तिनेच मला भेट दिली होती
ज्यातून जीवनाची खरी ओळख,माझी मलाच झाली होती
वैशाख वणवा असून,ती दुपार शहारली होती.

आता ती नाही माझी,परक्याचे धन आहे
कधीच ओथंबून वाहणार नाही,असा एक आषाढ घन आहे.

भेट तिची स्मरता आठवतो,उन पावसाचा लपंडाव
धुक्याची झालर सारून,श्रावण सर घेते अंतरीचा ठाव.

आता ती नाही माझी, मन मनाला बजावते
आठवणींच्या कट्ट्यावर क्षणभर विसावते

विसरण्याचा अट्टाहास पण किती विचित्र आहे
आता तिचा वाढदिवस गतस्मृतींचे चित्र आहे

आता मी आठवणींचे कोंदण आज कोरतो आहे
आणि माझीच खरी ओळख पण विसरतो आहे

गुलमोहर: 

तिचे वाढदिवस अजूनही स्मरतात
शुभेच्छांचे संदेश ओठावर थांबतात

कधी एका गुलाबाने डोळे तिचे बोलले होते

आजही तिचा वाढदिवस आला
डोळ्यांच्या कडा पाणावून गेला

सुरेख, हळुवार कविता. प्रद्युम्नना अनुमोदन.

pradyumnasantu, श्यामराव, एम. कर्णिक , फालकोर - आपल्या मनापासूनच्या प्रतिसादासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार.

<<<अशाच एका वाढदिवशी,तिनेच मला भेट दिली होती
ज्यातून जीवनाची खरी ओळख,माझी मलाच झाली होती
वैशाख वणवा असून,ती दुपार शहारली हो<<<>>>
सुंदर! एकदम हळुवार, तरल कविता . पण ह्या ओळी लिहिताना मागे कोणी नाही हे पाहिलंत ना Wink

अशाच एका वाढदिवशी,तिनेच मला भेट दिली होती
ज्यातून जीवनाची खरी ओळख,माझी मलाच झाली होती
वैशाख वणवा असून,ती दुपार शहारली होती.

विसरण्याचा अट्टाहास पण किती विचित्र आहे
आता तिचा वाढदिवस गतस्मृतींचे चित्र आहे

आता मी आठवणींचे कोंदण आज कोरतो आहे
आणि माझीच खरी ओळख पण विसरतो आहे >>>>खूप छान.

किंकर ?

pradyumnasantu, प्रज्ञा१२३, शोभा १२३ ,- कवितेतील भरारी कल्पनेची असते , प्रत्येक ? ला उत्तर नसते. आणि हो प्रज्ञा १२३ - कविता स्फुरली कि मागे पुढे न पाहताच ती कागदावर येते.

Happy