Submitted by pradyumnasantu on 10 February, 2012 - 17:16
सहा बोटांचा हात
पाचांचा विश्वासघात
सहाव्याचा कोलाहल
सदा राहिला मनात
पाचांशी भांडलं
सहावं तुटून पडलं
मग त्याचं शल्य
फक्त हातात उरलं
अभागी त्या हातानं
गळा कसा घोटला
खरा घास एकाचा
पाचजणात वाटला
गुलमोहर:
शेअर करा
सहाव्या बोटाची(परिवात
सहाव्या बोटाची(परिवात उपेक्षीत राहिलेल्याची)व्यथा.खुप छान.
परिवारात उपेक्षीत
परिवारात उपेक्षीत राहिलेल्याची व्यथा>>क्या बात है फालकोरजी,
सुंदर कविता.
फालकोरजी, विभाग्रजजी आभार.
फालकोरजी, विभाग्रजजी आभार. कुटुंबात उपेक्षित राहिलेल्यांची व्यथा हे एक उत्कृष्ट परिमाण आपण माझ्या कवितेला जोडलेत. अतिशयच आनंद झाला. पांडव, कर्ण व कुंती यांची व्यथा या दृष्टीनेही या कवितेचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
अरे वा. सहाव्या पांडवाची
अरे वा. सहाव्या पांडवाची व्यथा! खूप छान कल्पना प्रद्युम्न. आवडली कविता.
खुप छान प्रद्युम्नजी
खुप छान प्रद्युम्नजी
छान. फारच सुन्दर. 'एकच तो घास
छान. फारच सुन्दर.
'एकच तो घास का
पाच बोटांना वाटला'
कल्पना छान आहे पण सहाव्याला का तोडले ?
महाभारत हा अनंतकाळ चालणारा
महाभारत हा अनंतकाळ चालणारा विषय आहे.
pbs: 'एकच तो घास का पाच
pbs:
'एकच तो घास का
पाच बोटांना वाटला
कल्पना छान आहे पण सहाव्याला का तोडले ?>>>>>>>>
>>>>>आभारी आहे. द्रौपदी खरी फक्त अर्जुनाची पण पांच पांडवांची झाली.
सहावा कर्ण अर्जुनकडून युद्धात मारला गेला.
छान कल्पना
छान कल्पना
छान आहे.......... महाभारतातले
छान आहे.......... महाभारतातले एक पात्र छान रंगवल आपण
छ्या सम्दी बोटं...आपलं पोटं
छ्या सम्दी बोटं...आपलं पोटं उपाशी की ओ!
छान कल्पना
छान कल्पना
छान माडलंय.
छान माडलंय.
ओह मला नावावरून वाटलं हृतिक
ओह मला नावावरून वाटलं हृतिक रोशनबद्दल कविता आहे. म्हणून वाचायला आले.
मलाही सहा बोटांच्या
मलाही सहा बोटांच्या माणसाबद्दल काही आहे असं वाटलं ( ह्रुतिकच आठवला)
मस्त लिहिलं आहे. तुम्ही खाली प्रतिसादात दिलेला संदर्भ न वाचताच कर्णाची व्यथा आहे हे कळलं. छान लिहिलं आहे.
कर्णाची व्यथा छान मांडली आहे.
कर्णाची व्यथा छान मांडली आहे. छान कल्पना.
कर्णाची व्यथा मांडायची ही
कर्णाची व्यथा मांडायची ही वेगळी कल्पना आवडली.
मला नावावरून वाटलं हृतिक
मला नावावरून वाटलं हृतिक रोशनबद्दल कविता आहे. म्हणून वाचायला आले. >> मी पण.
परंतु वाचताना कर्णाचा संदर्भ लगेच लक्षात आला. खूप आवडली.
खरा घास एकाचा
पाचजणात वाटला
>>
सुरुवातीला या ओळींचा अर्थ कर्णाच्या संदर्भात समजेना.
मग "द्रौपदी खरी फक्त अर्जुनाची पण पांच पांडवांची झाली." या स्पष्टीकरणानंतर अर्थ लागला. पण बाकी कवितेत कर्णाबद्दलचे कुंतीच्या मनातले शल्य अधोरेखित होत असताना शेवटच्या या ओळींमध्ये अर्जुनावर झालेल्या या अन्यायाचा उल्लेख का ते काही कळले नाही.
परंतु वाचताना कर्णाचा संदर्भ
परंतु वाचताना कर्णाचा संदर्भ लगेच लक्षात आला.
शेवटच्या या ओळींमध्ये अर्जुनावर झालेल्या या अन्यायाचा उल्लेख का ते काही कळले नाही. >>>>>>>>>>>> +१
निंबुडा, आबासाहेबः आपल्या
निंबुडा, आबासाहेबः आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
कविता लिहिताना ती सहा बोटांच्या हाताबद्दल म्हणजे कुंतीच्या व्यथेबद्दल लिहावी असे मनात होते. त्यानुसार पहिल्या कडव्यात पांडवांचा विश्वासघात करावा लागण्याचा उल्लेख आला आहे. युद्धात भावाकडून भाऊ मारला गेल्याबद्दल दुसर्या कडव्यात उल्लेख आहे, तर केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे एकाची द्रौपदी पाचात विभागली गेल्याची खंत तिसर्या कडव्यात.
पण कर्णाची व्यथा म्हणून कवितेकडे पाहिल्यास मात्र तिसरे कडवे अनाठायी व चुकीचे वाटतेच.
पुन्हा आभार..
मला फार आधी पासुन च कर्ण
मला फार आधी पासुन च कर्ण आवडतो अणि पांडव नाही . त्यामुळे खुप अवडली मला तरि कविता