Submitted by pradyumnasantu on 7 February, 2012 - 21:15
पोरी सगळ्या अशाच
पोटात एक ओठावर दुसरंच
सहजासहजी ओळखू येईल का?
आईच्या कुशीत हसू की हुंदका?
*
बापाकडून काही हवं तर
आईला मस्का मारतील
आईकडची मागणी असेल
तर बापाचे पाय चेपतील
*
नव-यासाठी जगापुढे
दुर्गा बनून लढतील
पण वडलांसाठी नव-यालाही
ओरबडून काढतील
*
आपली बहीण नेहमीच
असते जीव की प्राण
थोरला भाऊ पहायलाच नको
तो तर जगात महान
*
आई स्वैपांकात झीरो जरी
जगातली श्रेष्ठ सुग्रण असते
बाप शाळेत क्लार्क तरी
कलेक्टर असल्याचे भासते
*
तुमची असो वा माझी
बिदाईवेळी आसू काढतेच
मुलगी नसेल आपली तरीही
काळीज आपलं फाडतेच
*
गुलमोहर:
शेअर करा
फालकोरजी: शुभ प्रभात. साध्या
फालकोरजी: शुभ प्रभात. साध्या शब्दातली कन्या तुम्हालाही आवडेल.
खरंच प्रद्युम्न. आणि अशी ही
खरंच प्रद्युम्न. आणि अशी ही 'बंडल्स ऑफ जॉय' जन्माला आल्यावर हिरमुसले होणारे आईबाप करंटेच म्हणायला हवेत. अप्रतिम आहे तुमची कविता.
शुभ प्रभात.खुप खुप
शुभ प्रभात.खुप खुप आवडली.माझ्या अकरा वर्षाच्या कन्येने पहिल्या दोन कडव्यांचा अनुभव दिलाय.
खुप सुंदर
खुप सुंदर
तुमची असो वा माझी बिदाईवेळी
तुमची असो वा माझी
बिदाईवेळी आसू काढतेच
मुलगी नसेल आपली तरीही
काळीज आपलं फाडतेच
*
शेवटचं कडवं एकदम ..टचिंग ! हसता हसता डोळे आले झाले
मस्तच लेकी पुराण.
मस्तच लेकी पुराण.
छान.
छान.
सुंदर !!
सुंदर !!
खूप सुंदर!
खूप सुंदर!
सुंदर!!!
सुंदर!!!