फुल्याची कविता

Submitted by ट्यागो on 7 February, 2012 - 12:27

फोन आला
झुक झुक झुक
पत्र आले
झुक झुक झुक
मेसेज आला
झुक झुक झुक
मेल आले
झुक झुक झुक
तुझे लग्न ठरले
झुक झुक झुक
थंडी वाजते, पाऊस पडतो
कांदा वाळला, उस गेला
स्वप्न पडले, खड्डा पडला
झु्कु झु्कु झुकु झु्कु झुक झुक
आभाळमाया, काळीछाया
खालती ढग, वरती पाया
झुकु झुकु झुकु झुकु झुकु झुकु
मंत्र म्हटले
झुक झुक झुक
पाढे म्हटले
झुक झुक झुक
नवरी नटली
झुक झुक झुक
सुपारी फुटली
झुक झुक झुक
काळे औषध बाटलीबंद
पांढरे औषध पसाभर
निळे डोळे मनीम्याऊ
झोप नै येत अंगाई गाऊ
भूक लागली पालक पनीर
खिसा फाटला नाही फिकीर
दही चटणी डबा भरून
शब्द माझे बिलवर करून
डोळे साले भलते म्याड
थंडी वाजते सोंगे फार
चष्म्याच्या काचा दमट
दम्म मारो बाटली सकट
झु्कु झु्कु झुकु झु्कु झुक झुक
झु्कु झु्कु झुकु झु्कु झुक झुक
झु्कु झु्कु झुकु झु्कु झुक झुक
झु्कु झु्कु झुकु झु्कु झुक झुक
झु्कु झु्कु झुकु झु्कु झुक झुक
-फुल्या

गुलमोहर: 

सर्व बाजूंनी संकटे व वाईट बातम्या आल्यावर जग उलटेपालटे झाल्याप्रमाणे हताशपण येते. कवितेला एक सुंदर लय आहे, गती आहे. झुक्-झुक व फुल्यांमधेही भावना सामावल्या आहेत असे जाणवते. त्याही शब्दांप्रमाणे वाचता येतात. म्हणुनच कदाचित, शीर्षकही छान वाटले.

प्रगो, फुल्याची कविता कळायला आधी फुल्या समजून घ्यावा लागतो. तोच अजून नीट समजला नाही. Happy
बायदवे फुल्या, इतके दिवस कुठे फुल्या मारत बसला होतास ?

किरण्या, अरे तुरे केलय म्हणून बुजुर्ग असल्याचं सांगतोयस का ? मला तरी तो माणूस मित्र म्हणून भिडलाय आणि मैत्रीत वय आडवं येत नाही. तिथे अरे ला तुरेच लागतात. Happy

नाही रे.. !
हे दोघे वेगव्गेळे आहेत. इथं मी एक्स्ट्रा माहीती पुरवण्याचं काम केलं फक्त ! Biggrin

ट्यागो... बोल कि काहीतरी . इफ आय अ‍ॅम चुकिंग

फुल्या साहेब तरुण हरहुन्नरी कवी व लेखक आहेत. सध्या माबो संन्यास. कविता -आजुन ५-६ वेळा वाचुन कशी वाटली ते सांगते.