आश्विन पौर्णिमेची वाड्यात धूम असायची. सर्व 'ज्येष्ठ' मुला-मुलीना घरी आणि शेजारीपाजारी काही ना काही 'अश्विनी' मिळायची. दिवेलागणीच्यावेळी आम्ही सगळी 'नकटी' धाकटी दादा तायांच्या मागेमागे या घरातून त्या घरात, या वाड्यातून त्या वाड्यात...'अश्विनी' सुद्धा काय तर एखादी वही, पुस्तक, बिस्कीटचा पुडा असले काहीबाही.. सर्वात आधी घरी आई गौरीला ओवाळीत असे आणि हमखास एखादा ड्रेस 'अश्विनी' म्हणून देई. वाड्यातल्या अंधार्या खोल्यात निरांजनातल्या दिव्याने आई आणि बहिणीचा चेहरा उजळून निघे, उपडी मांडी घालून ईतर चिल्लर पार्टी तो सोहळा एकटक बघत बसायची... मग शेजारच्या दादा तायांना आई ओवाळी आणि छोटीशी भेट देई.. एक घर झाले की दुसरे घर.. शेजार पाजारच्या काकूपण अगदी मायेने ओवाळीत.. शेवटच्या घरापर्यंत तर गौरीच्या ओच्यात 'अश्विनी' ठेवायला जागाच उरत नसे. घरी आल्यावर नजर एकटक सगळ्या भेटवस्तूंवर्..मनात एकदम राग, द्वेष सर्वकाही दाटून यायचं. हीचे केवढे लाड सर्व भेटवस्तू तिलाच..मग उगाच काहीतरी कुरापत काढायची की आई लगेच काहीतरी खाऊ द्यायचीच..आणि पुढे २-३ दिवस एकएक वस्तू लंपास करायची...
गौरी माझ्याहून दिड दोन वर्षांनीच मोठी..तिला कधी ताई म्हटल्याचे आठवत नाही, नेहेमी नावानेच हाक मारायची..उन्हाळ्यात सुट्टीत गावी गेलो की तिकडच्या आयाबाया गेल्यागेल्या लगेच ताईसाहेबांचे मुके घेणार.. आजीपण ' गौरीमन्या कसा आहेस तू? वाळली ग बाय माझी' असे काहीतरी हमखास बोलणार्..ईथेपण आमचा नंबर लागायचाच नाही..पुन्हा एकदा आमची पुरी टम्म.. अशा गोष्टी लक्षात ठेवून मुद्दाम कुरापत काढायची आणि मग जोरदार भांडाभांडी
जरा वादळ शमते की परत भांडण्यासाठीच जणू समेट करायची..मारामारीत तर बर्याचवेळा असाकाही मार खावा लागे आणि आपटी खावी लागे..मार असा नाही पण मुलींची अशी खास अस्त्रे बोचकारणे, हात बोटे पिरगाळणे ई. ई. आपटी खाल्ल्यावर रडायला सुरुवात..बराचवेळ रडून झाले की आई जवळ घेई, मग आईला गौरीला एखादा फटका घालायला सांगायचे..आई आधी नाहीच म्हणायची पण मग नाईलाजाने लाडेलाडे एखादा फटका घालायची.. कधीकधी भांडणे अगदीच जोरदार झाली की आई म्हणे 'थांबा काठ्या देते २ म्हणजे अजून जोरात भांडता येईल'..मग मी म्हणायचा 'दे'..असे म्हटले की दोघे एकमेकांकडे बघत असू आणि मग हसत सुटू ....ते भांडण तिथेच संपे...
शाळेचे गॅदरींग, दिवाकर नाट्यछटा आणि ईतर एकांकीका स्पर्धा यात बहिणाबाई कायम भाग घेत आणि बक्षीसपण मिळवीत्.कधीकधी 'सकाळ' मधे नाव येई आणि मग एकदम मस्त वाटे. पेपरमधली तीच बातमी परत परत वाचायची.. नावाखाली पेन्सिलने रेघ ओढायची; कात्रण काढून ठेवायचे आणि शाळेत सर्व मित्रांना सांगत सुटायचे..शाळेची वर्ष संपत आली; दहावीला तर गौरीने हात दिला म्हणून गणितात पास झालो..भांडणे जवळजवळ संपलीच उरले फक्त एकमेकांसाठी जिवापाड प्रेम.. बी. एम. सी. सी. ला अॅडमीशन मिळाली, सी. एस. झालो, नोकरी लागली ह्या सार्या गोष्टींचा माझ्यापेक्षा जास्त आनंद तिलाच झाला..सकाळी कितीतरी वेळा शर्टला ईस्त्री करण्यासाठी तिला उठवायचे..रात्री झोपताना रोज चंपी करून घ्यायची... नोकरी लागली तरी खर्चासाठी तिच्याकडे कायम हात पुढे..एक ना अनेक...
गौरीच्या लग्नात तर किती रडलो..घरी आल्यावरसुद्धा किती बेचैन झालो; ह्या खोलीतून त्या खोलीत मधेच टेरेसवर्..लग्नानंतर पूजेसाठी तिच्या सासरी गेल्यावर घट्ट मिठीच मारली..मग तिने 'तिचे' घर परत एकदा दाखवले.. हा 'आमचा' हॉल; हे 'आमचे' किचन', ही बाल्कनी बघ किती मोठी आहे..मनात आले आता हे तिचे घर..'आपल्या' घराला सोडून तिने आता हे घर आपलेसे केले आहे..त्यावेळी नक्की आनंद झाला की वाईट वाटले? सांगता येत नाही...लग्नानंतर महिन्याभरात गौरी अमेरिकेला गेली..४-५ वर्षेझाली; फोनवर बोलणे होतच असते पण त्या खोड्या, कडकडून मारलेली मिठी, बोचकारे, पिरगाळून घेतलेली बोटे ह्याची सर त्या बोलण्याला येईल का?
मागे एका भेटकार्डावर वाचलेल्या ओळी आज किती सार्थ वाटत आहेत..
"बहिणीची माया जसा अत्तराचा फाया, मंद त्याचा गंध येतो हळूच भेटाया,
बहिणीची छाया जीवा मिळतो विसावा, दु:ख घेई स्वतः सुख लागते वाटाया,
बहिणीचे रूप जसा तेवतो नंदादीप, प्रकाशाने तेजाळतो मनाचे स्वरूप,
बहिणीचे नाते असे सदैव राहू दे.. आणि तुला माझेही आयुष्य लाभू दे..."
गळ्यात आवंढा... लंपन. (सुरेख)
गळ्यात आवंढा... लंपन.
(सुरेख)
किती गोड रे
किती गोड रे
छान लिहलेय एकदम
छान लिहलेय एकदम
ह्म्म्म!!
ह्म्म्म!!
आवडले.
आवडले.
दाद, श्यामली, मयुरी, वत्सला,
दाद, श्यामली, मयुरी, वत्सला, स्वाती धन्यवाद..
डोळे पाणावले, गळ्यात आवंढा
डोळे पाणावले, गळ्यात आवंढा दाटलाय ..... आवडले लेखन
स्पीचलेस!
स्पीचलेस!

(No subject)
सुरश आणि आनंदयात्री - सहमत!!
सुरश आणि आनंदयात्री - सहमत!! काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळ्त नाहिए. एकदम मस्त लिहिलंय. :):)
खूप सुंदर. भुतकाळात गेले
खूप सुंदर.
भुतकाळात गेले एकदम.. ती निरागस भांडणे, परत दोस्ती, वादविवाद अस बरच काहीबाही मनात दाटून आले 
मस्त लिहिलय...
मस्त लिहिलय...
दाद +१
दाद +१
सुंदर.. सुंदर लिहिलेय ..
सुंदर.. सुंदर लिहिलेय .. लंपन!
(No subject)
>> मग तिने 'तिचे' घर परत एकदा
>> मग तिने 'तिचे' घर परत एकदा दाखवले.. हा 'आमचा' हॉल; हे 'आमचे' किचन', ही बाल्कनी बघ किती मोठी आहे..मनात आले आता हे तिचे घर..'आपल्या' घराला सोडून तिने आता हे घर आपलेसे केले आहे >>
डोळ्यात पाणी.
खूप आवडले.
(No subject)
डोळ्यात पाणी आले.
डोळ्यात पाणी आले.
सुंदर.... मनापासून लिहिलेय.
सुंदर.... मनापासून लिहिलेय.
सुरेश, नचिकेत, शैलजा, धनश्री,
सुरेश, नचिकेत, शैलजा, धनश्री, अनघा, चिमुरी, कविन, चंबू, आस, शमा, अजय, नन्ना, अरुंधती सर्वांचे आभार..
रडवलंत लंपन.
रडवलंत लंपन.
सख्खी / चुलत बहीण नसल्याचं
सख्खी / चुलत बहीण नसल्याचं परत एकदा जाणवलं.
आता आत्ते, मावस, मामे बहिणींना फोन करतो
बहीण हवी होती आम्हाला पण असं
बहीण हवी होती आम्हाला पण असं वाटून गेलं. छान लिहिलंयस लंपन. लिहीते रहा.
छान लिहिलय
छान लिहिलय
मुलग्यांना एवढे जाणवते
मुलग्यांना एवढे जाणवते बहिणींबद्दल, असे कधी वाटले नव्हते. हे वाचून पुन्हा फेरविचार करावा वाटला.
दाटुन आले ते वेगळेच....
मला पाच बहिणी आहेत तेंव्हा
मला पाच बहिणी आहेत तेंव्हा मला तुझ्या भावना माझ्यासारख्याच वाटल्यात. तुम्हा बहिणभावांमधे आयुष्यभर प्रेमाचा ओलावा राहो!
गोड!
गोड!
खूप छान लिहिलेस लंपन. भावाची
खूप छान लिहिलेस लंपन. भावाची आठवण आली एकदम.
लंप्या मनापासून लिहीलायंस.
लंप्या मनापासून लिहीलायंस.
सौरभ, धारा, बागुलबुवा, बी,
सौरभ, धारा, बागुलबुवा, बी, नंद्या, फुलपाखरू, रैना, शूम्पी, चिन्नु ...सर्वांचे धन्यवाद..
Pages