Submitted by हर्षल_चव्हाण on 4 February, 2012 - 03:56
इतके आहे जवळ परी, मला न सापडलेले,
तुझ्यापासूनी लपवले तरी, तुझ्यात अडखळलेले...
"बहरासाठी आसुसलेली वेल हिंदकळणारी,
निसटूनी हातातून गोरटे चांदण शिंपणारी...
कळी उमलते, गंध तिचा घेत रात्र सुवासीक होते,
बहरागणिक ओढ तुझी कधी गमते, अनामिक होते...
पहाट येते, किलबील आणि रंग पसरे सोन्याचा,
जणू वाटतो, हसलीस तू अन् भाग्योदय जगाचा...
घाट चढूनी प्रभात येते, प्रभाकलश तो उरी,
किणकिण तिचीया नाजूकतेची चाल तुझीच खरी..."
इतके सगळे भरून येते, पुन्हा हरवलेले,
तुझ्यासमोर मिटलेले अन् आत-आत फुललेले...
न जाणो मी आहे-नाही तुझ्या जगामध्ये,
इतके आहे खरे पाहतो जग तुझ्यामध्ये...
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे, आवडली.
छान आहे, आवडली.
छान आहे
छान आहे
विभाग्रज, मानसी :
विभाग्रज, मानसी : प्रतिसादाबद्द्ल आभार
छान कविता
छान कविता
कळी उमलते, गंध तिचा घेत रात्र
कळी उमलते, गंध तिचा घेत रात्र सुवासीक होते,
बहरागणिक ओढ तुझी कधी गमते, अनामिक होते...
सुंदर कविता. सुंदर कल्पनाविस्तार.
सुर्रेख.... इतके सगळे भरून
सुर्रेख....
इतके सगळे भरून येते, पुन्हा हरवलेले,
तुझ्यासमोर मिटलेले अन् आत-आत फुललेले...
न जाणो मी आहे-नाही तुझ्या जगामध्ये,
इतके आहे खरे पाहतो जग तुझ्यामध्ये...>>>>>> फारच छान.
न जाणो मी आहे-नाही तुझ्या
न जाणो मी आहे-नाही तुझ्या जगामध्ये,
इतके आहे खरे पाहतो जग तुझ्यामध्ये...
अप्रतिम गर्भितार्थ्......आवडली खूप.......
साळसूद, शशांक, प्रद्युम्न आणि
साळसूद, शशांक, प्रद्युम्न आणि योगुली : प्रतिसादाबद्दल आभार
छानच आहे रे! वाचायची राहिली
छानच आहे रे! वाचायची राहिली होती..

नचिकेतः
नचिकेतः
शेवट मस्त.
शेवट मस्त.
सहेली : आभार
सहेली : आभार
"इतके सगळे .......जग
"इतके सगळे .......जग तुझ्यामध्ये..." >>>> .... छान
उकाका : धन्स
उकाका : धन्स