दुबई उर्फ डु बाय ( Do Buy ) भाग-३

Submitted by सुनिल परचुरे on 30 January, 2012 - 06:31

सुरुवातीला आत शिरताच एका प्रचंड भिंतीवरुन एक लहानसा धबधबा येत होता.
IMG_2702.jpg
तिसर्‍या मजल्यावरु हा घेतलेला फोटो.
IMG_2763.jpg

प्रत्येक शोरुम ही खरोखर डोळयांना मेजवानी होती. खास करुन चॉकलेटसच्या शोरुमस तर अफाट कल्पनाशक्तीने सजवलेल्या होत्या.
IMG_2712.jpgIMG_2713.jpgIMG_2718.jpgIMG_2719.jpgIMG_2721.jpgIMG_2723.jpg

लॉबीही प्रचंड मोठी होती.
IMG_2731.jpgIMG_2732.jpgIMG_2736.jpg

तिथेच दोन मजली अ‍ॅक्वेरियम व अंडरवॉटर वर्ल्ड आहे. संपूर्ण दोन मजले मिळून एक काच बसवलेली आहे. आतमध्ये शार्कपासून विविध जातीचे मासे दिसतात. जे करायचे ते भव्य दिव्य हि परंपरा इथेही पाळली आहे. आतमध्ये विविध सरपटणा-या प्राण्यांपासून ते विचित्र खेकडयांपर्यंत सर्व ठेवलेले आहे. अंडरवॉटर वर्ल्ड हे सिंगापुरच्या संतोसा आयलंड सारखेच आहे. हया अंडरवॉटर वर्ल्डमध्ये वरती संपूर्ण काचेवर पाणी व खालून आपण जात असतो. वरती काचेला आपण हात लावत जवळ असणा-या माशांना स्पर्श केल्याचे समाधान मिळवू शकतो.
IMG_2754.jpgIMG_2759.jpgIMG_2787.jpgIMG_2798.jpgIMG_2804.jpg
नंतर जगप्रसिध्द बुर्ज खलिफाच्या 4 वाजताच्या शोच्या लायनीत उभे राहिलो. हा जानेवारी 2010 मध्ये खुला झाला. तिथे दुबई मॉल मधुनच तुम्ही जाऊ शकता. प्रथम हळूहळू तिनेक मजल्यापर्यंत वर एस्कलेटर्सने तुम्ही जाता. चालत जाताना प्रत्येक ठिकाणी तुम्ही ती इमारत बांधतानाचे फोटो, त्या बद्दलची माहिती बाजूच्या स्क्रिन वर येत असते व ती पाहत असता. शेवटी एकदाचे तिथे वर जाणा-या लिफ्टशी आपण येतो. ही लिफ्ट 15 माणसांसह 68 सेकंदात तुम्हांला 124 व्या मजल्यावर नेते. जाताना ब-याच लोकांच्या कानात काहीतरी खुटखुटल्या सारखे होते. माझे कान साधा खंडाळयाचा घाट चढतानाही मध्येच कधीतरी बंद होतात व आवंढा गिळल्यावर परत नोर्मल होतात तसेच इथे झाले. लिफ्टचे दार परत उघडल्यावर तुम्ही एकदम आकाशात स्थिर झलेल्या हेलिकॉप्टरमधूनर जसे खाली पहाल तसेच बघु लागता. अप्रतिम नजारा. चारी बाजूला फिरुन तो तुम्ही पाहू शकता. ही इमारत 828 मिटर उंच आहे. इथे 1044 लक्झरी अपार्टमेंटस आहेत.एकंदर 49 फ्लोअर्स ऑफीसेस आहेत. टॉपचे तीन मजले मिळून एक ऑफीस आहे. 122व्या मजल्यावर एक रेस्टाँरन्ट आहे.
IMG_2841.jpgIMG_2843.jpg
हा १२४ व्या मजल्यावरुन मान वर केल्यावर वरच्या इमारितिचा फोटो
IMG_2846.jpgIMG_2851.jpg

खालि जिथे फाउंटन शो होतो तिथला वरुन घेतलेला फोटो
IMG_2848.jpgIMG_2849.jpg

इथुन एक जरि वळण चुकले तरि .........
IMG_2855.jpg

चातक ह्यांनि झब्बुत इथल्या रेल्वेस्टेशनचे प्र.चि. टाकले होते .हे आहे इथले ट्युब रेल्वेस्टेशनचे
IMG_2864.jpg

सोव्हेनियर म्हणुन इथे तुम्हि क्रेडिट कार्डद्वारे २,५,१० ग्राम सोन्याचि चिप ज्यावर बुर्ज खलिफाचे चित्र आहे असे घेउ शकता.
IMG_2873.jpgIMG_2878.jpg

अ‍ॅक्टिंग जमत्ये तर.....
IMG_2874.jpg

ह़या बुर्ज खलिफा बद्दल ऐकिवात आहे की अमेरिकेतही स्टेट एम्पायर बिल्डींग ही त्यावेळची सर्वात उंच इमारत बांधण्यास सुरवात झाली व अमेरिकच्या आर्थिक साम्राज्याला ग्रहण लागले. तशीच ही इमारत बांधायला सुरुवात केली व 2008-09 पासून जागतिक मंदी आली व तिची झळ दुबईलाही बसली. जागेचे भाव कमालीचे खाली आले. ही इमारत पुर्ण होईल की नाही अशी शंका येऊ लागली. आधी ही खरी बुर्ज दुबई हया नांवाने होणार म्हणूनच चर्चेत होती. पण अचानक ज्या दिवशी तिचे ओपनिंग झाले त्या दिवशी तिचे नांवे होते बुर्ज खलिफा. असं म्हणतात की, अबुधाबीच्या राजाने ती बेल आऊट केली आहे. खरं खोटं त्यांनाच माहित.

हि इमारत खरोखरचं नयनरम्य स्वरुपात आहे. रात्री तिचे चमचमणारे रुप खरचं मोहक दिसते. जेव्हा ऐन उन्हाळयात जुन-जुलै-ऑगस्टमध्ये 50-52 डिग्री टेंपरेचरमध्ये ज्या कुणी कामगारांनी घाम गाळून ही उभी केली त्यांना खरोखरचं सलाम. वर्षभरात दोन टोकाची तापमान सहन करणे, तसेच तिथे येणारी वाळूची वादळे हया सर्वांपासून बचाव करणारं तंत्रज्ञान विकसित करणारे इंजिनियर्स , आर्किटेक्टस ह्यांच कौतुक कराव तेव्हढ थोडच.

संध्याकाळी खाली दुबई मॉल मध्येच मागिल पाण्यात फाऊंटन शो होतो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून दर अर्ध्या तासाने 5 मिनीटांचाच पण अवर्णनीय असा हा शो असतो. अक्षरश अंग लवलवणा-या मुलीचं तो डांस करत आहेत असा भास होतो.
IMG_2895.jpg

हे सर्व बघून आम्ही परत हॉटेलवर आलो. आम्ही रहात होतो तो एरिया पाहिल्यावर आपण दुबईत आहोत की अजुन मुंबईतच हा नेहमी मला प्रश्न पडायचा. आपल्या इथले सर्व मोठमोठया ब्रँडच्या शोरुम्स् , त्यांची रेस्टॉरन्टस इथे आहेत. व दुकानात काम करणारे सर्व एशियन्सही हिंदी बोलणारे पाहिल्यावर आपल्या व तिथल्या मध्ये काही फरकच जाणवत नाही. इथे केरळी माणसे सर्वात जास्त दिसली. असं म्हणतात की अगदी 80 सालापर्यत आपले रुपये हे चलनही तिथे चालत होते (नेपाळ सारखे) पण आता तिथल वातावरण बदललं आहे. प्रत्येक गोष्ट ही पैशात व त्यावर होणा-या तेथील लोकांच्या फायद्यात बघितली जाते. त्यामुळे 25-30 वर्षे तिथे राहणारा माणूस जर नोकरी गेली तर त्याला 30 दिवसात तो देश सोडावा लागतो. किंवा तुम्ही तिथे धंदा करत असाल तर एका लोकल माणसाला धंद्यात पार्टनर म्हणून घ्यावच लागतं.

इथले काही कायदे हे कडक असतील पण ते तिथल्या लोकांच्या फायद्याचेच आहेत. सर्व सुविधा हया तिथल्या लोकांकरताच आहेत. आता एक साधी गोष्ट सांगतो. आपण आपल्या इथे टोल नाक्यावर गाडयांची लांबच लांब लाईन लागलेली ब-याचवेळा बघतो. पण तिथे प्रत्येक गाडीवर आरशाच्या मागच्या बाजुला काचेवर एक चीप बसवलेली असते. टोल नाक्यावरुन जाताना प्रत्येक वेळी 4 दि-हाम आपोआप त्यातून कमी होतात. लाईन नाही, सुट्टया नोटांची मारामारी नाही की काही नाही. मनात आणलं तर अशा सोयी आपल्या इथे कां नाही करता येणार ?

गुलमोहर: