लहरी

Submitted by अज्ञात on 26 January, 2012 - 07:47

झोकात वादळी झुळुक अंगणी आली
गंधाळ स्वरांनी यौवन देउन गेली
नखशिखांत झुलल्या शाखा आणि विशाखा
चेतना अनामिक जागवली भवताली

क्षण पुढचे आता स्तब्ध समाधी झाले
राहिले स्वर्ग कल्लोळाचे हळवेले
पानोपानी ओघळले दंव प्रतिमेचे
रंगात न्हाउनी भिजले भाव भुकेले

वलया वलयावर तरंग लहरी उठले
ढवळून निघाले; काठावर ओसरले
पळ युगे वाटती; वाट पाहती डोळे
जपतात किनारे आजहि ते व्रण ओले

...................अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञातजी:
किती सुंदर कविता रचलीत. मस्तच.
पहिल्या कडव्यात तिसरी ओळ दुसरीच्या जागी हवी होती असे वाटते.

दाद, श्याम, विभाग्रज,
मनःपूर्वक आभार ...................................... Happy

फिरत्या रंगमचावर तीन सेटस लावावेत तसं तीन कडव्यातून तीन चित्रं डोळयासमोर उभी राहिली. परस्परसंगती लावायचा प्रयत्न करतेय... Happy

अत्युत्कृष्ट रचना

आपल्या कवितांमुळे मनात प्रश्न उभे राहतात.

डोके फिरते.>>>>>आणि मग पुर्ण बाटली खाली करावी लागते,बरोबरना बेफी.