सदस्य प्रवेश |
सिरॅमिक - माझे मातीचे भाजलेले कामइसवीसन १९८७ च्या आधी माझ्या एका सिनिअर आर्टिस्ट लेडी एम्प्लॉयरच्या मदतीने केलेल्या, व माझ्या कडे अजूनही (शाबूत) शिल्लक असलेल्या काही मोजक्या वस्तू श्री गणेश वॉल हॅन्गिन्ग ऍश ट्रे पेन स्टॅण्ड बडिशेप ट्रे - पानाच्या आकाराचा मूर्ति - कडेने मूर्ति - समोरून वहाण (अर्थात चप्पल) या व इतर सर्व वस्तुन्चे मातकाम व "बिस्क फायरिन्ग" (आम्ही "बिस्कीट फायरिन्ग" म्हणायचो मित्राचा कॅमेरा उसना आणलेला, तर ट्रन्केन्तुन वस्तू काढून फोटु काढले त्यान्चे! |
|
लिम्बु, बिस्क फायरींग रे बिस्किट नव्हे
गणपती छान आहे. दरवर्षी गणपती जवळ आले की मी विचार करते कि करु का मूर्ती म्हणुन. पण धाडस होत नाही. भंगली तर वाईट वाटेल म्हणुन.
राकु मस्त झालेय. पेनस्टँडवर टेक्श्चर कंगव्याने केलेस का?
सगळ्यात आवडले ते म्हणजे तो चेहेरा. समोरुन एखादा फोटो घेतला असतास तर?
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
मिनोती lol बिस्कची सुधारणा केली हे
)


अजुन एक पान टाकल हे, चेहर्याचा समोरूनचा फोटो पण टाकला हे
तो सिगारेट ट्रेच तुला राकू सारखा वाटतो हे ना? पण ते राकू नाहीये! भट्टीत "कोल्ड एरियात" असल्याने अर्धवट फसफसलेला ओपेक ग्ले़झ हे तो! दिस्तो हे राकू सारखा! (काय हे ना, की न विकला गेलेल्या शिल्लक "कचरा" मालातून (अर्थात मूर्ति, चप्पल वगळता) काही वस्तू मी माझ्या आठवणीकरता तेव्हा ठेवल्या, त्या ह्या हेत, त्यामूळे तो ट्रे तसा! , ज्या वस्तू विकल्या गेल्या त्या अत्यन्त सुन्दर होत्या!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
लिंबूदादा, खजिनाच आहे की तुमच्याकडे. मस्त!!
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!
हे पण बेस. तुझ्या या गुणांवर प्रसन्न होऊन ती चिल्लर खरच तुला द्यावी काय असा विचार आला बघ माझ्या मनात.
>>>>माझी सिनियर आर्टिस्ट मैत्रिण्/एम्प्लॉयर
सारखं 'एंप्लॉयर' नाही लिहिलंस तरी चालेल. आम्ही तुझ्या मैत्रीवर शंका घेणार नाही.
सगळ्याच वस्तू छान जमल्या आहेत.
अरे वा लिंब्या! बराच कलाकार आहेस की तू
सहीच!
लिंबू, सगळयाच कलाकृती सुरेख! मला चप्पल खूप आवडली! (नक्की करून बघणार.) पेपर्वेट म्हणून वापरेन!
LT, चप्पल आणि चेहेरा छान आलाय. चेहर्यावरचे शांत हसू तर फारच सुंदर!
लिंबुटींबु,
सगळ्या कलाकृती छान आहेत. मला तो पहिला गणपती अगदी ओला आताच तयार केलाय असे वाटते. त्याला ग्लेझ आहे ना?
सगळ्यांमध्ये पेन स्टँडला छान रंग बसलाय, तो ग्लेझ वेगळा आहे का? की माती वेगळी आहे?
मी आता चप्पल करुन बघणार, मला आवडली ती आयडीया.
बाकी मला काल रात्री ते बिस्कीट फायरींग वाचुन थोडे कनफ्युजन झाले होते हा कुठला प्रकार म्हणुन, आणि क्लास मध्ये अजुन सांगितला कसा नाही, आता मिनोतीने सांगीतल्यावर कळले
मिनोती, साजिरा, कान्दापोहे, सायोनारा, मैत्रेयी, मृण्मयी, चिनू, रुणी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
साजिरा, हो रे खजिनाच म्हणायला हव! पोरान्पासून जपुन ठेवलेल हे ट्रन्केत! :०
कान्द्या, चिल्लर अन विचार, दोन्ही नीट जपुन ठेव रे भो!
हवे लागतील मला पुढे मागे! 
सायोनारा, LOL, अग पण मी ते मुद्दाम लिहिल, तिच क्रेडिट तिला मिळायलाच हव! अर्थात तिला विचारलेल नसल्याने नामोल्लेख करता येत नाही! ती अजुनही सिरॅमिक करते, थोड वेगळ फिल्ड हे, तिचा स्टुडिओ आहे, तिच्या वस्तू मोस्टली एक्स्पोर्ट होतात! अपरिहार्य कारणाने माझा नि तिचा सम्पर्क राहू शकला नाहीये.
मृण्मयी, ती चप्पल खुपच लहान हे, पेपरवेट म्हणून करायची तर चप्पले ऐवजी थोडा मोठा बुट तयार कर, तो जड करता येऊ शकेल
चिन्नू, फोटो पेक्षा प्रत्यक्ष मूर्ति जास्त चान्गली दिसते, खर तर माझ्याहातून ही मूर्ति पडून डोके वेगळे झाले, ते पुन्हा चिकटवुन बसवले आहे! होप सो, की मला पुन्हा अशा गोष्टी तयार करता येतिल
रूनी, गणपतीला मॅट प्रकारातले ग्ले़झ आहे. सर्वान्ची माती एकाच प्रकारची हे, मात्र ग्लेझ चा प्रकार, वापरलेले रन्ग वेगळे आहेत.
मिनोती, पेनस्टॅण्डवरील टेक्श्चर साठी कन्गवा वापरलेला नाहीये, तो स्लॅब वापरुन तयार केला हे, व स्लॅब पोत्यावर थापली, पोत्याचे टेक्श्चर उमटले आहे!
दुर्दैवाने वेळेअभावी, व कारणपरत्वे मी ग्लेझ बाबत फारस काहीच शिकू शकलो नाही, केवळ ऐकीव माहिती आहे! वरील सर्व ग्लेझचे काम मैत्रिणीने केले आहे.
प्रतिक्रियान्बद्दल सर्वान्चे आभार


...;
आपला, लिम्बुटिम्बु
सुर्रेख ! सही कला आहे हातात. गणपती आणि चप्पल सर्वात जास्त आवडले. कृपया हे करणे थांबवू नकोस रे (आणि करून इथे टाकत जा... विक्री करण्याबद्दल काही विचार केलायस का ?)
***
Skating away on the thin ice of the new day...
सर्वच गोष्टी अप्रतिम झाल्यात... सुरेख कला आहे रे तुझ्या हातात.. नविन काहीतरी बनव आणि विक्रीचा पण विचार कर..
*******************
फांदीफांदीवर उमटती
आर्त धुक्याची धुळाक्षरे
करी साजरे रंग सोहळे
झाड वयात आलेले...
लिंबूटिंबू, वस्तू सुंदर आहेत. गणपती तर जबरीच!
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
लिंब्या अरे काय सुरेख कला आहे तुझ्या हातात्.....बरंच काही करतोस रे तू तर
मला पण मूर्ती आणि गणपती आवडला.
LT, मस्तच केल्या आहेस या आणि साबणातल्या वस्तू. प्रतापगडाखाली एक हस्तकला केंद्र आहे, तिथे निरनिराळ्या प्रकारच्या सुरेख वस्तू मांडलेल्या असतात.
LT,
आधी तू लेखात जो बिस्कीट फायरींग हा शब्द वापरला होतास तो बरोबरच होता. मी आज एक कुंभारकामावरचे पुस्त़क वाचत असतांना मला हा शब्द आढळला. त्याबद्दल विचारल्यावर माझ्या सरांनी सांगितले की बिस्कीट फायरींग हा शब्द ब्रिटीश इंग्लीश मध्ये (किंवा इंग्लंड मधले प्रसिद्ध केलेले पुस्तक असेल तर) वापरतात तर अमेरीकन इंग्लीश मध्ये त्यालाच बिस्क फायरींग असा शब्द आहे.
भारतात इंग्रजांचेच इंग्रजी वापरले जाते तेव्हा तो शब्द भारतात वापरात असणे शक्य आहे.
लिमटिम,
सर्व कलाकृती मस्त आहेत एकदम !
आयला!
हे कस काय नजरेतुन सुटल होत काय माहीत.
कलाकारी भारीच् आहे तुझ्या हातात.
चप्पल आणि ती मुर्ती खास आहे एकदम
रुनी, आवर्जुन सान्गितल्याबद्दल धन्यवाद!

बिस्किट फायरिन्ग याचा अर्थ काय घ्यायचा असे तेव्हा विचारले तर "कडक" होण्यापुरते बिस्किट जसे भाजले जाते, भाण्डे तेवढेच भाजण्याला बिस्किट फायरिन्ग असे म्हणायचे असे सान्गण्यात आलेले!
...;
आपला, लिम्बुटिम्बु