इलाही

Submitted by वैवकु on 9 December, 2011 - 05:22

इलाही

काय द्वारका अवधहि बाई
पंढरि तीरथ परि न जराही
भक्ताभेटिस तिथुन निघाला
धावत श्रीहरि पंढरि आला !!

आजहि माझि बावरी मीरा
गात हरीधून भीवरी तीरा
मिरवित हाती मीहि पताका
आर्त आर्त अन मारित हाका

हाक ऐकुनहि ती रखुमाई
हाssय तुला का सोडित नाही
ये नं भेटण्या आज मलाही
आस पुरी कर एक इलाही

ये नं भेटण्या आज मलाही
आस पुरी कर एक इलाही......!!

गुलमोहर: 

आशय चांगलाच आहे.
परंतु, वृत्त सांभाळण्यासाठी केलेली हस्व-दीर्घाची तडजोड जास्त प्रमाणात झाल्याने रसास्वादात बाधा निर्माण झाल्यासारखं वाटलं.
तसंच शेवटी ’इलाही’ हा शब्द काही विशिष्ट कारणाने वापरलाय की यमक जुळविण्यासाठी, हे नीटसं ध्यानात आलं नाही. (इलाही = अल्ला असा अर्थ आहे ना ?)
शब्दाला आक्षेप नाही पण त्याचं प्रयोजन समजलं नाही

एक रसिक म्हणून प्रांजळ मत दिलंय.
(चुकलंही असेल कदाचित) राग नसावा.

सर्वांचे आभार
Kiranyake साहेब ,सांजसंध्याजी ,विभाग्रज, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद .
भिडे सर अभिप्रयायासाठी आभार .
इलाही चा अर्थ तुम्ही सांगितला तोच . प्रयोजन वगरे काही नाही कोणताही समज गैरसमज नसावा ,हा एक उर्दू हिंदी शब्द आहे .शब्द आवडला म्हणून माझ्या विठ्ठलाला उद्देशून वापरला बस ! शेवटी सबका मलिक एक अस म्हणतातच की!!! .
ह्रस्व दीर्घ तडजोड काही ठिकाणी अपरिहार्य वाटली नंतर एकदा केलीच आहे म्हणल्यावर कमी जास्त असा विचार करत बसलोच नाही मनात आलं ते लिहिलं .
प्रतिक्रियेसाठी सदैव आपला कृपाभिलाषी - वैभव वसंतराव कुलकर्णी

pradyumnasantu जी , मयेकर साहेब धन्यवाद !!
actually हा शब्द सुचला त्यानंतर अक्खी कविता आपोआप सुचत गेली. विठ्ठला सठी इलाही हा जो शब्द वापरलाय तो या कवितेचा आत्मा आहे . अक्खी कविता उचलून धरलीय त्यानं!!!

अनिलराव अहो "वसंतराव" हे आमच्या तीर्थरुपांचे नाव आहे आमचे -"वैभव" आहे राव !
ही कविता आमची निर्मिती आहे आणि आम्ही आमच्या तीर्थरूपांची .....फार मोठा फरक आहे हा कृपया विसरू नये
चुभूदेघे !!!!!!!!!
प्रतिक्रियेसाठी आभारी