धर्म, समाज, जातपात

Submitted by विनायक.रानडे on 6 December, 2011 - 01:30

नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न मी माझ्या क्षमतेला समजून करतो आहे.

भारतीय परंपरेत चार वेद, त्याचे आठ अंग म्हणजे शाखा, उपनिषद ह्या सगळ्या प्रकारातून धर्म, समाज, जात, कूळ व व्यक्ती ही मांडणी का व कशी घडली ते मी समजण्याचा प्रयत्न केला. वेद काळात सृष्टीतील प्रत्येक ऊर्जेचा स्वतंत्र अभ्यास केला गेला. त्या प्रत्येक ऊर्जेला देव किंवा देवी म्हणून संबोधले गेले. ह्या प्रत्येक देवाची / देवीची उपासना म्हणजेच ऊर्जेचे सखोल ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला ऋषी म्हणून मान्यता मिळाली होती. ह्या सगळ्या ऋषी मुनिजनांनी सृष्टीच्या स्पंदन शक्तीला मान्य केले. स्पंदन शक्तीचा एक भाग मानव हे मान्य झाले. स्पंदन शक्तीला समजण्याची क्षमता व गुणधर्म फक्त मानव समूहातच आहे हे सर्वमान्य झाले. ह्या क्षमता व गुणधर्मांचा उपयोग ह्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे हे सर्वमान्य ठरले. ह्या कर्तव्याचे पालन करण्याचे नियम ठरवले गेले. ह्या संकल्पनेला मानवाचा सनातन म्हणजे सतत कार्यरत असणारा, अंत नसलेला धर्म म्हणून ऋषी मुनिजनांनी मान्यता दिली. धर्माचे पालन कारणार्‍या समूहाला एक समाज म्हणून मान्यता दिली. इथे धर्म म्हणजे मानवी गुण धर्म, कर्तव्य अशाच अर्थाने होता व आहे पण पाश्चात्य पद्धतीने विचार करण्याची सवय व त्यातच मोक्ष आहे अशी समजूत झालेल्या विचार वंतांनी धर्म ह्या संकल्पनेला रिलीजन, पंथ, मजहब, दीन, ईमान ह्याला जोडण्याचा अतिरेक केला.

ज्या ऋषींनी समाजाच्या सखोल अभ्यासातून नियम व कर्तव्ये सुनिश्चित केली त्या प्रत्येक गुरुचे नाव देऊन त्या नियम-कर्तव्यांना गोत्र असे नाव दिले गेले. (पंचांगात ही सगळी माहिती वाचायला मिळते. पण ते समजून घेण्याऐवजी नटनट्यांची, आधुनिक साधनांची, मित्र - मैत्रीण जोडीची, कोणती फॅशन वगैरे माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे झाले आहे.) गोत्र ह्या संकल्पनेचा अर्थ मला असा समजला. आधुनिक समाज रचनेत विद्यापीठ हे अपवाद वगळता गोत्र असण्याची शक्यता आहे.

ऋषी मुनिजनांच्या समूहाने मानव शरीराला जिवंत ठेवण्या करता शरीरातील प्रत्येक अवयवांच्या कार्याचा अभ्यास केला होता म्हणूनच त्या अभ्यासातून समाज एका मानव शरीरा सारखा असून चार वर्णात आहे असे सर्वमान्य झाले. वेदकाळा पासून सृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळी गाठणारे गुरु, ऋषी मुनीजन मान्यता मिळवलेले होते त्यांच्या शिष्यगणांना ठरावीक पातळी गाठल्यावर ब्राम्हण ही पदवी दिलेली आहे. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूची जबाबदारी अंतर्बाह्य घटनांचे सुनियोजित आकलन करून, प्रक्रिया झाल्यावर इतर अवयवांना पुरवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य पद्वीधारक ब्राम्हण वर्णाला दिले गेले. प्रत्यक्षात ब्राम्हण ही जात नसून विचार पद्धती आहे, वैचारिक कामाची पातळी आहे. (मुसलमान धर्मात सय्यद ह्या नावाने ह्याची गणना होते. पाश्चात्य पध्दतीत वैज्ञानिक, प्राध्यापक ह्या अर्थाने गणना होते.) आधुनिक काळात ह्या वर्णात भेसळ पदवी धारक, सतत बदलणारे नियम व बाह्य शक्तींचे नियंत्रण असल्याने कर्तव्य पालनात गोंधळ झाला आहे. संगणक भाषेत ह्याला रोगट (करपटेड) बॉयॉस म्हणता येईल.

समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य धोक्यापासून संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्‍या भागाला क्षत्रिय वर्ण गणले गेले ही जबाबदारी हात - पाय, डोळे, नाक, कान ह्यां अवयवयांची होती. समाजरुपी शरीरातील अंतर्बाह्य शरीराच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी छातीपासून कंबरेपर्यंत असणारे अवयव फुपुसे, हृदय, पोट वैश्य वर्ण गणले गेले. ह्या तिन भागांनी तयार केलेली व त्यांना आवश्यक असणारी माहिती वाहक अवयवांचा वर्ण शूद्र (क्षुद्र नव्हे) गणला गेला हे मी समजू शकलो. ह्या चारही वर्णांचे महत्त्व मानव शरीरातील प्रत्येक अवयवाचे असते तितकेच संतुलित होते. मात्र समाजरुपी शरीरातील अनावश्यक द्रव्ये, वस्तूंचा कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची होती कोणत्याही वर्णाची नव्हती हे मी निश्चित समजू शकलो. मात्र आज प्रत्येक वर्णातील अंतर्बाह्य संबंध बिघडवण्याचे नियोजित प्रयत्न होत आहेत.

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या बुध्दी व कार्यक्षमते नुसार प्रत्येक व्यक्तीचे वर्गीकरण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा चार वर्णात झाले. प्रत्येक व्यक्तीचे कार्य, दैनंदिनी, आहार ह्याचे नियम ठरलेले आहेत. ब्राम्हणाने ह्या सृष्टीचा, ब्रह्मांडाच्या प्रत्येक ऊर्जेचा अभ्यास करावा हे त्याचे कर्तव्य ठरले. अभ्यास करण्याची क्षमता सतत टिकावी म्हणून पूजा, पाठांतर, आहार ह्याचे नियम पाळण्याची सवय आवश्यक झाली. अनुभवी गुरु समूहाने अशा ब्राम्हणाला मान्यता देऊन प्राकृत भाषेत सामान्य व्यक्तीला त्याने मिळवलेल्या ज्ञानाचा सत्कारणी उपयोग व मदत करण्याचे काम दिले. ह्या समाजरुपी शरीरातील मेंदूचे काम ब्राम्हण वर्गाने करावे मालक बनू नये. तर इतर तीन वर्णांनी त्या कामात मदत करावी, गुलामी नव्हे. क्षत्रिय समूहाची मानसिकता, आहार, संरक्षण क्षमता व त्यांचे नियम ठरवले गेले. क्षत्रियांच्या संरक्षणाच्या कामात इतर तीन वर्णांनी मदत करावी अडथळे निर्माण करू नयेत. शरीराला आवश्यक असणार्‍या गरजेच्या वस्तूंचे भांडार, व्यवहार वैश्य समूहाने करावे, परंतु समाजाला वेठीस (रॅनसम) धरू नये. तसेच ह्या तीन वर्णांना शारीरिक मदत व माहिती पुरवण्याचे काम शूद्र समूहाने करावे, जेणे करून हा शरीर समाज सुदृढ व निरोगी असावा हाच मूळ उद्देश होता. मानव शरीराचे प्रत्येक अवयव एकमेकाशी जुळलेले असतात, कोणत्याही एका अवयवाला वेगळे महत्त्व नसते तसेच ह्या समाजरूपी शरीरातील चारही वर्णांच्या समूहांचे एक संध असणे आवश्यक असणे सर्वमान्य झाले होते. आज राज्य करते, नेता, पुढारी, जमीनदार, मालक, कार्यवाह, अभियंता, कोशाध्यक्ष, मुकादम, कामगार वगैरे आधुनिक गोत्र प्रकार आहेत असेच माझे ठाम मत झाले आहे.

कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला असावा. ह्या पूजेला हजर असणार्‍या प्रत्येकाला पूजेला बसणार्‍या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्‍या पुजार्‍याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता) हे कर्तव्य होते की त्याने पूजेला बसणार्‍या व्यक्तीच्या परंपरेची, गोत्र, कुळ, जात, जन्मस्थान अशा तपशीलवार माहितीची उजळणी करूनच पूजेला सुरुवात करणे आवश्यक ठरले होते. आज ह्या सगळ्या तर्कशुद्ध संस्कारांचे समाजातले महत्त्व संपवण्याचा प्रयत्न काही समाज सुधारक व राज्यकर्ते करीत आहेत. ह्या प्रयत्नांना मान्य करणार्‍या संधीसाधूंना प्रमाण पत्र, नोकरी, मोठ्या हुद्याचे गाजर खायला देण्याच्या पध्दतीला महत्त्व मिळालेले आहे.

जातपात म्हणजे एखाद्या जातीची पातळी असा साधा अर्थ मला समजलेला आहे. मुळातच व्यक्तीची जातपात ही दैनंदिन व्यवसायाने ठरते, त्या व्यवसायाशी संबंधित आचरण (वागण्याची पद्धती) म्हणून आहार त्यामुळे तयार होणारे विचार, ह्या सगळ्याच्या मिश्रणाची ती एक जात असते असे आजवरच्या अनुभवांनी मला पटले आहे. कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते. प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा एक समूह असा असतो की जो त्याच जातीच्या ब्राम्हण वृत्तीच्या विरोधात असतो. ह्या समूहाला फक्त आरक्षणाचे फायदे हवे असतात. आरक्षण देऊन गोंधळ माजवण्याचा हक्क व त्याकरता संरक्षण देण्याचे आश्वासन ह्या समूहाला मिळते.

लहान पणी मला समजलेले जातपात हे प्रकार पुढील काही प्रसंगातून मी अनुभवले आहेत. आमच्या गावात राहणारी दोन वयाने लहान, सिंधी मुले (सिंध प्रांत वासी ह्या अर्थाने), भवनानी आणि लालवानी आपसात भांडत होते, कपडे फाडून शिवीगाळ चालू होती. भवनानीने एका नटीचा फोटो लालवानीला ५० पैशाला विकला होता. लालवानीने तो फोटो त्याच्या दुसर्‍या एका मित्राला दोन रुपयाला विकण्याचा प्रयत्न केल्यावर भवनानीने तोच विकलेला फोटो एक रुपयाला परत मागितला होता त्यातून हे भांडण झाले होते. इतक्या लहानपणी एका वस्तूची गरज लक्षात घेऊन ती पुरवण्याचा व्यवसाय करणारी धंदेवाईक जात मला समजली होती. पण ह्याच सिंधी समाजात साधू वासवानी सारखे सत्पुरुष मानवजातीच्या मदतीला ठामपणे उभे असतात.

असाच एक दुसरा प्रसंग मी लहान असताना अनुभवला होता. बालपणी मी ज्या इमारतीत भाड्याने राहत होतो त्या इमारतीच्या मारवाडी (मारवाड प्रांत वासी, आजचे राजस्थान) मालकाचा मुलगा माझ्या बरोबर खेळायला येत असे. मी त्याला विचारले होते की तो त्याचा गृहपाठ केव्हा करतो? त्याने व्यावसायिक जातीला शोभेल असेच उत्तर मला दिले होते. तो शिकवणीला जात होता तिथल्या एका गरीब (?) मुलाला गोळ्या बिस्किटे देऊन त्याच्या कडून गृहपाठ तयार करून घेत होता. हा असला विचार माझ्या ब्राह्मणी संस्कारित डोक्यात कधीच येणार नाही. मी मात्र मार खात, रडत ओरडत माझा गृहपाठ करायला शिकलो होतो. ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात. मंदिर ह्या संकल्पने विषयी एक वेघळा लेख येणार आहे.

बालपणीच्या त्याच इमारतीच्या समोर आठवड्याचा बाजार दर रविवारी जमत होता. तिथे मास - मासे विकणारे होते. डुकराचे मास गर्दी करून विकत घेणारे होते. ती डुकरे संडासातील घाण, कचर्‍यातील घाण खाताना मी बघितली होती. त्याच डुकरांना कापताना मी बघितले होते. तेच मास आवडीने खाणारी एक जात मी तिथे बघितली होती. तसेच "चाक फिरवतो गरागरा मडकी करतो भराभरा तो कोण ? कुंभार, कपडे शिवतो तो शिंपी, चपला तयार करतो तो चांभार, लाकडाच्या वस्तू बनवणारा सुतार, लाल झालेल्या लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार," शालेय पुस्तकातील बालगीतातून मला व्यावसायिक जाती ह्या अशा समजल्या होत्या, त्यांची कामे किती आवश्यक होती हे मला समजले होते. पुजा पाठ सांगणार्‍याला भट, पुजारी म्हणतात हे समजले होते. राशींचा अभ्यास करणारे ज्योतीशी होते. पण ह्या भट, पुजारी, ज्योतीशी व्यक्तींना ब्राम्हण पदवी मिळवणे आवश्यक होते ती एक जात नव्हती.

हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे.

गुलमोहर: 

>>>>दोन्ही लेख वाचल्यावर मला नाही वाटत ते "ब्राह्मण जातीवर" अडकले आहेत. उलट "ब्राह्मण" ही जात नसून वेगळी जीवन पद्धती आहे असे त्यांचे म्हणने आहे असे वाटते. <<<<
देशी, अगदी बरोबर Happy

जामोप्या, तू जे कुठुन तरी (उकीरड्यावरुन उचलुन आणल्याप्रमाणे) उचलुन आणून इथे डकवलेस, ते नेटवर सापडले म्हणजे "पुरावा" असे तुझे व हल्लीच्या "संशोधकान्चे" म्हणणे आहे काय?
ते सर्व मराठित ओवीबद्ध आहे, तर शंकराचार्य व समकालिन संत या वर तू दिलेल्या "मराठीत" लिहीते झाले असे तुला म्हणायचे आहे काय?
(तसे असेल, तर या भरतभूवर एक नाही शम्भर शन्कराचार्यान्ना अवतार घ्यावा लागेल असे दिसतय.)
मी बाकी पोस्ट्स वाचल्या नाहीयेत, नन्तर येतो Proud

शिंदे आणि होळकर ही ज्वलंत उदाहरणे आहेत. एक जण पेशव्यांकडे हुजर्‍या होता तर दुसरा पाणक्या. आज कोणी त्यांच्या वंशजांना उपरोक्त हीनवचनांनी संबोधेल काय?
>>
उघडपणे नाही पण तुमच्या मनात 'आज जरी ते राजे असले तरी त्यांची मूळ औकात हुजरे आणि पाणक्यांचीच आहे.' हे आहे ते जाणार नाही , जात नाही. वेळप्रसंगी (चुका झाल्यावर)त्यांना त्याची यथास्थित आठवणही करून देण्यात येते. ते हुजरे आणि पाणके होते हे अगदी अचूक लक्षात राहिले बरीक तुमच्या !

अरे अरे अरे! काय चाललंय हे?:अरेरे:
किती वर्षं जात-पात, धर्म यात वेळ घालवणार आपण. जग कुठे चाललंय आणि आपण कुठे?
काहीतरी विधायक करायचा वेळ वाया जातोय!
त्यापेक्षा जागतिक भाषेत बोलायला शिकुया! जागतिक भाषा म्हणजे इंग्रजी नव्हे!! सांगितिक भाषा.
जी जात पात धर्म देश विदेश काहीही जाणत नाही. फक्त या हृदयातून त्या हृदयात शिरते.
कवयित्री बहिणाबाईंनी ''माणसा माणसा, कधी होशील माणूस?'' असा प्रश्न कळकळीनं विचारलाय.
तो अनेक अर्थानी, अनेक पातळीवरून समजून घ्यायला हवाय!
पसायदानाचाही अभ्यास व्हायला हवा! ''आता विश्वात्मके देवे..''
''भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे!''
निदान विश्वभर पसरलेल्या मायबोलीकरांनी तरी या वादांतून बाहेर पडून, फक्त एक माणूस बनून ''स्नेहजाल'' विणावं!!अशी मनापासून इच्छा.
आपल्यापासूनच सुरुवात करु या!

<<<एकीकडे आपण म्हणतो जातीभेद नाहीसा झाला>>>

कोण म्हणते आहे असे?
एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनावरून ती व्यक्ती विशिष्ट जातीची आहे/नाही असे आडाखे आणि त्यावरून विशिष्ट जातीच्या व्यक्ती विशिष्ट पद्धतीचे वर्तन करतात असे लेखातून प्रतिपादन करणार्‍या व्यक्ती समाजात आहेत, वर त्या स्वतः हे सगळे विचार करून लिहितो म्हणत आहेत, हे कशाचे द्योतक आहे? अशा व्यक्ती प्रातिनिधिक नाहीत असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.

जातीभेद नुसताच जिवंत नसून याचे भरपूर पोषण होत आहे. ''मीस्वतः जात मानत नाही,'' म्हणजे समाजातला जातीभेद नष्ट झाला असे म्हणून असलेल्या जातीभेदाकडे डोळेझाक करता येत असेल तर जातीद्वेष पसरवणार्‍या लिखाणाकडेही दुर्लक्ष करायला हवे.

बाळु जोशी, Happy
माझ्यामते तुम्ही internet वर ह्या चर्चांना उत का आला आहे ह्यावर अचुक बोट ठेवले आहे.मनातुन काही जाता जाइना हो,म्हणुनच जात नाही ती जात.

>>>> ते हुजरे आणि पाणके होते हे अगदी अचूक लक्षात राहिले बरीक तुमच्या ! <<<<<
त्या "लक्षात रहाण्यालाच" आपण इतिहास असे म्हणतो ना बाजो??? Proud
साला एखाद्या मुद्द्याला प्रतिवाद करायला उदाहरण दिलेच, तर म्हणे "बरीक लक्षात राहिले", अध्यार्‍हुत प्रश्न "की हेच का राहिले?" वावदूकपणा म्हणतात तो हाच बर का बाजो. अन काड्या टाकणे देखिल हेच! Wink
याच पाणक्यान्च्या मुद्द्याला, परवाच्या रेडिओवरील बाबासाहेबान्च्या भाषणातील सन्दर्भ दिल्याचा सन्दर्भ देऊन सान्गतो, की त्या वक्त्याने बाबासाहेब काय उपदेश बहुजनान्ना देत होते ते सान्गताना, "ब्राह्मणान्नी आधुनिक विद्येची कास धरली तशी बाकिच्यान्नी धरावी, ब्राह्मणान्नी तशी धरली नसती तर ते आजही कुठेतरी स्वैंपाकी/पाणक्ये म्हणून कामे करताना दिसले अस्ते" असे राजरोस सान्गितले होते, तेच आजही रेडिओवर उगाळताहेत. तुम्हाला वरील शिन्देहोळकरान्च्या उल्लेखात ओढुनताणून आणून वक्रोक्ति दिसत असेल बाजो, पण आम्हाला मात्र बाबासाहेब म्हणले त्याचीच यथार्थता पटते, त्याचा राग येत नाही. फार दूर कशाला? माझा आजोळकडूनचा आजा अन काकेआजा दोघेही आचारीच होते. त्यात लाज कसली? Proud मी देखिल उत्कृष्ट नसेल तरी पाचपन्नास लोकान्चे जेवण केव्हाही रान्धण्याइतपत "आचारी " आहेच. कधी येताय बोला, घालतो गिळायला Proud

विकु, कस्ल घण्ट्याच मर्म? वरच्या पोस्टमधे उल्लेखिलेला बाबासाहेबान्चा सन्दर्भ वाचा, आम्ही नै गेलो विचारायला त्यान्ना कधी की "बामणे पाणके अन स्वैम्पाकीच" राहिले अस्ते असे का म्हणालात, तुम्हाला काय बाजीराव आठवत नव्हता का?" Wink कारण आम्ही वास्तव मान्य करतो. हो, तो मधला काही बराच काळ गरीब ब्राह्मणान्ना पाणके/स्वैम्पाकी हीच कामे करणे शक्यहोते/करावी लागत होती. स्वतः बाबासाहेबान्नीच तसा उल्लेख केलाय तर त्याचे काही नाही, अन इकडे आम्ही एका उदाहरणाला प्रतिवाद म्हणून उदाहरण दिले शिन्देहोळकरान्चे तर ते मात्र या बाजोला इतके खटकावे? कसले वर्म नि कसले मर्म!
हे म्हणजे सोईस्कर अर्धवट वाक्ये उचलुन त्याने "अडाणी लोकान्ची डोकी भडकतील" अशा प्रकारे अर्थ काढून दाखवायचा व आपण बाजुला बसुन गम्मत बघायची असेच चालले आहे. यान्चेसमोर काहीही बोला, ते बरोब्बर त्यातुन त्यान्ना हव्वातस्साच अर्थ काढुन मान्डणार.
असो.

हा लेख आणी लिंब्याचे प्रतीसाद.. विनोदी लेखनात पाहीजे होते.. Proud
वरदा.. तुमच्या पोस्ट अत्यंत सुंदर.. अनुमोदन..:)

विनायकजी, या विषयावर खूप थोर संशोधकांनी (राजवाड्यांपासून आंबेडकरांपर्यंत) मौलिक संशोधन केले आहे ते वाचल्यानंतरच आपण (लिहायचेच असतील तर ) असले लेख लिहिणे श्रेयस्कर असे मला वाटते. आपल्या वैयक्तिक अनुभवावरून निष्कर्ष मांडणे हा फक्त वैयक्तिक अनुभव म्हणता येईल त्याला मूलगामी निष्कर्षाचा दर्जा देता येणार नाही. मुळात आता 'घटना' हा समाजाधार असतांना घटनेच्या गुणदोषावर संशोधन आणि चर्चा करण्याऐवजी कालबाह्य झालेल्या गोष्टींवर कशाला संशोधन करताय आणी लेख लिहिताय? हेच कळत नाही.

तू जे कुठुन तरी (उकीरड्यावरुन उचलुन आणल्याप्रमाणे) उचलुन आणून इथे डकवलेस,

ते शिवलिलामृतात आहे. शिवलिलामृत उकिरडुआवर मिळते का माहीत नाही.

दामोदरसुतजी मी दर्जा मिळण्या करता हे लिहिलेले नाही, कधिच त्यात वेळ घालवणार नाही, हि एक "पाउल खूण" एवढाच माझ्या अनुभवांना दर्जा मिळावा हाच एक उद्देश!!!! पण व.पुं च्या भाषेत "आय इज" सांगणारे "रि टे" इतके पुढे येतिल हि अपेक्षा नव्हती. ह्या सगळ्यांचा मी अभारी आहे!!!!!

शिवलिलामृत उकिरडुआवर मिळते का माहीत नाही

हिंदुधर्मात आहेत असले उकिरडे. जेंव्हा जैन आणि बौद्ध उत्कर्षाला गेले तेंव्हा त्यांच्याविरुद्ध असा उकिरडा बामणानीच तयार केला.. आता मुस्लिम, ख्रिस्चन आल्यावर जैन, बौद्ध हे आमचेच पंथ म्हणून बामण नाचतात आणि मुस्लिम, ख्रिस्चन यांच्याविरोधात हे असले ऑनलाइन उकिरडे उकरत फिरत्तात, तेंव्हा ते शत्रु होते, आता हे.... एकंदर काय, दुसर्‍या धर्माला शिव्या घातल्याशिवाय यान्ना आन्न गोड लागत नाही.

बाळू जोशी,

> ते हुजरे आणि पाणके होते हे अगदी अचूक लक्षात राहिले बरीक तुमच्या !

राहणारंच! कारण शिंदे आणि होळकर ही सामाजिक स्तरोत्क्रमणाची (सोशल अपवर्ड मोबिलिटी) झगझगीत उदाहरणे आहेत.

माझ्या वडिलांनी मला एक सांगितलं होतं, "आपण ज्या जातीत जन्माला आलो तिचा अभिमान जरूर धर. मात्र माझी जात इतर जातींपेक्षा श्रेष्ठ आहे असा दुराभिमान धरू नकोस."

तुमची मूळ औकातीची शेरेबाजी वरील शिकवणीच्या विरोधात आहे, म्हणूनच ती त्याज्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

मात्र माझी जात इतर जातींपेक्षा श्रेष्ठ आहे असा दुराभिमान धरू नकोस."

आणि बामन पुरुषाच्या तोंडापास्नं तयार झाले आणि शूद्र पायापास्नं तयार झाले, हेही रोज म्हनायला विसरु नकोस, हे नाही का सांगितले?

Rofl

प्रतिसाद ही सुविधा बंद झाली तरी कित्येकांनी आपल्या ओरिजिनल पाऊलखुणा सोडल्याच इथं Biggrin
म्हणतात ना.. त्याचा येळकोट जाईना

एकच माणूस माबोच्या विविध प्रकारच्या बीबींवर विविध रूपात विविध प्रकारे लिहू शकतो, कुस्तीही खेळू शकतो .. अशा महान आत्म्यास सा. दंडवत Proud

====================================

वाक्कडतिक्कड राज हमारा

??

आपले मुद्दे शांतपणे मांडा..

ड्युआय बनवून मांडले कि आक्रमकता येते त्याला पळपुटेपणा म्हणतात.

???

<< प्रत्यक्षात ब्राम्हण ही जात नसून विचार पद्धती आहे, वैचारिक कामाची पातळी आहे. >> शेकडो वर्षं प्रत्यक्षात जें घडलं, तें नेमकं उलटं होतं व त्याची संभावना असले मूळ अर्थ मांडून करूं पहाणं नुसतं हास्यास्पद नाही तर क्रूरपणाचं आहे !

शेकडो वर्षं प्रत्यक्षात जें घडलं, तें नेमकं उलटं होतं व त्याची संभावना असले मूळ अर्थ मांडून करूं पहाणं नुसतं हास्यास्पद नाही तर क्रूरपणाचं आहे !

+१
मामा पैलवान, त्याच पुण्यात शूद्रांना मुख्य रस्त्यावर यायला मनाई होती आणी आले तरी गळ्यात मडके बांधवे लागत असे.

बुडबुडा,

> आणि बामन पुरुषाच्या तोंडापास्नं तयार झाले आणि शूद्र पायापास्नं तयार झाले, हेही रोज म्हनायला विसरु
> नकोस, हे नाही का सांगितले?

वर्ण आणि जाती यांत फरक आहे हे आपणांस माहित असेलंच. नसल्यास माहित करून घ्या! पोटजातींचेही एकत्रीकरण झालं पाहिजे असं सयाजीराव महाराजांना वाटंत होतं. सावरकरांचाही तोच दृष्टीकोन होता.

'समाजपुरुषाच्या विविध अवयवांपासून विविध वर्ण उत्पन्न झाले' या विधानावर एव्हढा राग का आहे आपला? आपण स्वत:चेच वेगवेगळे अवयव बंद ठेवून पहा. काय परिणाम होतो ते लवकरच कळेल.

कळावे लोभ असावा.

आ.न.,
-गा.पै.

vijaykulkarni,

> मामा पैलवान, त्याच पुण्यात शूद्रांना मुख्य रस्त्यावर यायला मनाई होती आणी आले तरी गळ्यात मडके
> बांधवे लागत असे.

माझ्या मते गळ्यात मडकं बांधण्याची सक्ती ही शुद्ध लोणकढी आहे. एखादा मूळ संदर्भ असल्यास दाखवून द्यावा. मुख्य रस्त्यावर कदाचित महारांना प्रवेशबंदी असू शकेल. असल्यास अर्थातच ती समानतेच्या मूळ तत्त्वाविरुद्ध आहे.

आद्य शंकराचार्यांनी ज्याअर्थी चांडाळास गुरुस्थानी मानलं, त्याअर्थी हिंदू आदर्श काय आहे ते उघड आहे.

असो.

आजून एक सांगायचंय ते म्हंजे मी गामा पैलवान आहे. तुम्ही चक्क 'गा' चा 'मा' केलात! Proud असुदे, काही हरकत नाही. मात्र 'लॅपटॉप मांडीवर ठेव' हे वाक्य आपण उच्चारल्यास लोकांचा घोर गैरसमज होण्याची शक्यता आहे. एक आपली सावधगिरीची सूचना! Biggrin Light 1

आ.न.,
-गा.पै.

मी आजकाल 'आपली मराठी' या साईटवर घाशीराम कोतवाल नावाचे नाटक बघतो आहे. ते पाहून माझ्या मते इथल्या बर्‍याच लोकांनी फक्त तेव्हढे नाटक बघूनच ब्राह्मण काय होते ते ठरवले आहे! मलाहि तेव्हढेच माहित असते तर माझेहि मत ब्राह्मणांबद्दल वाईटच झाले असते.

अर्थात इतर काही वाचूनहि ब्राह्मणांमधे वाईट ब्राह्मण होते, याची मला खात्री आहे.
पण तरी हे ब्राह्मण लोक म्हणे हजार वर्षे समाजात स्वतःला श्रेष्ठ समजत नि इतर लोक हजार वर्षे मुकाट्याने त्यांच्या गुलामगिरीत रहात. म्हणजे इतर लोक एव्हढे 'हे!' म्हणजे काही अक्कल, शारिरीक ताकद, पैसे, यापैकी काहीहि नाही यांच्याकडे? अहो पशू सुद्धा काही नाही तर निदान संघटन करून जुलुमाविरुद्ध लढा देतात. या लोकांना हजार वर्षे हे जमले नाही?! कस्से हे लोक?!

अजूनहि नुसते रडगाणे नि शिव्या. हे ब्राह्मण काही तुमच्या शिव्या नि रडगाणी ऐकून बदलणार नाहीत हे तुमच्या टाळ्क्यात कधी घुसणार?

कुणि काही असे म्हणत नाही की , आम्ही हुषार आहोत, अभ्यास करू, आम्ही पैसा कमावू नि स्वतःच्या हिमतीवर इंजिनियर, डॉक्टर, वकील, मंत्री, उद्योगपती होऊ!

हजारो वर्षापासून नुसती भीक मागणे - आम्हाला सवलती, संधी 'द्या', आम्हाला शंकराचार्य 'करा!'. उद्या करतील ब्राह्मण तुम्हाला शंकराचार्य, वाट बघा!!
Proud Proud Proud

गामा पैलवान,
जीभ फारच सैल सुटली आहे तुमची. मास्तुरे, देशी, गामा पैलवान अश्या पुरूषी अवतारांची इतकी सवय झाली का तुम्हाला की आपल्या मूळ स्त्री रूपाचा विसर पडलाय? की धड पुरूष नाही आणि स्त्री नाही असा काही प्रकार झालाय? Proud
भाषा बरी वापरा जरा. तुमचे मूळ नाव चव्हाट्यावर आणून, दु:शासनाने द्रौपदीचे केले तसे तुमचे वस्त्रहरण करण्याची ईच्छा (सध्यातरी) नाही, पण ह्या फेक अवतारांच्या मागे लपून ही शिवराळ भाषा वापरणं बंद नाही केलं तर तेही करावं लागेल. वेळीच सुधरा!

तुमचे वस्त्रहरण करण्याची >> मी स्त्री? !! आई गं! घाबरले ना मी. माझं वस्त्रहरण करणार?. आणि ही भाषा शिवराळ नाही? म्हणजे आधुनिक दु:शासनच तुम्ही! दुश्शू, ऐक ना रे दुश्शू,अरे अश करू नये. आम्ही नाही वस्त्रहरण करू देत. जा गड्या. ..

मार्मिक - ऊगाच अंधारात तीर मारण्यापेक्षा गामा, मी अन मास्तुरे एकच कसे आहोत हे इथे दाखवा. चॅलेंज घ्याच आता!

दुश्शू घेतोस ना रे हे चॅलेंज? माझं मुळ नाव (स्त्री) काय आहे हे मलाही कळूदेतनागडे?

Pages