सिल्क.. एक बोल्ड, सॉफ्ट पॉर्न अक्ट्रेस. काहीच नाही पासून तिच्या नाववर चित्रपट चालण्याइतका प्रवास. कदाचित एका उबदार प्रेमळ सोबतीची कायमच आयुष्यात राहिलेली उणीव आणि अचानकरित्या केलेली आत्महत्या.. खरंतर हा चित्रपट बघायला जाताना मनात थोडी धाकधून होतीच की एखाद्या माणसाच्या वादग्रस्त आयुष्यावर चित्रपट काढायचा म्हणून नुसताच मसाला तर नसेल ना? पण सुदैवाने एक खूप चांगलं स्क्रिप्ट तितक्याच चांगल्या प्रकारे हाताळलं गेलय. मिलन लुथरियांची आधीची फिल्मोग्राफी इतकी इंप्रेसिव्ह नाहीये पण तरीही चांगलं दिग्दर्शन म्हणता येई़ल.
हल्लीच्या काळात इतका संवादप्रधान हिंदी चित्रपट अभावानेच पाहिलाय मी. व्हेज, नॉनव्हेज, द्वयर्थी, फिलॉसॉफिकल, मनोरंजक सगळ्या प्रकारच्या संवादांची चित्रपटात रेलचेल आहे. संवादाला टाळ्या आणि शिट्ट्या पडाव्या इतकी. ८० च्या काळातला टिपिकल माहोल उभा करत, त्याकाळच्या चित्रपटांवर मार्मिक भाष्य करत या सृष्टीतल्या अस्थिरतेवर पुन्हा एकदा नजर टाकलीये.
विद्या बालन एक मुरलेली अभिनेत्री आहेच त्यामुळे तिच्या अभिनयाबद्दल काही बोलायची गरज नाही. पण कितीही नाही म्हटलं तरी फर्स्ट हाफ मध्ये ती विद्या आहे हे जाणवत राहतं. थोडी बोल्ड पण विद्याच वाटते ती. सिल्कला ज्या लोकांनी पडद्यावर पाहिलंय त्यांना सहजच हा फरक कळून येईल. पण चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतशी ती अधिकाधिक सिल्क वाटत गेलिये. अर्थात सेकंड हाफ मध्ये इमोशनल, तणावाचे आणि संघर्षात्मक हावभाव जास्त आहेत हे कारण आहेच पण मेक अप पण का कोण जाणे त्या भागात जास्त जमून गेलाय.
अडीच तासांचा चित्रपट काढायचाच होता तर थोडा भर तिच्या चित्रपटपूर्व आयुष्यावर द्यायला हवा होता असं मला वाटलं पण हा चित्रपट सिल्क स्मितावर नाहीच्चे असंच सगळा क्रू म्हणायला लागल्यावर या वाटण्याला फार अर्थ उरत नाही.
नसीर तर नसीर आहे पण हा चित्रपट सबकुछ विद्या आहे. त्यांची जोडी भारीच आहे. इम्रान हश्मी पण सुसह्य आहे चक्क या चित्रपटात. एकता मुळे तुषारला मिळालेला रोल तसा लहान आहे ही अजून एक जमेची बाजू. अंजू महेंद्रूने केलेला फिल्म क्रिटीकचा रोल हा अभिनयाच्या दृष्टीने चांगलाच पण सिल्कच्या व्यक्तिमत्वाचा खरेपणा तिच्या या रुपामुळे जो कळणार नाही तो स्पष्ट बोलून मांडायला त्या व्यक्तिरेखेचा उपयोग केलाय. ते ही ठिकच म्हणा.
चांगलं वाईट, आदर्श, संस्कार, बरोबर, चूक याचा काथ्याकूट न करता एक व्यक्तिचित्रण म्हणून चित्रपट पाहिल्यास नक्कीच एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळतं. साडेतीन स्टार डिझर्व करणारा चित्रपट नक्कीच आहे हा.
The beautiful dirty picture..
Submitted by मी मुक्ता.. on 4 December, 2011 - 10:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बघावासा वाटतोय आता हा पिक्चर.
बघावासा वाटतोय आता हा पिक्चर. बघू या विकांताला जमल्यास
विद्या बालन एक थोर अभिनेत्री
विद्या बालन एक थोर अभिनेत्री आहे, हे हा चित्रपट सिद्ध करतो..अफलातून अभिनय तिनं केला आहे..निव्वळ ग्रेट!!
नासीरुद्दीन शाह यांनी सुरेख अभिनय केला आहे, हे नव्यानं काय सांगायचं?
बाकी इमरान, तुषार बकवास. संवाद, पटकथा, दिग्दर्शन, पार्श्वसंगीतही अपेक्षाभंग करणारे. चित्रपटात जसे संवाद असतात, तसेच संवाद प्रत्यक्षात चित्रपट बनवणार्यांच्या तोंडी सतत असणं, हा बाळबोधपणा आहे. शिवाय सिल्कचं व्यक्तिमत्त्व तसं का, काही व्यक्तींबद्दलची तिची मतं अचानक का बदलतात, अचानक तिला काही साक्षात्कार का होतात, हे कळत नाही. आधी व्यक्तींना वापरून घेणं आणि नंतर त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की कोसळणं, हे नीट समोर येत नाही. सगळा चित्रपट फार वरवरचा वाटत राहतो, आणि म्हणून 'खोया खोया चांद', 'लक बाय चान्स' , 'भूमिका' यांची आठवण येत राहते. शेवटचं सुफी गाणं, तुषारचे काही प्रसंग तर कमाल हास्यास्पद आहेत. मात्र पुस्तकी स्त्रीवाद्यांनी अवश्य बघावा असा का चित्रपट आहे.
या चित्रपटाचे जे काय तीनचारपाच तारे, ते सारे विद्या बालन आणि नासीरुद्दीन शाह या दोघांसाठी. ही अशी भूमिका करण्यासाठी धैर्य लागतं. आणि ते धैर्य विद्या बालनने दाखवलं, हे खास.. यापेक्षा अधिक चांगली पटकथा, बरे संवाद आणि प्रभावी दिग्दर्शन असतं, तर विद्याच्या कामाचं चीज झालं असतं.
हा चित्रपट पूर्णपणे सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारलेला नाही, असं चित्रपटकर्त्यांनी सांगितल्याने साम्यस्थळं शोधण्यात अर्थ नाही.
छान. एकंदर चांगले रिव्ह्यू
छान.
एकंदर चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. मीसुद्धा येत्या दोनेक दिवसात पाहणार हा सिनेमा.
विद्या बालन आणि नासिर दोघेही
विद्या बालन आणि नासिर दोघेही आवडते, त्यामूळे बघीनच.
मी सिल्क स्मिताला प्रत्यक्ष बघितलेय. पडद्यावर दिसायची त्यापेक्षा
खुपच साधी दिसायची ती. मी तिला स्टेजवर नाचताना बघितलेय,
तरिही.
एकाच चित्रपटावर दोन दोन धागे
रॉकस्टार बघायचा राहून गेला आधी रॉकस्टार मगच डर्टी बघायचा असं ठरवलं खरं पण बहीणीचं जाणं कॅन्सल झालं अन् म्हणून मी आधी डर्टी पिक्चर पाहिला. पिक्चर पाहून काय मिळतं? तर एन्टरटेनमेन्ट! आणि एन्टरटेनमेन्ट एन्टरटेनमेन्ट आणि एन्टरटेनमेन्ट म्हणजे विद्या बालन आहे इथं बोल्ड यट ब्युटिफूल!
हॅट्स ऑफ टू विद्या! नासिरकडून अॅवॉर्ड घेतानाचा डायलॉग, सुरुवातीचा डायलॉग , नासिरच्या बायकोबरोबरचं तिचं संभाषण लाजवाब!. तिची अॅक्टींग खास आहे एस्पेशली इन्टरव्हल नंतरची... इम्रान हाश्मीची अॅक्टिंगही जमल्ये
सगळेच डायलॉग्स एकसोएक आहेत! अफलातून! इम्रानचा आय अॅम नॉट अ पिम्प ही भारी!
नासिरचा रोल फिट्ट आहे! तुषारला फार स्कोप नाही म्हणा पण चालायचंच कपूर खानदान का दिवा यहाँ तो आना ही था|
जवळजवळ सगळाच पिक्चर विद्या बालनने खाल्ला आहे. आणि उरलेला इम्रान हाश्मीने.
पेपरातले रिव्ह्यू पाहून पिक्चर पाहायचा नसतो! आणि असा पिक्चर तर नाहीच! आता कदाचित रॉकस्टार पाहायच्या ऐवजी हाच परत एकदा पाहेन...
***
एकता कपूरचा हाच पिक्चर एका तराजूत आणि तिच्या बाकीच्या सास बहू सिरियल्स दुस र्यात राजूत तोलल्या तर हा पिक्चर वरचढ ठरतो.
मस्त चित्रपट आहे..
मस्त चित्रपट आहे.. आवडलाच.
विद्या, नसीर ग्रेट्च. आणि चक्क इम्रान हश्मी पण सुसह्य, फिट फॉर रोल.
एकदा बघाच.
मला आवडला पिक्चर. विद्या
मला आवडला पिक्चर. विद्या बालनला मानलं.
रिगलला सिंगल स्क्रीनवर स्टॉलमधे पाहिला त्यामुळे पब्लिकच्या 'जिवंत' प्रतिक्रिया कैक वर्षांनी ऐकायला/पहायला मिळाल्या
वन लायनर्सचा जरा अतिरेकच होतो. मला ते हे संवाद मुद्दाम एटीजचं स्पूफ करण्याकरता घातलेत की असं वाटायला लागलं नंतर. सिल्कचे काही वन लायनर आवडले. उदा.- क्या दिन आ गये, अब तो दुष्मन भी हमसे खफा नही होते.
सिल्कच्या करिअर(?)चा उतरता काळ, तिचं आधीचं एक्स्प्लॉयटेशन आणि आत्महत्येला कारणीभूत होणारा एकटेपणा या तीन गोष्टी निटशा एक्स्प्लोर झालेल्या नाहीत.
इमरानच्या तोंडचं सुफियाना गाणं अगदीच विसंगत वाटतं सिनेमात. ऐंशीच्या दशकालाही सूट होत नाही आणि प्लॉटलाही.
विषय पाहिला तर सिनेमा
विषय पाहिला तर सिनेमा (पहायचाच झाल्यास) आधी स्वतः पहावा आणि मगच फॅमिलीला दाखवावा कि कै असा विचार पडला होता. त्यात कालच्या सकाळला एकाच अंकात परीक्षण झकास आणि दुसरीकडे पब्लिकचे रिव्ह्युज मात्र उदास अशा दोन भिन्न प्रतिक्रिया पहायला मिळाल्या.. मग विचार केला. जाऊदे , पैसे वाचवू
पण इथं रिव्ह्युज पाहून रिस्क (!) घ्यायला हरकत नाही असं वाटतंय..
अवांतर : यातलं नेहमी वाजवून दाखवण्यात येणारं गाणं उलाला उलाला हे जितेंद्र - श्रीदेवी जोडीच्या मवाली या सिनेमातलं उय्यमा उय्यमा, मुश्किल ये क्या हो गई, तेरे बदन में तुफा उठा तो, साडी हवा हो गई .. या गाण्याच्या चालीवरून घेतलेलं आहे. संगीतकार म्हणून तर विशाल शेखर दिसतात.
भप्पी लाहिरीने हे गाणं गायलंय हे वाचल्यावर उलगडा झाला. मूळ गाण्याचा संगीतकार भप्पीदा आहे (त्याने ते कुठून उचललंय ते विचारू नका
थिल्लरपणा न करता, कुठेही
थिल्लरपणा न करता, कुठेही वाहावत न जाता लिहिलेला उत्तम सारांश...
थिल्लरपणा न करता, कुठेही
थिल्लरपणा न करता, कुठेही वाहावत न जाता<<<
याबद्दल अनुमोदन.
चित्रपट पाह्यला की बाकी कॉमेंटस.
आता हा "A+" मूव्ही असल्याने
आता हा "A+" मूव्ही असल्याने द्विअर्थी संवाद आहेतच पण चपखल वाटतात.
विद्या बालन ने खरेच श्रम घेतलेत - सगळ्याच बाबतीत!!
असो, सांगावं हे वाटेल, विद्याने ज्या प्रकारे संवाद्फेक केली आहे- उतरवते ती एकेकाची/ तिला व्हल्गर म्हणणार्या समाजाची, तिथे तिला खरी दाद- सिल्क आणि हिच्या साकारलेल्या पर्सनॅलिटीत किती साधर्म्य आहे आणि किती मसाला ते एकताच जाणो, पण विद्याचा अभिनय रॉक्ड!
पुरस्कार सोहळ्यात विद्याने केलेले भाषण म्हणा किंवा सूपरस्टारच्या बायकोला शाब्दिक लोळावणं म्हणा, नायला (पत्रकार) चा पार्टीचे तीन-तेरा करतानाची अॅक्टींग म्हणा, यशाने आलेला माज म्हणा आणि तो विरतानाच आलेलं फ्रस्ट्रेशन म्हणा- विद्या रि अ ली रॉक्ड!
नसीरने साकारलेला "कमर्शियल" माणूसही पहावाच.
"अरे, हिरो अनाथ सिक्टीज में होते थे, अब एटीज का जमाना है, हिरो को फॅमीली दो, बहन दो, उस बेहन को इज्जत दो, फिर लूटवॉओ..." ह्या नसीरच्या वाक्याने- आपण आणि आपल्या समाजाची मानसिकता उमटली आहे- आपण जशीजशी दशके पुढे जातो आहोत "जगण्यालाच" निर्ढावत चाल्लो आहोत, वाटून गेलं!
तिच्या अंग प्रदर्शनापेक्षाही तिच्या सशक्त अभिनयासाठी- संवादांसाठी- तिने साकारलेल्या निर्धास्त व्यक्तिमत्त्वासाठी हा मूव्ही बघायला हरकत नक्कीच नाही.
मलाही फार आवडला.. संवाद अगदी
मलाही फार आवडला.. संवाद अगदी सरळसोट.. समोरचा गपगार.. मग तो विद्याचा विवाहित शेजारी असो किंवा नसुरुद्दीन ची बायको असो किंवा अम्मा असो किंवा इतर सगळे.. सुपर्ब. खुप छान.. मला अंगप्रदर्शन नाही वाटलं.. त्या त्या ठिकाणी त्याची गरज होती असं मला वाटतं. विद्या हॅट्स ऑफ टु यु...
बघणारेय. परीक्षण मस्त.
बघणारेय. परीक्षण मस्त.
चित्रपटाचे संवाद मलाही
चित्रपटाचे संवाद मलाही आवडलेत.. एकदम थेट वार करतात. प्रेक्षकांच्या मनातही बारीकसारीक प्रश्न उमटू देत नाहीत
<<< थिल्लरपणा न करता, कुठेही वाहावत न जाता लिहिलेला उत्तम सारांश...>>> अनुमोदन!
राखी.. फुल टु अनुमोदन..
राखी.. फुल टु अनुमोदन.. अंगप्रदर्शनाच्या बाबतीत म्हणाल तर प्रमोशनने 'जे' चित्र अपेक्षित होत त्यामानाने काहीच वाटत नाही, यापेक्षाही बोल्ड सीन्स आजकाल सगळ्याच सिनेमांत असतातच अगदी फॅमिली ओरिएन्टेड म्हणवुन घेणार्यासुद्धा आणि ते ही विदाऊट ए ग्रेड. त्यामानाने यात काहीच नाहीय्(इम्रान हाश्मी असुन्ही
). त्या व्यक्तीरेखेला(संवादही आणि अंगप्रदर्शनही) साजेसे जे जे हव होत ते ते सगळ आहे. चांगला अभिनय पाहायला मिळेल की नाही या विचाराने कोणी जाणार नाही पण चक्क यात अभिनय्-संवादावरच सगळा सिनेमा आहे. भलत्याच अपेक्षेने लोक जातील तर हिरमोडही होऊ शकतो. 
चित्रपटाचे संवाद मलाही
चित्रपटाचे संवाद मलाही आवडलेत.. <<
मला वाट्टं... "वन्स अपॉन टाईम इन मुंबई" या चित्रपटातील संवाद ही याच संवादलेखकाने लिहलेले असावेत. त्यातील संवादपण टाळ्या, शिट्या मिळवणारे होते. रजत अरोरा नाव आहे का त्याचं?
हो.. रजत अरोराच आहे. पण मी
हो.. रजत अरोराच आहे. पण मी व्नन्स अपॉन.. पाहिला नव्हता..
रीव्ह्युला दाद दिलेल्या सगळ्यांचे खूप आभार..
मला वाट्टं... "वन्स अपॉन टाईम
मला वाट्टं... "वन्स अपॉन टाईम इन मुंबई" या चित्रपटातील संवाद ही याच संवादलेखकाने लिहलेले असावेत. त्यातील संवादपण टाळ्या, शिट्या मिळवणारे होते. रजत अरोरा नाव आहे का त्याचं?
>>>>>>>>>>>>>>
तो मिलन लुथ्रियाचा फेव्हरेट रायटर आहे सध्या..... जोडी हिट आहे.
विद्या बालनच्या वेगळ्या
विद्या बालनच्या वेगळ्या भुमिकेसाठी एकदा बघावा, इतपतच आवडला.
छान..
छान..
चित्रपट पाहताना दिग्दर्शकाने
चित्रपट पाहताना दिग्दर्शकाने डुलक्या काढल्यात असे वाटले. विद्याबालन मस्तच, पण स्क्रीप्टने तिला गचकवलेय.
भूमिका वगैरे पाहताना अंगावर येतो. हा चित्रपट असा भिडत नाही कुठेच.
सुफी गाणं कायच्या काय आहे. कशाला कोंबलेय ते असे मध्येच?
नसिरुद्दिनपण बोर. लेटडाऊन.
उथळ वरवरचा वाटला चित्रपट,
उथळ वरवरचा वाटला चित्रपट, सिल्क ची कहाणी कुठेही भिडत नाही मनाला, विद्या बालनच अंग प्रदर्शन, उद्दामपणा सगळाच अति वाटल . नसीर चा कमर्शियल ( कि स्वार्थी ) माणूस पटतो , पण तुषार कपूर आणि इम्रान हाश्मी दोघांच्याही भूमिका पटत नाहीत. आधीचा त्याचा तिरस्कार आणि नंतर प्रेमात पडण हे पण बेगडी वाटत. एकदा सहन केलं पण पुन्हा बघनार नाही आणि कोणाला सांगणार पण नाही. सिल्कची बेफिकिरी आणि चित्रपटात काम करण्यासाठी वाटेल ते करायची तयारी बघून तिचा हाच शेवट होणार असं वाटत आणि ती सहानभूती पण गमावून बसते.
चुकुन काल
चुकुन काल बघितला.........
चित्रपट हाईप जास्त केला गेला नको इतका... अभिनयापेक्षा अंगप्रदर्शनावरच जास्त भर दिला गेला.......मुळात चित्रपट चाललाच अंगप्रदर्शनावर... त्यापेक्षा फॅशन चित्रपट चांगला आहे नायिकेला त्यात अभिनयाला जास्त वाव आहे...