Submitted by वैवकु on 30 November, 2011 - 03:29
______________________
साकी,मधुरसप्याला
फसवी ती मधुशाला
त्यांनिच केला घात
______________________
ताडिन मीच निराशा
जन्मा घालिन आशा
दुःखांच्या प्रसवात
_______________________
माझी काल तिलाही
आली यादच नाही
सांगत होती रात
_______________________
माझा मीच इलाही*
भेटिन आजच बाई
ठरली भेट मनात
______________________
*इलाही = ईश्वर
गुलमोहर:
शेअर करा
या रचनेतील कडवी हायकू होवू
या रचनेतील कडवी हायकू होवू शकतात का .. हे जाणून घेण्याची फार इच्छा आहे .............
कृपया आपले मत व्यक्त करावे ही नम्र विनंती .