Submitted by Kiran.. on 18 November, 2011 - 12:37
चांदण्यांच्या दुधाची बासुंदी
त्यात बुडालेला चंद्र
सकाळ होती ना ती.. कि
पहिली कोजागिरीची रात्र
टिमटिमते होते तारे कि
लाजरे उघडमिट्ट नेत्र ...
चांदभूली होती किरणे कि
थरथरती सलज्ज गात्रं..
उफ्फ आज मात्र ..
ईएमआयची धुंदी
नि कोळसा कोळसा चंद्र
उगाच दमून उलटलेली
आणखी एक रात्र..
जडशीळ सकाळ
उठायचा त्रास
उतू जाणा-या दूधाचा
तिने लगबगीने विझवलेला गॅस
चहाचा घुटका
आणि
पेरूचा पापा म्हणत..कोंबलेले
पेन, रूमाल, चावी,
पाकिट नि पास
बाकि नुसतीच धांदल
आणि.......
ना कुछ खास
और ..???
छोड ना यार....!!!
इतकंच बास...
- Kiran
गुलमोहर:
शेअर करा
शिर्षक शब्दशः नका घेऊ
शिर्षक शब्दशः नका घेऊ
अस्तित्व टिकवण्याच्या धावपळीत
अस्तित्व टिकवण्याच्या धावपळीत जगणं इतिहासजमा होत चाललंय,
हे चांगलं मांडलंय.
--------------------------------------------------------------------------------------------------------
काही टायपो टाळले आणि थोडी पॉलीश केली तर अधिक प्रभावी होईल असं वाटतं.
उकाका धन्यवाद... टाईपो केले
उकाका
धन्यवाद...
टाईपो केले नीट
(No subject)
छान आहे. अशा प्रकारच्या कविता
छान आहे. अशा प्रकारच्या कविता जशा उत्स्फूर्त येतात तशाच मांडाव्या. नंतर केलेले संस्करण कधी कधी मजा घालवते.
छोड ना यार....!!!>>>अच्छा लगा
छोड ना यार....!!!>>>अच्छा लगा छोड दिया....!!!!!
और ......?? नही छोड
और ......??
नही छोड सकते..
कुछ तो लिखना पडेगा..
मित्रांनो.. मजा आली
मित्रांनो.. मजा आली ..
प्रत्येकाची असणारच !! यहीच तो लाईफ कविताप
संध्या.. छोड ना यार म्हणताना असलेली बोच
पण तुमच्या सर्वांच्या कविता येऊ द्या !!!
जीवन जगणे आणि जिवंत
जीवन जगणे आणि जिवंत राहण्यासाठी तडजोड करणे यात हातातून सुटणारं बरंच काही असतं..
ना कुछ खास और ..??? >> हो न
ना कुछ खास
और ..??? >> हो न यार....
छोड ना यार....!!!
इतकंच बास... ..... >>>बास्स नही यार........ त्या नव्याचा सतत शोध घेत रहावं....आत्ताचे क्षण 'कुछ खास' करण्यासाठी.
चातक लिही ना तुझी कविता..
चातक
लिही ना तुझी कविता..
वाट पाहींग
मला आवडली..
मला आवडली..
दक्षिणा ..ठँक्यु बाकि
दक्षिणा ..ठँक्यु
बाकि दखलपात्र / अदखलपात्र मंडळींचेही आभार..
आवडली बर्का चांदण्यांच्या
आवडली बर्का
चांदण्यांच्या दुधाची बासुंदी चंद्र बुडवून कधी खाल्ली नाही. कशी लागते?
उमेश वैद्यंना अनुमोदन! कविता
उमेश वैद्यंना अनुमोदन!
कविता जशी स्फुरली तशी टाकली तर वाचायला मजा येते.
मस्ताय कविता...
लिही ना तुझी कविता.. >> कशाला
लिही ना तुझी कविता.. >> कशाला त्या नसत्या उ चा पत्या?
नही छोडेंगे यार.. जबतक तू
नही छोडेंगे यार.. जबतक तू कविता नही लिखेगा
आवडली रे..
आवड्या
आवड्या
मस्तच!
मस्तच!
नही छोडेंगे यार.. जबतक तू
नही छोडेंगे यार.. जबतक तू कविता नही लिखेगा ..
वर्षुतै
असंच ना ??
जबतक ठीकसे नही लिखेगा
दोस्तांनो... आभार्स सर्वांचे
(No subject)
क्या बात है.
क्या बात है.
स्मितू, नेहा थँक्स
स्मितू, नेहा थँक्स
वाह !!!
वाह !!!
सही!! घरोघरी मातीच्या
सही!!
घरोघरी मातीच्या चुली!!
छोड ना यार....
ग्रेट
ग्रेट