Submitted by nikhil_jv on 14 August, 2008 - 06:32
पृथ्वीला विश्रांतीसाठी नभ पांघरतो शाल
नव्हे, तर तिला मिठीत घेण्यासाठी पसरवितो मायाजाल
या मायाजालात पृथ्वी खुळी फसते
निर्माण होणार्या अंधारावर रुसुनच बसते
पृथ्वी, नभाच्या लपंडावाने आकाशी तारे दिसु लागतात
रोजच्या या खेळाने ते अगणितच भासतात
पाने, फुले, वेली वार्यासोबत शांतचित्ताने डोलतात
खरे तर त्या वार्यासोबत गुपचुप प्रेमाच्या गोष्टी बोलतात
पशु, पक्षी, प्राणी घरट्यात शांत झोपी जातात
या निशेच्या आधारे सुख स्वप्नात न्हातात
असे या निशेचे गुढ ओळखले आहे का कोणी?
ठाऊक असेल तुम्हाला तर जपुन ठेवा मनी...
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा..
अरे वा.. मस्तच आहे कविता. असेच लिहीत रहा...
साधना..
क्या बात
क्या बात है निखिल... कल्पना खुपच छान आहे... लिहित रहा...
निखिल खुपच
निखिल खुपच छान. अजुन लिहि.
निखिलराव
निखिलराव रात्रीचे वर्णन छान आहे
छानै निखिल
छानै निखिल
छान
छान आहे
पृथ्वी, नभाच्या लपंडावाने आकाशी तारे दिसु लागतात
रोजच्या या खेळाने ते अगणितच भासतात
हे एकदम आवडले.