Love At First Sight....!!!

तुला पाहताच वाटलं मला
तुला पुर्वी आहे पाहिलं
आवरलेल मन माझं
बांध फोडून वाहिलं
कोण होतीस तू? आणि
कधी होती भेटलीस?
direct छातीत शिरत
थेट ह्रुदयालाच खेटलीस
किती घट्ट आवळलस?
तू माझ्या ह्रुदयाला...
नसानसा धवलं रक्त
श्वास लागले फुलायला
कान झाले गरम आणि
घशाला पडली कोरड
"माझं तुझ्यावर प्रेम आहे"
अशी आतल्या आत ओरड
होता नजरा-नजर आपली
कित्ती सुंदर लाजली
घंटी म्हणतात ना तीच..
माझी होती वाजली
"मी प्रेमात पडणार नाही"
म्हणा-याची अशी जिरते ऐट
प्रेमात पडण्या आधीच होतं
Love At First Sight....!!!

-सत्यजित.


मस्त आहे........आवडली......स्मित



मस्त आहे........आवडली......स्मित



मस्तच ...
.
-प्रिन्सेस...



तुला पाहताच वाटलं मला
तुला पुर्वी आहे पाहिलं
आवरलेल मन माझं
बांध फोडून वाहिलं
कोण होतीस तू? आणि
कधी होती भेटलीस?
direct छातीत शिरत
थेट ह्रुदयालाच खेटलीस
किती घट्ट आवळलस?
तू माझ्या ह्रुदयाला...
नसानसा धवलं रक्त
श्वास लागले फुलायला
कान झाले गरम आणि
घशाला पडली कोरड
"माझं तुझ्यावर प्रेम आहे"
अशी आतल्या आत ओरड
होता नजरा-नजर आपली
कित्ती सुंदर लाजली
घंटी म्हणतात ना तीच..
माझी होती वाजली
"मी प्रेमात पडणार नाही"
म्हणा-याची अशी जिरते ऐट
प्रेमात पडण्या आधीच होतं