शिवाजी पार्क, मुम्बई

शिवाजी पार्क परिसरातील मण्डळीसाठी नवीन गप्पान्चे पान!!

Submit to kanokani.com

mala aalela ek fwd ithe taaktoy ........... स्मित

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं
मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,
सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
पार्कात विराजती उद्यान गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं
म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!
विद्यार्जन नि विद्यादानाला
जे सदैव सप्रेम सादर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!

वसंत देसाई, वसंत प्रभू
सी रामचंद्र नि सुधीर फडके
दादरचेच तर होते
ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर
चक्क नौशादसाहेब झोपत होते!
मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची
‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे
लताजींची रिहर्सल चालायची!
असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…
म्हणूनच गडया,
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

छबिलदासचा फर्मास बटाटावडा
नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’
नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर
नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,
खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं
दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं
ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

शिवाजी पार्कच्या मैदानाला
एक किलोमीटरचा कटटा असतो,
तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत
इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!
चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो
’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा
मात्र निराळाच ढंग असतो!
पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी
काला-खटटा च्या गाडीवर मात्र
गि-हाईक हमेशा हजर असतं...
नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत
साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत
लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत
फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!

पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ
फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ
भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का
गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का
अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत
दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!
हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...

पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर
नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर
इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण
नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण
सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं
ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई
त्याच लोकांचं इथे घर असतं,
दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

राना, अलभ्य लाभ!
कुठे आहेस?

राना मस्तच... स्मित

वाह खुप छान लिहल आहात, वर्णन तर अप्रतिम स्मित

गजाभाउ नमस्कार, बरेच दिवस इथे नव्हतो, आता येत जाईन,
तुम्ही अजुन ही मायबोलीवर आहात हे पाहुन आ.नन्द झाला.......... स्मित

इन्द्र अरे मला आवडली म्हणुनच इथे टाकली़.

जुई नमस्कार ! अहो ही कविता माझी नाही, मला जो मेल आला त्यात मुळ लेखकाच नाव नव्हत.... नाही तर नक्कीच उल्लेख केला असता...... सर्व श्रेय मुळ लेखकाला स्मित

राना, जॉब बदलला की बदली झाली? आता नियमित येणे करावे. स्मित

तुला नवीन मायबोलीचा सराव नसेल तर हे काही दुवे उपयोगी पडतील ( 'फेवरीट'मध्ये टाक) -

१. संपूर्ण मायबोलीवरचे नवीन लेखन
http://www.maayboli.com/new4me_all - इथे सर्वसाधारणपणे ज्या बीबींवर नवे प्रतिसाद असतील त्या बीबी दिसतील (जुन्या मायबोलीवर मागच्या एक दिवसाचा सर्च होता त्या प्रकारे).

२. नवीन मायबोलीवर ग्रूपची संकल्पना आहे. म्हणजे थोडक्यात विभाग -
http://www.maayboli.com/og इथे गेल्यावर ते दिसतील. हव्या त्या ग्रूपचे सभासद व्हायचे असेल तर 'सामिल व्हा' या बटणावर टिचकी मार. मग सभासद झालेल्या ग्रूपमधील पानं वर दिलेल्या 'संपूर्ण मायबोलीवरचे नवीन लेख' दुव्यात दिसतील.

३. अंताक्षर्‍यांची पानं विरंगुळा या ग्रूपमध्ये आहेत. स्मित
http://www.maayboli.com/node/1559

४. आता आपण आपला आयडी देवनागरीमध्येही घेऊ शकतो. 'सभासदत्व' विभागात जाऊन बदलता येते.

५. मदतसमिती हिते हायेच -
http://www.maayboli.com/node/1500

हऽऽऽ र हऽऽऽ र महाऽऽदेव! हाहा

गजनना, पावलास रे बाबा !

अरे इतके दिवस चाच्पडतोय, पण एक मदतिला येइल तर शप्पथ !

कदाचित म्ह॑णत असतील, चाचपडतोय तेच बर... नाही तर शिळ्या कढीला परत उत यायचा........ फिदीफिदी

हाहा

riksha1.jpg

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

शिवाजि पार्का जागा हो परत ..

कशे आहात मुंबईकर. काळजी घ्या.

सगळे (ऑलमोस्ट) माबोकर सुखरूप भाई.

डुआय , घरी पोचलास ना? गुड टू नो.

मुंबईकर, सगळे ठीक आहेत ना रे? काळजी घ्या रे बाबांनो.

मंडळी आल इज वेल... धन्यवाद सगळ्यांचे स्मित