मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम

Submitted by पाषाणभेद on 28 August, 2011 - 03:07

नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.

आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्‍या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो. वेळ होताच त्यामुळे पहिल्यांदा न्युयॉर्क शहर बघायला घेतले. क्विन्स डोमेस्टीक ऐअर पोर्टवर आमची सामानाची बॅग सापडत नव्हती. म्हणून आम्ही तेथील काउंटरवर उभे असतांना एक मुलगी आमचे नाव पुकारत आली. तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत. येथे येण्याच्या आधी ते भारतात बंगळूरू येथे कामाला होते. मुलगीही तेथेच कामाला होती. तेथेच त्यांनी एकमेकांचे लग्न जुळवले. असो.

तर थोडक्यात आमचे सामान आम्हाला परत विनासायास मिळाले. आम्ही न्युयॉर्क शहर भटकण्यासाठी काही ठिकाणी टॅक्सी केली तर बर्‍याचदा शहर बससेवा वापरली. शहरबसमधले (City Bus) दरवाजे ड्रायव्हर अ‍ॅटोमॅटीक पद्धतीने उघडतो. येथे तिकीट आधीच काढावे लागते. पुण्यातल्या सिटीबससारखे येथे कंडक्टर नसतात. बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो.

M9 या क्रमांकाच्या बसने आम्ही ब्रॉडवे येथे फिरत होते. तेथे एका स्टॉपवर आम्ही उतरून पायी पायी उंच इमारती पाहत चाललो असतांना समोरून एक माणसांचा घोळका येत होता. त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. हातात तिरंगी ध्वज आणि बॅनर्स होते. आमच्या जावयांना तो ध्वज भारताचा वाटला. त्यांनी तसे मला बोलून दाखवले. आमचे 'हे' म्हणाले की कदाचीत तो नायजर या देशाचा ध्वज असावा. (पण नंतर तो भारताचाच ध्वज होता हे समजले. आमच्या जावयांना दुरूनही ध्वज ओळखता आला त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटला. असो.) तो जमाव जवळ आला तर त्यांच्या गांधी टोप्यांवर 'मी आण्णा आहे' असे लिहीलेले होते. म्हणजे ते इंग्रजीत "I am Aana" असेच होते पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले. त्यातील बरेचसे चेहेरे भारतीय होते. आमच्या जावयांनी त्यातील लोकांकडे चौकशी केली. त्यातून समजले की भारतात त्यावेळी आण्णा हजारेंचे दिल्लीत भ्रष्टाचार, लोकपाल याबाबत उपोषण चालू आहे व येथील भारतीय लोकांनी त्याला पाठींबा म्हणून हा मोर्चा काढला होता. हळूहळू तो मोर्चा पुढे निघून गेला. मलाही त्या मोर्चात जावेसे वाटले पण आम्हाला शहर बघायचे असल्याने तो मोह टाळला.

तो मोर्चा पुढे निघून गेल्यानंतर तेथे एक छोटा ध्वज खाली पडलेला दिसला. तेव्हड्यात आमच्या शेजारी मोर्चा बघत उभा असलेला एक गोरापान अमेरिकन युवक तेथे गेला अन त्याने तो ध्वज उचलला. त्यानंतर तो ध्वज त्याने माझ्या हातात दिला. त्याने मी भारतीय आहे हे माझ्या नेसलेल्या साडीवरून ओळखले असावे असा माझा अंदाज आहे. आम्ही तो ध्वज हातात घेतला व नंतर तो व्यवस्थित घडी घालून आमच्या बॅगेत ठेवला.

एका अमेरिकन युवकाने दुसर्‍या देशाच्या ध्वजालादेखील योग्य सन्मान दिल्याचे पाहून मला त्याचा अभिमान वाटला.

नंतर आम्ही बरीच अमेरीका पाहिली. त्यांच्यावरचे लेख नंतर कधीतरी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

LEKH CHHAN AAHE ....

FEMALE CHYA DRUSHTIKONA NE KA LIHILA AAHE..?

BAI NE LIHILA KI PURUSHHANE...?

जावई असतील हुशार पण तुमचे "हे" म्हणजे अगदीच "हे" दिसतायत. भारतासारखाच ध्वज असणार्‍या त्या देशाचा उच्चार नायगर असा होतो, नाय़जर असा नाही. गरज नसतांना अक्कल पाजळायची काही लोकांची खोड जाता जात नाही.

@HH:- कळतात हो टोमणे आम्हाला. अन मी पण इथलीच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात म्हटलं.
तुम्ही मोठ्या आलात मला उच्चार शिकविणार्‍या. अहो नायजर देशाचा उच्चार नायजर नाही होणार तर काय होईल? नायगर होण्याला तो काय अजगर आहे का? काहीतरीच बाई आपलं! (आपलं म्हणजे तुमचं हो.)

आता काही लोकं नायजर च्या ऐवजी नाइजर म्हणतात हाच काय तो फरक. (बहूदा ते हिंदी भाषी असतात.) थोडक्यात तेथे 'ग' च्या ऐवजी 'ज'च घाला नायजर या देशात.

(अवांतर: गेल्या उन्हाळ्यात आमचे जावई व आम्ही नायजर या देशात जावून आलो. तेथील वर्णनांचे लेख लिहू का? बाई बाई तेथल्या उन्हाळ्याचे काय सांगू? नुसता घाम निघत असे सारखा. )

हातच्या काकणांना आरसा कशाला? हा घ्या पुरावा:
नाइजर (उच्चारण सहायता /niːˈʒɛər/ या /ˈnaɪdʒɚ/); in French उच्चारित [niʒɛʁ]) अफ़्रीका का एक देश है. इसका नाम नाइजर नदी से पड़ा है.

गरज नसतांना अक्कल पाजळायची काही लोकांची खोड जाता जात नाही हे खरेच आहे म्हणायचे.

(हळू घ्या बरका HH. थोडेफार उच्चारात फरक पडणारच. अहो ब्रिटनमधले मुळ लोकदेखील प्रमाणबद्ध इंग्रजी बोलत नाहीत. मैं तो मज्जाक कर रही थी. (सौजन्य:- दया बेन - तारक मेहता उल्टा चष्मा) )

>>> तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत.

अहो, तुमच्या जावयांच फार कौतुक नका सांगू. अमेरिकेतली लहानलहान मुलं सुध्दा फाडफाड इंग्रजी बोलतात.
Biggrin

छान आहे लेख. उपरोध नसावा अशी आशा आहे. मी भारताबद्दल काही चांगले लिहीले की लोकांना तो कुत्सितपणा, उपरोध वाटतो. म्हणून विचारले.

पुष्कळ लोक वाईट काय झाले ते पाहून नेमके तेव्हढे लिहीतात, त्या ऐवजी तुम्ही चांगले काय ते लिहीलेत!

असेच भारताबद्दलहि लिहा. तिथे पण सांगण्यासारख्या अनेSक चांगल्या गोष्टी अनुभवाला येतात. स्वानुभव. पण मला लिहीता येत नाही एव्हढे चांगले. जरा बरे वाटेल, भारताबद्दल चांगले ऐकले, वाचले की.

अहो, भारतातल्यांनी नाही लिहीले चांगले तर जगात कुणीहि लिहिणार नाही हो, भारताबद्दल. त्यांना फक्त भारतीयांनी स्वतःचा झेंडा कचर्‍यात टाकला एव्हढेच दिसेल. पण तुम्ही इतरहि काही चांगल्या गोष्टी लिहील्यात तर त्यांनाहि कळेल. मग ते या वाईट गोष्टींबद्दल बोलले तरी एकदम सांगता येईल की अहो तो अपवाद होता.

अहो काका, अमेरिकेतल्या डिश वॉशर च काय कौतुक सांगताय, आमच्या कॉलनीत घरोघरी आहेत.
-एक मुलगा

सुंदर लेख, सर्वांनी आपापल्या राष्ट्रध्वजाचा असाच आदर केला पाहिजे.
-सॉलोमन मडगावकर, इस्त्राईल.

Rofl मस्त!!

>>अहो काका, अमेरिकेतल्या डिश वॉशर च काय कौतुक सांगताय, आमच्या कॉलनीत घरोघरी आहेत.
-एक मुलगा

एक मुलगा, डोळे तपासा. 'अमेरिकेला गेले होते' म्हणणारे काका कुठे बघितलेत तुम्ही. (असतीलही म्हणा तुमच्या ओळखीत.) Proud

लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो.
>>>
lek-javai IT madhe aahet mhanun natu zala ka? aajkal konipan amerikela jataat ani amhala bore marataat.

लेक जावयाने बाळ सांभाळायला बोलावले. नॅनीचा खर्च वाचतो शिवाय चांगले चुंगले खायला मिळते. काकू असे लेख रोज येतात हो. काही तरी नवीन लिहा अमेरिकेबद्दल.

अहो काका, अमेरिकेतल्या डिश वॉशर च काय कौतुक सांगताय, आमच्या कॉलनीत घरोघरी आहेत.
हे डिश वॉशर अमेरिकेतल्याच काय जगातल्या कुठल्याहि देशातल्या डिश वॉशरपेक्षा जास्त पॉवरफुल आहेत. पहिली गोष्ट ते अगदी हुबेहूब माणसासारखे दिसतात. कुठलीहि बटने दाबणे, इलेक्ट्रिक कनेक्शन असे लागत नाही. तोंडी सांगूनच पुरते. भांडी सुद्धा इकडे तिकडे पडले असतील तर ते आपणहून गोळा करतो. इतकेच काय, नुसते डिश वॉशिंगच काय. काही मॉडेल्स तर व्हॅक्युम करतात, आणि कपडे पण धुतात, चहा करून आणून देतात, बाजारातून सामान, लाँड्री तले कपडे आणणे अशीहि कामे करतो.
Happy

तुमच्या लेखावरून मला आमच्याही अमेरिकेच्या प्रवासाची आठवण झाली. सध्या मी मलेशियामधे आमच्या दुसर्‍या सुनबाईंकडे आलो आहे. आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे आलटून पालटून असतो. आम्ही अमेरिकेचे ग्रीन कार्ड ,मलेशियाचे रेड कार्ड आणि भारताचे रेशन कार्ड घेतले आहे. मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ. ना अजिबात कळत नाही त्यामुळे मला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवता येत नाही. एक मराठी व्यक्ती दुसर्‍या मराठी व्यक्तीला मागे ओढते ती अशी. माझे स्वप्न माझ्या मुलाने तरी पूर्ण करून दाखवले याचा मला अभिमान आहे.

डब्यात दशम्या घेऊन जाऊ नये. तुम्ही लकी ठरलात. कारण फक्त लुफ्तांसाने जर्मनीतून गेलात तरच त्या दशम्या टिकतात. बाकी सगळ्या एअरलाईनमधे त्या खराब होतात हे मी स्वानुभवाने सांगतो.

आम्ही अमेरिकेच्या प्रवासाला जाताना नेहमी कॅंपातल्या मॅकडोनाल्डमधून बर्गर बांधून घेतो. तिथल्या मॅनेजरला "Want to carry to US" असे वेगळे इंग्रजीत सांगितले की तो बरोबर सगळी तयारी करून देतो. तिथे उपासाचे वेगळे बर्गरपण मिळतात. जंगली महाराजवरच्या मॅकडोनाल्डमधल्या गावंढळ माणसांना "अमेरिकेला विमानातून बर्गर न्यायचे आहे" वगैरे काही कळत नाही. तिथे फक्त पुण्यातल्या पुण्यात खायचे बर्गर घ्यावेत.

अर्बाना शँपेन, इलिनॉयच्या लायब्ररीत भरपूर मराठी पुस्तके आहेत. ती कुठल्याही गावातून मागवता येतात. मी पुण्यात कधी मराठी पुस्तकं वाचत नाही. पण मी आल्यावर सूनबाईंच्या मागे लागून आमच्या गावातल्या लायब्ररीतर्फे मुद्दाम मागावून घेतली. ३ महिने लागले. पण फु़कट आहेत म्हटल्यावर का नको? आणि म्हटले माझ्यापेक्षा तिला आपल्या संस्कृतीची ओळख होईल.

अमेरिकेत गेलाच आहात ते लॅंडर , वायोमिंग इथे जाऊन या. तिथे डाऊनटाऊनमधे एक भारतीय सोनार राहतो. त्याला "आम्ही भारतातून अंदमानातून आलो आहोत" असे सांगितले तर तो स्वस्तात हिरे देतो.

सियाटलवरून बोइंगने मुख्यालय शिकागोला नेले आहे. पण सियाटलवाले अजूनही जी कस्टमर सर्वीस देतात ती शिकागोला मिळत नाही. तुम्ही जर एयरबसवाले मला २०% डिस्काऊंट देतायत असे सांगितले तर सियाटल मधले बोईंगवाले (फक्त सियाटल, शिकागो नाही !) तो नुसता मॅच करत नाही तर आणखी २% जास्त (एकूण २२%) डिस्काऊंट देतात. पण २०% पेक्षा जास्त सांगू नका कारण त्यांना बरोबर कळतं तुम्ही बंडल मारत आहात म्हणून. इतके ते हुषार असतात. आणि तुमचे केमन आयलंडमधे बॅंकेत खाते असेल तर विमानाची डिलिव्हरी तिकडे घ्यायची, म्हणजे टॅक्सपण वाचतो. मला ही आयडीया फार फार आवडली.

मायामीला जाणार असाल तर तिथल्या ब्रोकरची अपॉईंटमेंट घेऊन ठेवाच. घरं सध्या पुण्यापेक्षा मायामीला स्वस्त मिळतायत. आणि आता तिथल्या काँट्रॅक्टवर सही करायला इथून पेन घेऊन जाता येतं. तितकेच तुमचे पेनातले डॉलर वाचतात. मी अजून घर घेतलं नाही पण जाताना विमानातच हवाईसुंदरीकडून उसनं घेतलेलं पेन अजून तसंच मुद्दाम ठेवलं आहे. त्यामुळे घर घ्यायच्या अगोदरच डॉलर आणि रुपये दोन्ही वाचले. हा नवीन नियम झाला आहे. अगदी १००% टक्के माहिती बरोबर आहे. मागे बुश आला होता तेंव्हा अणुकरारावर सही करण्यासाठी त्यानं भारतात असून अमेरिकन पेन वापरलं. त्यामुळे त्यांना आता आपल्यालाही आपलं पेन वापरायची परवानगी द्यावीच लागली.

तुम्हाला अजून काही टीप्स हव्या असतील तर मला केंव्हाही विचारा.

>>पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले.
अहो जाउन आला असाल तुम्ही अमेरिकेला (जावयाच्या पैश्याने) पण म्हणून वाचकांना काही अगदीच हे समजू नका!
-मी पुणेकर Happy

Pages