चल शोधूया सखे ती

Submitted by सांजसंध्या on 14 August, 2011 - 01:32

चल शोधूया सखे ती...

( दिलेल्या सिच्युएशन वर कविता हा ऑर्कूटवरचा एक उपक्रम होता. दोन मैत्रिणी अनेक वर्षांनी भेटल्यानंतर त्या कशा रिअ‍ॅक्ट होतील, काय बोलतील .. अशी ती सिच्युएशन होती ...)

वाहूनि गेले पाणी, नेमेचि पावसांत
भिजलो पुन्हा गं दोघी, भेटूनि आसवात

काही न बोलताही, संवाद काय झाला
कळले ना हे कुणाला, दोघींस आठवांत

येता बटा रूपेरी, कानावरी या काही
परि ओल भेटण्याची, हिरवीच गं मनात

थकलेय आज मी ही , गुंतूनि जगरहाटी
आलीस घेऊनिया, तू गारवा उन्हांत

आठवतात का ग, स्वप्नांच्या तेलवाती
मी तेवल्या सखे ग, तुझियाच अंगणात

तो कोवळा बहर, प्राजक्तसम मोहर_
तो मोरपंखी काळ, गेला कुठे क्षणांत..

गेल्या दिशेस दोन, वाटा भविष्यवेधी
पायात गेले काटे, आलो गं वास्तवात

लावूनि सांजवाती, कातरवेळा आल्या
ते क्षणं रेशमाचे, जपलेत मी ऊरात

फुटले गं बंध सारे , लाटांस बांध नाही
चल शोधूया सखे ती, स्वप्ने या लोचनांत..

संध्या
07.02.2010

गुलमोहर: 

लावूनि सांजवाती, कातरवेळा आल्या
ते क्षणं रेशमाचे, जपलेत मी ऊरात >>> हे कडवे खास आवडले.....बाकी कविता छानच आहे Happy

छाsssन लिहिली आहेस गं.. Happy
स्वप्नांच्या तेलवाती, ओल भेटण्याची हिरवीच, वाटा भविष्यवेधी असे काही शब्दप्रयोग ज्जाम सूट झालेत..
Happy

वा Happy

सांस, सुरेख ! रुपेरी केस कशाला गं, कॉलेजमधुन बाहेर पडुन काही वर्षं झाली कि हेच फिलींग असतं. अचानक मैत्रिण भेटुन जुन्या गोष्टींना उजाळा मिळणं यासारखं मोठं सुख नाही. Happy

मंदार, मनिमाऊ, योगुली, राजेश्वर आणि स्मितू सर्वांचे आभार..

मनिमाऊ.. खरंय Happy
मला खूप पुढे गेलेला काळ दिसला Happy

फारच सुंदर कविता सांजसंध्या, किरणने मला लिंक दिली म्हणून वाचनात आली. य्यतल्या भावनेशी १००% सहमत.. दोन मैत्रिणींचं भेटणं हा एक वेगळाच उत्सव. उद्या या विषयावरची माझीही एक कविता देते..

Pages