हे आदिमा हे अंतिमा.....

Submitted by ar_diamonds on 25 July, 2008 - 06:29

अथपासून इथपर्यंत
इथपासून इतीपर्यंत,

पौर्णिमा ते पौर्णिमा
धरती ते चंद्रमा,

पावसाच्या थेंबात
थांबलेल्या पाण्यात,

वाहत्या झर्यात
संथ प्रवाहात,

सुर्याच्या तेजात
गहन अंधारात,

गोठलेल्या बर्फात,
पर्वत,नदी,सागरात,

अनंत आकाशात
मनाच्या गाभार्यात,

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी,
चल,अचल्,मनुष्य,प्राणी,

काळाच्या थराथरांतून,
सृष्टीच्या चराचरांतून,

कण अन् कण रचलेला,
कणाकणांतून भरलेला,

तुझाच अंश तुझीच प्रतिमा
हे आदिमा हे अंतिमा.....

गुलमोहर: