पथदीप

Submitted by Godeya on 23 July, 2008 - 12:30

कधीचाच भावत आहे
एकटाच मज हा पथदीप

सरुन गेल्या चार पिढ्या
अन्
विरुन गेली वर्षे अपार

बदलुन कुणाची लक्तरे
अन्
जोडुन पाहिली अस्तरे

नव्हाळीस जरी मुकलो
अन्
मनातुनही ना सुकलो

तरी
आठवते मजला अजूनही
त्या स्वर्णवर्खाची रात

गोदेय

गुलमोहर: