फेर

नाही वाटत भिती आता कुणाची
दाबून राहीलेल्या त्या आसवानाही

नाही वाटत आता चिन्ता उद्याची
रित्या झालेल्या आजच्या आभाळालाही

नाही राहिली आता आसक्ती जगण्याची
आजवर झालेल्या प्रेमाच्या सक्तीचीही

नाही सरली वाट चालण्याची जरी ही
फेर धरला आहे गत आठवणीनी तेथेही ......