Submitted by अज्ञात on 23 July, 2008 - 02:31
आतल्या आतले पाळणा पाळणे
आजही बाळझोळीतले लोळणे
तोच चंद्र आरसा खेळण्यात मांडणे
बाहुलीकाळजाचे मुके वागणे
जून झाल्या कथा मोहिनी परी तशीच
स्वप्नसृष्टीत नाही कशाचे उणे
वेध तरुणाईचे मधाचे पोवळे
रानवार्यातही झुळुक गाई गाणे
जोडनात्यातुनी गोत रुंदावले
चालले भूतकाळात वृद्ध पाहुणे
पाहतांना नवे जन्म जन्मती पुन्हा
जीर्ण गात्रांतही हे सुखाचे जिणे
रापल्या जीवनी हीच संजीवनी
खोल गर्तेतले वैभवी जागणे
जागतांना स्मरावे ना वयाचे चणे
भाग्यवंत माणसाचे बघ हेच मागणे
...........................अज्ञात
१२७९,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
पाहतांना
पाहतांना नवे जन्म जन्मती पुन्हा
जीर्ण गात्रांतही हे सुखाचे जिणे
वा ! छानच,
'जून झाल्या कथा मोहिनी परी तशीच'
ही ओळ जरा लांबल्या सारखी वाटते
गोदेय
थँक्स
थँक्स गोदेय. ओळ लांबली तरी मिटरमधे आहे.
...................अज्ञात