रात्रीचे १०:३० वाजले होते. वार शुक्रवार होता. नुकताच पाऊस संपला होता. नवरात्र सुरु होऊन आजचा तिसरा दिवस आणि माझी थर्ड शिफ्ट. दोन दिवस दांडीया खेळण्याच्या बहाण्याने जरा कुठे आखमिचौली झाली होती. ती पटेल अस वाटल होत......
दांडी मारण्याचा विचार मी पुसुन टाकला आणि शानिवार पेठेतल्या माझ्या चाळीतल्या घरामधुन मी शनिवारवाड्याच्या कंपनीच्या बसस्टॉपवर कंपनीची थर्ड शिफ्टची बस पकडायला निघालो होतो. खर तर हा जॉब मिळावा म्हणुन मी नवस बोलला होता. तो फेडला ही होता. माझ्या सर्व मित्रांच्या पेक्षा मला बछराज अॅटो लिमीटेड मधला तो जॉब जास्त पैसे देत होता. अनेक मित्र एक तर कमी पगाराची नोकरी करत होते किंवा चक्क ऑपरेटर म्हणुन काम करत होते. माझ्या मित्रांना माझा हेवा वाटत होता. आणि मला बंदिशाळा.
एक तिकीट नंबर ही त्या कंपनीतली माझी ओळख होती. सात हजार माणसांच्या रगाड्यात माणसाला या पेक्षा कोणती ओळख मिळणार होती. तीन वर्षांचा डिप्लोमा केलेल्याला माझ्यासारख्या अनेकांना या पेक्षा आणखी काय मिळणार होत ? भोंगा वाजला की कामाला हजर व्हायच. सुपरवायझर असल्यामुळे दांडी अशक्यच. मागच्याच महिन्यात हीट ट्रिटमेंट ह्या माझ्या शॉप मधे काम करणार्या दिक्षीतने माझ्या शिफ्ट पार्टनरने थर्ड शिफ्ट ला दांडी मारली होती. दुसर्या दिवशी त्याच्या कार्डपंचिंगच्या कार्डला चिठ्ठी होती. मॅनेजरला जनरल शिफ्टला भेटुन मगच घरी जाणे.
मी फर्स्ट शिफ्टला आलो तर दिक्षीत घरी गेलेला नव्हता. मी खुणेनेच विचारले काय राडा ? फॅक्टरीत काही खुणा ठरलेल्या होत्या. रविवारच्या मुक बधीरांसाठीच्या बातम्यात सरदारजी या शब्दासाठी पगडी ची खुण आणि त्या नंतर अंगठा वर म्हणजे मॅनेजरने भेटायला थांबवले आहे असा अर्थबोध झाला. मी का म्हणुन विचारले. त्यावर त्याने रिजेक्ट झालेल्या बॅच कडे बोट दाखवले. मी म्हणालो पण त्या दिवशी तु नव्हतास. आजारी होतास. यावर बॉस च्या केबीनच्या बाहेर गोरीला माकड साहेबी टोपी घालुन साहेबाच्या खुर्चीत बसलेल पोस्टर दाखवत त्या खालच्या वाक्याकडे त्याने निर्देश केला "बॉस इज ऑलवेज राईट".
जनरल मॅनेजर बक्षी ने आमचा मॅनेजर देशपांडे आणि दिक्षीत दोघांची दुपारी बारा वाजता परेड घेतली. देशपांडे रात्रभर झोपुन सकाळी ९ वाजता जनरल शिफ्टला आलेले आणि दिक्षीत थर्ड शिफ्ट जागवुन परेडला थांबला होता. "तबीयत खराब का मतलब जानते हो ? सरदार बक्षीने दोघांना दरडाऊन विचारले. "बारा लाख रुपयोंका नुकसान." कैसे खराब होती है तबियत ? सुपरवायझर नसल्यामुळे हीट ट्रिटमेंटच्या थर्ड शिफ्टला एक लॉट हीट ट्रिटमेंटच्या फर्नेस मध्ये जास्त वेळ आत राहिल्याने रिजेक्ट झाला होता. त्याची किंमत बक्षी सांगत होता.
कौनसे मुह से मॅनेजमेंट को जबाब दु बताओ मुझे मिस्टर दिक्षीत ?
सर थर्ड शिफ्ट मे अक्सर मुझे अॅसिडीटी होती है दिक्षीतने आपली बाजु मांडण्याचा प्रयत्न केला.
अॅसिडीटी ? मतलब तुम अबतक शिफ्ट ड्युटी के लिए हॅबीच्युअल नही हुवे. एसका एक ही इलाज है. थर्ड शिफ्ट के बाद वापस एक हफ्ता थर्ड शिफ्ट और फिर दांडी मारी तो देशपांडे इसे और एक हप्ता थर्ड मे बुलाना. सरदारजीने शिक्षा फर्मावली होती. यावर कोणतही कोर्ट नव्हत जिथे दाद मागता येईल. दिक्षीत ने बिचार्याने तेही केल.
अनेक जोडपी जेवण करुन ज्युस प्यायला बसली होती. माझ्या अंगात तेलाचा वास मारणारे कपडे आणि पायात सेफ्टी शुज नामक जड जड काहीतरी. मी पाय ओढत निघालो होतो. वातावरणात कामावर जाण्याचा उत्साह नव्हता. थर्ड शिफ्टला दांडी हा पर्याय संपलेला होता. एकच पर्याय आलीया भोगासी...
बस मधे माझ्यासारखे अनेक अभागी बसलेले होते. पुढचे बाक स्टाफ साठी राखीव हा अलिखीत नियम होता. शनिवार वाड्याच्या बसला मीच एक सिनीयर बाकी सगळे कामगार त्यामुळे बस ड्रायव्हरने मला बस सोडु का विचारले. मी मागे पाहिले. मागच्या सीटवरचे लोक काचेतुन रस्त्याकडे पहात होते. मिसाळ साहेब आणखी एक दोन मिनीट थांबुया. जनार्दन नाही आला. सहसा दांडी मारत नाही तो. मागच्या एका कामगाराने आवाज दिला.
मी ड्रायव्हरला इशारा केला स्टार्ट केलेली बस ड्रायव्हरने बंद केली. आम्ही वाट पाहु लागलो. अर्धाच मिनीट झाला असेल तोच जनार्दनचा मुलगा स्कुटरचा हॉर्न वाजवत जनार्दनला घेऊन आला. १८० पाउंडाचा जनार्दन दाण दाण पावल वाजवत बसमधे घुसला. ड्रायव्हरने पुन्हा स्टार्टर मारला आणि माझ्या डोळ्यावर पेंग आली.
अकुर्डीच्या कारखान्यात घुसताना ड्रायव्हरने वेग कमी न करता जो टर्न घेतला त्या हेलकाव्याने माझीच काय अनेकांची झोप उडाली. कॉर्पोरेट ऑफिस, त्याच्या बाजुच रंगीत कारंज मागे टाकुन आमच्या काळ्याकुट्ट झालेल्या शॉपच्या दरावाज्यात बसने स्टॉप घेतला. मिसाळ साहेब उतरा आली तुमची अंधार कोठडी. मागुन आवाज आला.
हीट ट्रिटमेंटला अनेक लोक घाबरुन असत. युनीयन मधे लिडर असणारे, दांड्या मारणारे, नियमा प्रमाणे उत्पादन न करणारे असे अनेक कैदी पाठवायची जागा म्हणजे हीट ट्रिटमेंट. अनेक भट्या ज्यात स्टील चे गेअर्स, शाफ्ट साधारण हजार डिग्री सेल्सीयस तपमानाला गरम करुन ऑइल मधे बुचकळले की झाले हार्ड. माणसांच ही इथे असच होई. नरम स्वभावचा माणुस इथे कडक होत असे आणि ज्याला शिक्षेसाठी इथे बदली केला तो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्ट करुन नरम पडत असे. १५ ऑगस्ट असो कि २६ जानेवारी, दिवाळीची रात्र असो की होळी कोणी ना कुणी इथे सकाळ दुपार रात्र पाळीला हजर असणार.
रात्रीचे बाराला दहा मिनीटे कमी होती. बर्नरच्या स्टोचा जसा आवाज असतो असे एका वेळी एक हजार बर्नस पेटले की जितका आवाज होईल अश्या आवाजाच्या हीट ट्रिटमेंट मधे मी शिरलो. शिफ्ट इनचार्ज च्या टेबलवर पोहोचलो. आधीच्या शिफ्टचा सुपरवायझर गुप्ता शिफ्ट रिपोर्ट लिहीत होता. गुप्ता मी आणि दिक्षीत तिघेही तीन वर्षांपुर्वी डिप्लोमा इन मेटर्ल्जी करुन इथे जॉइन झालो होतो. त्याच्या समोरच्या खुर्चीत बसत मी टेबलावर पडलेल्या जॉबने टेबल ठोकुन मी आल्याची वर्दी दिली. कॅप्टन मिसाळ थर्ड शिफ्टला आपल स्वागत आहे. माझ्या कडे न पहात लिहण्याचा वेग कमी करता गुप्ताने त्याच्या खास विनोदी शैलीत माझ स्वागत केल. गुप्ताची न जाणे कितवी पिढी महाराष्ट्रात होती. मराठीच काय मराठीतल्या सर्व विनोदी लेखकांना त्याने पचवले होते. त्याच्या मते हीट ट्रिटमेंटची उष्णता विसरण्याचा हा खात्रीचा मार्ग आहे. हीट ट्रिटमेंटच्या शिफ्ट सुपरवायझर्स ना त्यात स्वताला सुध्दा तो कॅप्टन म्हणत असे. कामगारांना फौजी म्हणत असे आणि देशपांडे साहेबांना कर्नल देशपांडे.
काय विशेष ? मी एका शब्दात पुढे काय वाढुन ठेवल आहे याचा अंदाज घेण्यासाठी तोंड उघडले. कॅप्टन मिसाळ फार काही नाही. भट्यात जाळायला एल पी जी शिल्लक नव्हता. रात्री आठ वाजता एल पी जी चा टँकर आला. नउ वाजता खाली झाला. नऊ वाजल्या पासुन सर्व फर्नेसचे बर्नस पुन्हा फायर केले. रिक्वायर्ड टेंपरचर्स जवळ जवळ सगळीकडे आलय. सेक्टर गियर्स अर्जंट आहेत. तो चार्ज पहिल्याप्रथम लोड करावा अशी गरज आहे अन्यथा उद्या सकाळी मशिन शॉप बंद पडेल. बाकी सर्व लिहलच आहे. आणि हो एक फौजी बदली होउन आलय. कुलकर्णी नाव त्याच. सकाळच्या शिफ्टला त्याला पाहिलच असशील. या माणसाला सेकंड शिफ्टची अॅलर्जी आहे. सेकंड शिफ्टला टाकला की त्याला फिटस येतात. अस अनेक ठिकाणी झाल म्हणुन बदली होत होत आपल्याकडे आलाय. आजपासुन थर्ड शिफ्ट
ही काय पीडा आहे ? याला रात्री फिट आली तर कुठ जाऊ याला घेऊन ? रात्री डॉक्टर पण नसतात. फक्त मेडीकल असिस्टंट असतो. कॅप्टन मिसाळ ऑर्डर इज ऑर्डर हसत हसत गुप्ता म्हणाला. तुला अस म्हणायच का की आपल्या डिपार्टमेंट मधले सगळे फौजी आपण सिलेक्ट केलेले आहेत ? काही फौजी तर आपल्या जन्माच्या आधीपासुन आहेत. मग आणखी एकाने काय फरक पडतो ?
गुप्ताच लॉजीक सरळ होत. फार चर्चा न करता सरळ ऑर्डर्स फॉलो करयच्या. त्यात कमी पडायच नाही. पुढील जबाबदारी वरिष्ठांची.
बारिक सारीक चर्चा होऊन गुप्ता सेकंड शिफ्ट संपवुन बस पकडायला निघाला. शिरस्त्या प्रमाणे मी त्याला दरवाज्याजवळ सोडायला आलो. "गुडलक कॅप्टन मिसाळ. अब तुम्हारे हवाले वतन साथियो." अस म्हणुन बसस्टॉपच्या दिशेने गुप्ता मार्गस्थ झाला.
कुलकर्णी माझ्याजवळ आला. " नमस्कार साहेब, मी कुलकर्णी पंधरा दिवसापुर्वी माझी इकडे बदली झाली आहे. पंधरा दिवसात लगेच शिफ्ट ? मला अजुन काम समजल नाही माणस समजली नाहीत. त्यातुन मला फिटस येतात." कुलकर्णीने मला एका दमात व्यथा सांगीतली.
" माझ्याशी डोक लढवायच नाही. या तक्रारी मला सांगायच्या नाहीत. ए पांडे घे रे याला तुमच्याकडे. चार्ज कसा लोड करायचा ते दाखव आणि आजपासुन काम शंभर टक्के पाहिजे समजल का ? " मी पण कुलकर्णीला दमात घेतला. कुलकर्णी न बोलता कामाला लागला.
शॉप मधे फिरुन सेकंड आणि थर्ड शिफ्टच मटेरीयल लवकरात लवकर कस फर्नेसच्या आत लोड होईल याचा अंदाज घेत सुचना देत परिस्थीतीवर नियंत्रण साधल. एक वाजला चहा आला. चहा प्यायला सगळे ऑपरेटर्स, हेल्पर्स आपल्या आपल्या गटात जमा झाले.
फर्स्ट आणि सेकंड शिफ्टची चहाची वेळ म्हणजे कामगारांची कामावर आलेला ताण घालवण्याची वेळ. वेगवेगळ्या गटात विभागलेले कामगार कुणी वारकरी असलेले भजन म्हणत तर कुठे राजकारणावर चर्चा असे, एक कामगार देशपांडे साहेबांपासुन सर्वांच्या नकला करे त्याच्या भोवती जमा होत. थर्ड शिफ्टला यात फारसा वेळ कुणी घालवत नसत प्रत्येकाला काम आट्पुन झोपायची घाई असे. एकदा चार्ज लोड झाले की काम फक्त फर्नेसचे तपमान नियंत्रणात आहे की नाही या कडे लक्ष ठेवण्याचे असे. मग एक ऑपरेटर दोन दोन फर्नेसवर लक्ष ठेवे आणि दुसरा झोपत असे. आळी पाळीने हे सकाळी ७ वाजेपर्येत चालु राही. शिफ्ट सुपरवायझर ही खुर्चीत झोप घेत इकडे सोयीस्कर दुर्लक्ष करी.
रात्री १ वाजता चहा झाला आणि उरलेले चार्ज करत असताना एकच गोंधळ झाला. कुलकर्णी खाली पडला होता. हातपाय झाडत होता. त्याच्या तोंडातुन फेस येत होता. मी डिस्पेंन्सरीला फोन लावला. काही मिनीटातच मेडीकल अटेंडंट चौगुले अॅम्ब्युलन्स घेऊन शॉप मधे पोहोचला. चौगुलेने कुलकर्णीला काही कामगारच्या मदतीने स्ट्रेचरवर घेतला आणि मी व एक कामगार यांच्या बरोबर कुलकर्णीला घेउन डिस्पेंन्सरीत पोहोचलो.
डिस्पेंनसरीत पोहोचताना चौगुले कुलकर्णीचे बी.पी. पहात होता. डिस्पेंनसरीला पोहोचेपर्यंत कुलकर्णी भानावर आला. तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. चौगुले मात्र मंद स्मित करत विचारत होता " आता कस वाटतय ? कुलकर्णी मान हलवुन बरा असल्याचा निर्देश करत होता. मला हे सर्व चमत्कारिक वाटत होत. खरतर मी भेदरलो होतो. कुलकर्णीची अवस्था पाहुन तो मरतो की काय अस वाटत असताना मेडीकल अटेंडंट चौगुले मात्र पहिल्या मिनीटापासुन अतिशय खात्रीने आणि मंद स्मित करीत त्यावर उपचार करत होता. कुलकर्णीची चौकशी करताना एक मिश्कील भाव त्याच्या चेहर्यावर तरळत होते.
आता कुलकर्णी खुपच बरा होता. चौगुलेने त्याला झोपवुन मला व माझ्या बरोबर आलेल्या कामगाराला परत शॉपवर जायला सांगितले. चौगुलेने माझ्या खांद्यावर थोपटत म्हणले सकाळ पर्यंत तो ठीक होईल पण यापुढे त्याला थर्ड शिफ्ट देण्यात रिस्क आहे. येवढा रिपोर्ट मॅनेजमेंटला द्या म्हणजे झाल. मी शॉपमधे परत आलो. तो पर्यंत सगळ्या फर्नेस आणि अर्जंट मटेरीयल लोड झाले होते. तीन वाजता ठराविक ऑपरेटर्स सोडता सगळे शॉप निद्राधीन झाले होते. मी मात्र टक्क जागा होतो. एकाच घटनेचा विचार करत की या माणसाला फक्त सेकंड किंवा थर्ड शिफ्टलाच फिटस कशा येतात ?
दुसर्या दिवशी शनिवार वाड्याच्या स्टॉप ला चौगुले बस मधे बसलेले दिसले. मी पण त्यांच्या शेजारी बसुन चौकशी केली " आज इकडे ?"
हो माझी सासुरवाडी आहे कसब्यात. आज जेवायला बोलावल होत संध्याकाळी. घरचे सगळे मुक्कामी आहेत. म्हणुन मी इथुनच बसने कंपनीत जायच ठरवल.
काल चौगुले हसत होते आणि मी टेन्शन मधे होतो म्हणुन एक खडा मारुन पाहिला.
" हे फिटस येण जीवघेण ठरु शकत का ?
" फिट येताना व्यक्ती किती सावध आहे आणि पडलीच तर कशी पडते यावर बरच काही अवलंबुन असत. वाहन चालवताना फिट आली तर मग फारच जोखमीच होत. कुलकर्णी यासाठीच सेकंड थर्ड शिफ्ट नको म्हणतो. फर्स्ट शिफ्ट ला लाईट किंवा फारशी मशिनच्या जवळ नसलेली काम उपलब्ध असतात."
यावर काही वैद्यकीय उपाय नसतो का ?" मी विचारले
हो, असतो तर. एक गोळी रोज आयुष्यभर न चुकता घ्यावी लागते. आणि चुकली तर अशी फिट येण्याचा संभव असतो.
चौगुले साहेब, सेकंड थर्ड शिफ्ट नको म्हणण समजु शकतो पण कुलकर्णीला सेकंड थर्ड शिफ्टलाच कशी फिट येते ?
याची बरीच कारण असु शकतात. ही गोळी साधरण पणे सकाळी घावी लागते. ती चुकली तर त्याचा इफेक्ट काही तासांनी दिसतो. ही वेळ जेव्हा कुलकर्णी सेकंड थर्ड शिफ्टला असतो तेव्हाच येत असावी.
पण एखाद्या माणसाने सेकंड थर्ड शिफ्ट येणारच म्हणल्यावर गोळीच्या बाबतीत जागरुक का असु नये ?
परिणामी किती माणसांना त्याच्या मागे पळावे लागते ? याने सहानभुती मिळण्याऐवजी उलट परिणाम होतो.
खर आहे तुमच मिसाळसाहेब. पण जर फिटस चा हुकमी एक्का वापरायची सवय लागुन परिणाम साधत असेल तर माणुस दुसर्याला काय त्रास होतो याचा थोडीच विचार करतो ?
काय म्हणायच आहे तुम्हाला चौगुले साहेब?
माझी शंका आहे की कुलकर्णीला फिटस येतच नाहीत. कुलकर्णी एक उत्कृष्ट बनाव करतो फिटस चा.
काय सांगता ? इतका बेमालुम ?
माझी शंकाच आहे खात्री नाही. उद्या मेडीकल सायन्स आणखी पुढे गेल तर याच पितळ उघड पडु शकेल.
फिटस मेंदुमधील द्रव पदार्थ किंवा अन्य दोषांमुळे नसुन अनेक वाहिन्यांच जाळ असलेल्या असलेल्या मेंदुत काही वाहिन्यात काही कारणाने दोष निर्माण होते. अश्या वेळेला मेंदुची सर्वच कार्ये थंड पडतात. ही प्रक्रिया २-४ मिनीट घडते. नंतर रोगी भानावर येतो व हळु हळु पुर्ववत होतो.
आज पर्यंत योगायोगाने मीच १२ पैकी १० वेळा कुलकर्णीला फिटस च्या वेळेला अटेंड केलय. नंतर या विषयात त्याच्याशी बोललोय आणि त्यामुळे ही शंका वाढली आहे.
प्रत्येक वेळी जी गोळी कुलकर्णी मी रोज घेतो म्हणुन सांगतो ती गोळ्यांची स्ट्रीप खुप जुनी आहे. त्याच्या नकळत मी अनेक वेळा त्याची डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग नोंद करुन ठेवली आहे. दर वेळेला हीच तारीख दिसते. यावरुन तो गोळी घेतच नसावा कारण त्याला असा कोणता विकार नसावा.
मागील चार वेळेला मी तु कोणत्या डॉक्टर्स ना या विकारासाठी भेटतो असे विचारले की दर वेळेला कुलकर्णी सगळी फाईल तुम्हाला दाखवतो असे सांगतो पण प्रत्यक्षात असे काहीच करत नाही.
तिसरे आणि महत्वाचे कारण बर्याच वेळेला या फिटस नंतर रोगी मानसीक रित्या खचतो, त्याला शक्ती येण्यास दोन चार दिवसांचा कालावधी जातो. पण कुलकर्णीच तस नाही तो दुसर्या दिवशी खडखडीत बरा होतो. कामावर पण येतो. इतकच काय फीटस आलेल्या दिवशी आपण जी अॅम्ब्युलन्स द्वारे त्याला घरी पाठवतो त्याच्या ड्रायव्हर ला तो त्याला सोडायला घरात न येण्याची सुचना देतो व फिटस नंतर आपल्या पायांनी दोन जीने चढुन तो आपल्या घरात जातो.
पण आज तरी हे नाटक आहे असे सिध्द करणे अवधड आहे. परदेशात आता एम्.आर.आय नावाची पध्दती आली आहे ज्यातुन अधीक निदान करणे शक्य आहे सध्यातरी ती भारतात उपलब्ध नाही आणि असलीच तर खुप महाग असेल. शिवाय कंपनीने असा रस घेण्याची पध्दत अद्याप नाही. शिवाय हे सिध्द झाले नाही तर कामगार तुम्ही मानसीक छ्ळ करता असा दावा करु शकेल. सबब मिसाळ साहेब जे ऐकल ते सार विसरुन जा.
हमम... पण काय हो चौगुले साहेब त्याचा कायम फर्स्ट शिफ्ट मागण्यामागे काय मोटीव्ह असेल ? इथे कुणाला शिफ्ट ड्युटी आवडते ? पण मी आणि तुम्ही तर अनेक वर्ष हे करत आहात मग आपल्याला का अशी नाटक कराविशी वाटत ?
त्याच काय आहे मिसाळ साहेब. लहानपणी शाळेत जायच्या वेळेला पोटात दुखणारी मुल आपण पहातो. ही सवय एकमेकांच अनुकरण करुन लागते. यावर खर ओळखुन जर पालकांनी वेळीच सुधारणा घडवुन आणली नाही तर पुढे कामाच्या वेळी हमखास आजारी पडायची सवय औद्योगीक काय अन्य सरकारी निमसरकारी कार्यालयात नवीन नाही.
कुलकर्णी मला ओळखत नाही पण मी त्याच्याच शाळेत होतो. आमच्या वेळी शाळेत शिक्षक खुप आणि वाट्टेल तिथे मारायचे. कुलकर्णी मला ज्युनीयर होता पण त्याची मार खाऊन बेशुध्द पडण्याची नाटकं मला चांगली परिचीत आहेत. अस घडल की शिक्षक घाबरुन जात आणि पुन्हा त्याला हात लावत नसत.
चौगुलेसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल पण नोकरीच्या ठिकाणी इतकी रिस्क घेऊन हे करायच म्हणजे ?
मिसाळ साहेब मी कुलकर्णीच्या केसचा खुप अभ्यास केलाय. कुलकर्णीच लग्न होऊन अनेक वर्ष झाली. अद्याप त्याला मुलबाळ नाही. आपल्या कंपनीच्या सोशलवर्कर मॅडमने त्याला मुल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता पण त्याला तो मान्य नाही.
अश्या परिस्थीतीत नवरा बायको यांना समाजात मिसळायला प्रश्न पडतात. परिणामी त्या दोघांना एकमेकांशिवाय जगणे अशक्य होऊन बसते. मग कोणत्याही कामाला साधे भाजी आणायला दोघे एकत्रच बाहेर पडतात असा माझा या परिस्थीतल्या जोडप्याविषयीचा अभ्यास आहे. ही जोडपी, यांच्या मुल न होण्याबाबत चर्चा होते म्हणुन समाजात मिसळणे टाळतात. असलेच तर त्यांना खास समजुन घेणारे अगदी ठराविक मित्र किंवा आप्त यांना ते भेटतात. मग त्यांच जीवन एकमेकांशिवाय निरस होऊन जात.
कुलकर्णीची पत्नी नोकरी करत नाही. घरातच असते. संध्याकाळी बाहेर ती जनरितीमुळे एकटी पडु शकत नसेल. आणि महिनाभरात एक सेकंड आणि एक थर्ड शिफ्ट येणारच म्हणजे महिन्यातले पंधरा दिवस संध्याकाळी पती घरी नाही ही परिस्थीती असते.
हा सगळा अंदाज आहे खात्री नाही. मला याचा अंदाज आहे हे कुलकर्णीलाही माहित असाव.
कुलकर्णीला मी खुप विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला पण तो बोलत नाही. या उलट, तो नाटक करतो हे सिध्द झाले तर त्याची आहे ती नोकरी जाण्याची भिती आहे म्हणुन मी फार चर्चा करत नाही. नाईलाजास्तव त्याच्या सुपरवायझरला याला शक्यतो त्याला फर्स्ट शिफ्ट देण्याचे सुचवतो.
"चौगुले साहेब, मी आभारी आहे. आता मला कुलकर्णीचा राग येत नाही. उलट थोडी सहानभुती वाटते. मी प्रयत्न करीन की कुलकर्णी माझ्याच शॉपला राहिल आणि कायम फर्स्ट शिफ्टलाच येईल.
मी शॉपला आलो. आज कुलकर्णी थर्ड शिफ्टला हजर होता. मी सावध पवित्रा घेतला. माझ्या मनात काय आहे ते मला त्याला समजु द्यायच नव्हत. माझा अनुभव मला सांगत होता करुदे त्याला एक आठवडा पुर्ण थर्ड शिफ्ट. मग पाहुयात जेव्हा पुढच्या आठवड्याचा शिफ्ट प्रोग्रॅम तयार होईल त्याच वेळेला हा बदल करु. मला सहानभुती निर्माण होते हे त्याला जाणवल तर त्याच्या आणखी काही मागण्या पुढे येतील.
लेबर कमिशनर देशमुखसाहेबांच सुपरवायझरी ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या वेळेला सांगीतलेल एक वाक्य मनात घोळत होत. "शिफ्ट ड्युटी खरतर अनैसर्गिकच. पण औद्योगीक वातावरणात त्याला पर्याय नाही. अश्या वेळी कामगार दांड्या मारणार, शिफ्ट बदलुन मागणार, झोपणार. सुपरवायझरने त्याच्या कारणांचा अभ्यासकरुन योग्य ती सहानभुती दाखवुन निर्णय घेणे आवश्यकच आहे. सुपरवायझरच्या कोटाच्या आत तुम्ही एक जिवंत माणुस अहात हे विसरु नका. प्राप्त परिस्थीतीत मध्यम मार्ग शोधा ज्याने तुमच आणि कामगारांच जीवन जरास सुसह्य होईल."
कुलकर्णी आज कोणतीही तक्रार न करता कामाला लागला होता आणि मी ही.
छान आहे...
छान आहे...
आवडली. छान लिहिली आहे. पण
आवडली. छान लिहिली आहे.
पण कथेचा शेवट झाला असे वाटले नाही.
फिक्शन वाटत नाही..
फिक्शन वाटत नाही.. वास्तवातलीच वाटतीये.
सुरेख लिहीली आहे. कुठेही
सुरेख लिहीली आहे. कुठेही अडखळत नाही.......
आवडेश
छान आहे!! आवडली.
छान आहे!! आवडली.
चांगली लिहिलीये. काळ कुठला
चांगली लिहिलीये.
काळ कुठला दाखवलाय? एम आर आय हे आता तेवढे दुर्लभ राह्यलेले नाही सामान्य माणसांसाठी.
शेवट सोडून दिला असं वाटतंय.
आवडली
आवडली
चांगली आहे.
चांगली आहे.
मधुचंद्र साहेब, गोष्ट लय
मधुचंद्र साहेब, गोष्ट लय आवडली बघा
छान आहे, मजा आली वाचताना.
छान आहे, मजा आली वाचताना.
सुपर्व्हायज़र्स च्या संवेदन-
सुपर्व्हायज़र्स च्या संवेदन- प्रशिक्षणा च्या कोर्स साठी उपयोगी पडेल अशी कथा आहे.
छान आहे!
छान आहे!
आवडली. छान लिहिली आहे. पण
आवडली. छान लिहिली आहे.
पण कथेचा शेवट झाला असे वाटले नाही.>> मलाही...
छान आहे.
छान आहे.
खुप छान आहे! हे ललित असेल,
खुप छान आहे! हे ललित असेल, असे वाटले होते, पण कथा निघाली. तरीही नक्कीच वास्तव मांडणारीच कथा आहे ही. युनिव्हर्सिटीत जॉब ओव्हरलोड आणि बर्न आऊट या विषयावर प्रोजेक्ट केला होता. त्याच्या सर्व्हे रिपोर्टच्या निकालानुसार ही समस्या असणार्या देशांमध्ये चीन, कोरीया, व्हिएतनाम यासारख्या आशियातील देशांची संख्या सर्वाधिक होती. त्या रिपोर्टनुसार त्या देशांतील लोकांचे कामाचे तास, स्वरुप इ. बघून मन अगदी सुन्न झाले होते. आज ही कथा वाचून ते सगळं आठवलं. रोजचं अन्न मिळवण्यासाठी काही लोकांना किती अग्निदिव्यातून जावे लागते, हेच यातून जाणवले. अशा सर्व कुलकर्णींविषयी मन कणवेने भरुन आले आहे.
नितीन, तुमची शैली खुपच छान आहे. मागे पण तुमची अशीच कामगारांसंबंधीची एक कथा वाचल्याचे आठवते. हे जग जवळून पाहण्याचा काहीच अनुभव नाही, त्यामुळे तुमच्या लेखनातून या जगाची ओळख आणि एक नवीन दृष्टी मिळते आहे. शेवटचा पॅरेग्राफ- लेबर कमिशनर देशमुखसाहेबांचं सुपरवायझरी ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या वेळेला सांगीतलेलं वाक्य सांगणारा- सुपरवायझरच्या मानसिक आणि शारिरीक अशा दुहेरी ताणाची जाणीव करुन देणारा होता.
>>>अनेक जोडपी जेवण करुन ज्युस प्यायला बसली होती. माझ्या अंगात तेलाचा वास मारणारे कपडे आणि पायात सेफ्टी शुज नामक जड जड काहीतरी. मी पाय ओढत निघालो होतो. वातावरणात कामावर जाण्याचा उत्साह नव्हता. थर्ड शिफ्टला दांडी हा पर्याय संपलेला होता. एकच पर्याय आलीया भोगासी...<<< खुप त्रास झाला हे वाचून.... खड्डा पडला मनात...
छान लिहील आहेस.. आवडल!!!
छान लिहील आहेस.. आवडल!!!
छान आहे मलाही आवडलं
छान आहे मलाही आवडलं
लई भारि .................छान
लई भारि .................छान आहे
आवडली.
आवडली.
छान आहे कथा. आवडली.
छान आहे कथा. आवडली.
ग्रेट !! आवडली. मी पण एका
ग्रेट !!
आवडली. मी पण एका बेअरिंगच्या कारखान्यात सलग महिनाभर थर्ड शिफ्ट केली आहे.
हम्म!
हम्म!
चांगली आहे. सत्यघटनेवर आधारीत
चांगली आहे. सत्यघटनेवर आधारीत आहे का?
छान उतरलय .. आवडली कथा
छान उतरलय .. आवडली कथा
कथा आवडली. मात्र >>>रात्रीचे
कथा आवडली. मात्र
>>>रात्रीचे १०:३० वाजले होते. वार शुक्रवार होता. नुकताच पाऊस संपला होता. नवरात्र सुरु होऊन आजचा तिसरा दिवस आणि माझी थर्ड शिफ्ट. दोन दिवस दांडीया खेळण्याच्या बहाण्याने जरा कुठे आखमिचौली झाली होती. ती पटेल अस वाटल होत......<<
या उतार्याचे कथेमध्ये काहीच प्रयोजन नव्हते. आखमिचौली झाली.. ती पटेल असे वाटले.. यावरून कथा या दांडीयामध्ये असलेल्या तुमची आणि तिची असावी असे वाटले.
असो..
कथा आवडली.
मला अशी जवळच्या नातेवाइकात
मला अशी जवळच्या नातेवाइकात केस माहित आहे त्यांना आपल्या मनाविरुद्ध झाले की फीट येत असे.
पडताना पण त्या बरोबर कोपरा वगैरे चुकवुन लागणार नाही अशा पडत. पण हे नाटक नसते.
फीट खरोखरच असते फक्त त्याचे कारण शारिरीक नसुन मानसशास्त्रिय असते.
आपण शरिर आणि मन वेग्वेगळे समजतो पण ते बरेच गुंतलेले असतात. माणसाच्या नकळत पण मनाच्या दडपणाखालि शरिराला अशी फीट येउ शकते.
कथा खुप आवडली.
मस्त ओ भाऊ, सुरवातीपासून
मस्त ओ भाऊ, सुरवातीपासून शेवटापरेंत कथेची पकड छान होती.
लिहीत रहा.
आवडली. कालच प्रतिक्रिया
आवडली. कालच प्रतिक्रिया लिहीणार होतो. पण गुगल क्रोम डाउनलोड केल्यापासुन एक प्रॉब्लेम झालाय. काही दुरुस्त करायला गेलो की जुन्या अक्षरांची चळतच जोडली जाते. शेवटी आज पुन्हा जुने गुगल लोड केले आणि लिहिणयास बसलो.
लेखन आवडले. हा प्रत्यक्ष अनुभव आहे अशी माझी खात्री आहे. तरी विचारतो की कथा का अनुभव ?
दुसरे असे की सुमारे १५ वर्षापुर्वी सकाळ मधे राजीव साने यानी ३-४ महिने थर्ड शीफ्ट या नावाने सदर चालवले होते. त्यात फॅक्टरी लाईफ चितारले होते. तुम्ही अशी एक मालिका मा.बो. करांसाठी का लिहित नाही?
धन्यवाद !
तुम्ही अशी एक मालिका मा.बो.
तुम्ही अशी एक मालिका मा.बो. करांसाठी का लिहित नाही?>>>> आवडेल असं काही लिहिलं तर वाचायला... नि३, नक्की विचार करा यावर
कथा अर्ध्यावरच सोडलीये की
कथा अर्ध्यावरच सोडलीये की क्रमशः चा बोर्ड लावायला विसरले? त्या पहिल्या परिच्छेदातली "दांडियावाली ती" चा संबंध कळत नाहीये.
पण चांगली उतरलीये.
Pages