मी प्रेम कुणावर केले......

Submitted by ar_diamonds on 21 July, 2008 - 06:35

जगण्याची ही आस असुरी
शेशवाची गरज माऊली,
सांजसकाळी वेळीअवेळी
मी दुग्धपानंच केले......मी प्रेम कुणावर केले......

बालपणं खेळी घालवले
घरात पाऊल कधी न टिकले,
निस्वार्थ अशी माता ती प्रेमळ
मायेत तिच्या मन कधी न रमले.......मी प्रेम कुणावर केले......

तारूण्याची नजर आंधळी
जगं हे सारे सुंदर दिसले,
स्वार्थी प्रेमाचे आकर्र्षण
मोहक्षणी हे कधी न कळले.......मी प्रेम कुणावर केले......

कर्तुत्वाची मनी झळाळी
`मी' पणाची हवा विषारी,
अपत्यांवर हुकूम लादले
कुटूंबप्रेमी कधी न द्रवले.......मी प्रेम कुणावर केले......

ह्रदयी जेंव्हा धडधडले
दशदिशांनी अंधारले,
वार्धक्याची जाणीव होता
शरीर सारे थरथरले.........मी प्रेम कुणावर केले......

अहंकारी धुंदी सरली
`मी' पणा ची जाण ना उरली,
सारे जेव्हां दूर जाहले
नातेबंध तव ऊमगले.....मी प्रेम कुणावर केले......

आयुष्याच्या सायंकाळी
कटूसत्य मज उमगले,
ना देवाचा ना नशिबाचा
मी एकला दोष हा माझा....मी प्रेम स्वतःवर केले...मी प्रेम स्वतःवर केले...

गुलमोहर: 

अतिशय सुंदर रचना आहे.....:)

छान कल्पना आहे, एआर्_डायमंड्स. आणि मांडणीही चांगली आहे. (पहिल्या कडव्यात शैशव म्हणायचय का?)

ह्म्म...
आयुष्याच्या सायंकाळी
कटूसत्य मज उमगले,
ना देवाचा ना नशिबाचा
मी एकला दोष हा माझा....मी प्रेम स्वतःवर केले...मी प्रेम स्वतःवर केले...

हे आवडलं. ही स्वतंत्र चारोळीसुद्धा होऊ शकेल.

    ***
    माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
    एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि

    daad,
    प्रतिकियेबद्दल धन्यवाद!

    शैशवंच म्हणायचं होतं पण अजून
    देव्ननागरी किबोर्ड तेव्हढा हाताळणे जमत
    नाही.