मेहुणी

किती एक दिवसांत
मेहुणी सोबत नाही,
झाली सवयं जरी ही
मन रोज वाट पाही..........

रोज सांजसकाळी
बायको येताच जवळी,
मन वेडे तिच्यातही
मेहुणीच शोधत राही....

होत्या जरी त्या जुळ्या
लोभस कोमल त्या कळ्या ,
भेटती वेगवेगळ्या
सोबत कधी न दिसल्या.......

बायको कुटूंबवत्सल
मेहुणी ती फॅशनेबल,
हे अहोभाग्य माझे
हा जन्म सार्थ होई.......

गेली अनेक वर्शे
नित्य नियम हाच रूजला,
परि आज हे समजले
मेहुणी नव्हतीच मजला.....

समजेना मज हो काही
बायकोच रूप घेई,
मज सत्यं हे रूचेना
मन रोज वाट पाही..........मन रोज वाट पाही..........


हाहा
सत्यम शिवम सुंदरम पाहिला होता का काय कविता करायच्या आधी?
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है



आता तुझी बायको सुद्धा एक कविता लिहील... ;दीर' या नावाची...



lol