माणुसकी

Submitted by ar_diamonds on 21 July, 2008 - 05:43

असलो जरी आम्ही
मुके,बहिरे,आंधळे,पांगळे,
आम्ही सुध्दा मानव आहोत
नाही जगावेगळे.......

दया,करूणा,सहानुभूतीची
नको भीक आम्हां,
माणुसकीचे आम्ही भुकेले
आमचा काय गुन्हां.......

धडधाकट, हो डोळस तुम्हीं
तुम्हां काय कमी,
रक्त आपले एकसारखे
एकच जन्मभुमी........

जातपात अन् वर्ण भेद
गरीब्,श्रीमंत विसरा सारे,
`अमुल्य' असे मानव जन्म हा
`माणूस' म्हणून जगू या रे.......

आम्हांस ही ह्रदय आहे
स्वप्नं किती ह्रदयात,
देऊ जगा संदेश `एकता'
द्या `माणुसकी'चा हात.........

गुलमोहर: 

छान, अर्_हिरे.

ar_diamnds चे रूपांतर अर्_हिरे

व्वा छान कल्पना आहे.