मुक्तीचा सोपान

अंधारल्या या मना दाव अंतरीचे ज्ञान
धाव धाव ज्ञानदेवा दाव मुक्तीचा सोपान ,

नको दावू रे मजला सुखाचा हा चांगदेव
भक्तीमार्गे आली मज आता निवॄत्तीची जाण ...... धाव धाव ज्ञानदेवा....

मन वढायं वढायं म्हणे माय ती बहिणा
सर्व मना शांती लाभो तुले विठठ्लाची आन ...... धाव धाव ज्ञानदेवा....


ar_diamonds, ही कविता चुकून गजल विभागात घातली गेलीये का?



चु.भु.दे.घे.
नविन असल्यामुळे कधीकधी असं होतं.
धन्यवाद.



अतिशय सुन्दर कविता............