Submitted by अलका_काटदरे on 13 July, 2008 - 03:46
पतन्ग उडवणे सोपे असते
कारण एक टोक हातात असते
पतन्गाचे मात्र तसे नसते
हातातले टोक सुटले तर ..
कुठे परतायचे त्याला माहीत नसते
वरही नाही, खालीही नाही
पतन्ग, पतन्गच राहत नाही
रन्गान्ची अन्गतपन्गत होते
चॉकटी अस्ताव्यस्त पडून राहते
इतिहासाला भारावते .........
गुलमोहर:
शेअर करा
अलका, तुम्ह
अलका,
तुम्ही बहुतेक चुकीच्या जागी पोस्ट केली आहे....
इथे गझल लिहील्या जातात.....
अन्गतपन्ग
अन्गतपन्गत ,पतंग pataMga असे लिहा
चौकटी. chaukaTI असे लिहा..
कविता छान आहे... शेवटची ओळ नाही कळली..
पतंगाशी
पतंगाशी आपली बरोबरी आहे
दुसर्याच्या हाती यांची दोरी आहे
मला वाटते कविता पुर्ण झालीच नाही.
|| पिंडे पिंडे मतिर्भिन्ना ||
प्रतिसादा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या कवितांचा भावार्थ चांगला असला तरी, मराठीत पटपट लिहीणे कठीण जात असल्याने कुठे कुठे अशुद्ध लिहीतेय, याची जाणिव आहे. हस्तलिखित शुद्ध आहे!
इतिहासाला भारावते, म्हणजे इतिहासजमा होते; एवढेच नव्हे तर दुर्लक्षितही होते. (जसे की भुईला भार). म्हणून नेहमी आपल्या पतंगाची दोरी आपल्याच हातात हवी ! धन्यवाद.
प्रतिसादा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या मते कवितेची ऊत्पत्ती एखाद्या कल्पनेतून होते आणि नंतर ती रचली जाते. गझल लिहितांना अर्थाला अगोदर प्राधान्य येते आणि त्या अनुषंगाने तिचा 'फ्लो' चालू होतो. माझ्या सन्ग्रही असलेल्या रचनान्ची वर्गवारी मी माझ्या अल्पबुध्दीला सुचली तशी केली; रसिकाना आणि अभ्यासूना ती तशी नाही भावली तर त्यानी कृपया रचनेचा आस्वाद घ्यावा, ही विनन्ती.
कृपया
कृपया कविता योग्य त्या विभागात ठेवा. मायबोलीच्या रसिकांनी तुमच्या कविता वाचण्याचे कष्ट घ्यावे अशी तुमची इच्छा असेल तर कमीतकमी तुम्ही योग्य त्या विभागात ठेवणार का?
आपले सहकार्य अपेक्षित आहे.