हुतात्मा

एवढ्या मोठ्या नकाशावरचा एक लहानसा ठिपका
अशिक्षित, अप्रगत, अनादी काळातला..
वाढता, वाढता शिकला, सवरला अन मोठा झाला..

एवढा की सार्या जगाचेच नव्हे तर
आतन्कवाद्यान्चेही लक्ष्य बनला

अशा या भुमीवर मी कधी झालोच जर हुतात्मा-
बळी पडून या ना त्या कारणाशी,

तर फिरु दे नको माझा आत्मा
माझ्याच एखाद्या पुतळ्याशी..

मला नको एखाद्या शहरचे नाव
वा एखादा रस्ता किन्वा एखादा चॉक..

नकोत मजला तुमची स्तुतीसुमने
नकोत रुबाब नको तो दरारा..

द्या मजला एक कोपरा
मनातील तुमच्या, फक्त एक कोपरा

होऊन जाईन कायमचा मी
तुमच्या भावनान्चा सोयरा !