पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

बदाम आणि बाणांनी
घायाळ हरेक किल्ला...
पुर्वजांच्या मानबिंदुवर
वशंज करती हल्ला...

मैत्रीत नसावा मित्रान्च्या सन्ख्येचा गुणाकार, भागाकार्...असावी गैरसमजुतीची वजाबाकी अन मैत्रीच्या अविभाज्य घटकान्चा आकार

सोबती माझी होशील का?
स्वप्नांनी माझ्या जगशील का?

आलोय फक्त तुझ्यासाठीच
'तू माझीच आहेस' हे सांगशील का?

गजु....

तू जवल असतना ,
प्रितीच्या तुशारात भिजून जातो !
तू जवल नसताना ,
विरहाच्या धुक्यात विरून जातो !

मी तुला म्हणालो
"ह्रदयाच्या प्रत्येक कोन्यात तुझेच नाव आहे तरीही तु त्याचे तुकडेच केलेस "
विश्वासघात हाच माझ्यासाठी घाव आहे,
बघ त्या तुकड्यांकडे त्यांना फक्त तुझ्याच प्रेमाची हाव आहे.
मोहसिन तांबोळी

शब्द न शब्द काढलाय
ह्रिदयातून खणून
सादर करतो चारोळ्या
सहज सुचल्या म्हणून

- देवनिनाद

शब्द न शब्द काढलाय
ह्रिदयातून खणून
सादर करतो चारोळ्या
सहज सुचल्या म्हणून

- देवनिनाद

सुरुवात करताना
आपण श्री म्हणतो
सुरुवात विस्कटली
की शी म्हणतो

- देवनिनाद

क्ष

थुंकतात ते सर्वत्र
खाऊन पान, तंबाकू, गुटखा
ईश्वरा ह्या गलिच्छतेपासुन
आमची कधी होईल सुटका
--गणेश भुते

हि आणि तुमची पुढील झुळुक छान आहे. दर्जा चांगला आहे.

देवदत्ता Happy
आठवण आहे का रे ???

तव कटाक्षात मुळी
मोहरते असूया कळ्यान्ची
स्वप्नातही माळताना
झाली तोरणे डोळ्यान्ची

जास्वन्द...

जास्वंद, अरे कुठे गायब झाला होतास इतके दिवस?
mail टाक... Happy

एक नर
एक मादी
कोण नंतर्र
कोण आधी

- देवनिनाद

आता फाटलेला पतंग सुद्धा मला स्वत:प्रमाने भासतो,
त्याला पाहील्यावर आजही माझा कंठ दाटतो ,
दोरी उडवतेय दुसराच पतंग ,
पण एकवचनी पतंगाच आजाही जगाला हेवा वाटतो.
मोहसिन तांबोळी

आता फाटलेला पतंग सुद्धा मला स्वत:प्रमाने भासतो,
त्याला पाहील्यावर आजही माझा कंठ दाटतो ,
दोरी उडवतेय दुसराच पतंग ,
पण एकवचनी पतंगाच आजाही जगाला हेवा वाटतो.
मोहसिन तांबोळी

मन आहे पतंग
कधी अपेक्षांनी उंचावते
कधी निराशेने स्वतःला उतरवते
कोणी काटल्यास फरफटत खाली येते.

जोराच्या वारा आला,
पतंग माझा उंच उंच गेला !!
आणी माझ्याही नकळ्त अचानक ,
कायपोचे झाला !!

क्षणात वरती क्षणात खालती ,
असच पतंगाच आयुश्य असत !
मात्र आपल्यालाही त्यातून,
बरच काही शिकायच असत !!

जुने आकाश नविन पतंग
सगळेच नवे, काही जुने संग

काटलेले पतंग
आज आठवत आहेत

नव्याने आज पतंग आज
पुन्हा आकाशात चढवत आहे.

....... गेले .. ते दिन गेले Happy

काय रे नविन पतंग शोध्तोयस ?

समस्त मायबोलीकरांना प्रेमपूर्वक नमस्कार.

मूठभर हृदयात
अफाट जागा
मोकळी आहे;

भावनांविना हृदय
निव्वळ एक
पोकळी आहे!

समस्त मायबोलीकरांना प्रेमपूर्वक नमस्कार.

मूठभर हृदयात
अफाट जागा
मोकळी आहे;

भावनांविना हृदय
निव्वळ एक
पोकळी आहे!

¦ããèƒÃÞãÖããã ÞãÖããèÖãÀããã ¹ããããÖããä˾ããããðãÀã ½ããËã
½ãããã•ãÖã ‚ã¾ããìÎãÖ¾ãã •ããØããããðãÔãã ðã©ãã¦ãã

पुढील चारोळी माझ्या रातराणी या कवितेचा उत्तरार्ध आहे.

उध्वस्त नाती जरी,जीव असा जडलेला..
निश्प्राणशा कळ्यांचा जणू सुगंध गोठलेला..
कोमेजली रातराणी, तिचा डाव पुरा फसलेला..
भेटुनी प्राजक्ताला गुलमोहर, सावरलेला..

ह्या चारोळीला प्रथम पारितोषिक.
अभिनंदन.
निमा.

माझ्या प्रिय मुम्बई करांनो.....तुमच्या मानसिक सामथ्याला मायबोलीकरांचा सलाम........

आतंक पाहूनि चहूओर,
रक्त नयनि दाट्ले.
संहार पहुनि माणूसकिचा,
अश्रुंनी गगन फाट्ले.
पुरे जाहले नुसतेच भाषण,
पुरे आता पोकळ आश्वासन.
पेटून सारा देश हा उठ्ला,
झालेच पाहिजे...झालेच पाहिजे
विद्रोहाला कड्क शासन....
विद्रोहाला कड्क शासन....

आ़ज कोणीस दिसत नाही झूळ्केवर......

तुशरन.....................

प्रत्येक क्षणाचे आपले
अस्तित्व असते.
त्याच्या असण्याने
कोणितरि हसते.
त्या क्षणाचि तु किंमत
ठेवलि नाही.
प्रतिक्षेचे रखरखित ऊन दिले,
पण, मायेचि साऊलि दिली नाहि.

खुप वाट पाहिली मी,
तो दिवस....
खुप एकटि राहिली मी....
ते क्षण...
खुप आसवे वाहिली मी....
प्रतिक्षा अति जाहलि,
तुटली माझी सबुरी रे...
का जाणले नाहीस तु,
तुझ्याविना ,
तुझी राणिहि अधुरी रे...

जीवन वर्षांत नव्हे,
प्रत्येक क्षणात जगून घ्यावे...
जाणून स्वत:ला सुखि,
ते सुंदर रंग मग उधळून द्यावे...
खुप झाला आनंद,
मनसोक्त एकदा हसून घ्यावे...
झाले कधी दु;ख जरी,
मायेच्या कुशित रडुन घ्यावे...
एकटे पड्लो जरी धावताना,
एकदा मागे वळून पाहावे...
तिथेच असतिल प्रेमाचि नाती अपुली,
केवळ पुढे आपुले हाथ करावे...
असे जगावे, असे मरावे,
म्रुत्त्यु नंतरही,
प्रत्येक ह्रुदइ उरावे...
प्रत्येक ह्रुदइ उरावे...

Pages