एकलव्य ....

Submitted by राम मोरे on 7 June, 2011 - 01:36

एकलव्य तेव्हाचा आणि आजचा

संदर्भ : ↑ महाभारत की कथाएँ – एकलव्य की गुरुभक्ति

महाभारतातील कथेच्या अनुसार , एकलव्य आराधने साठी बसला असता ..एक कुत्रा त्याच्या आराधनेत बाधा उत्पन्न करू लागला ..खूप वेळ सहन केल्या नंतर एकलव्याने आपल्या भात्यातील बाण काढले आणि कुत्र्याच्या मुखात अश्या पद्धतीने संधान केले कि त्याचा आवाज तर बंद झाला पण त्याच्या मुखाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही .
हा कुत्रा कौरव पांडवांचा होता ..जे शिकार करण्यासाठी वनात द्रोणाचार्या सह फिरत होते. कुत्र्याच्या मुखातील बाण पाहून ते चकित झाले कारण ,त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. म्हणून ते ''त्या'' व्यक्तीच्या शोधात निघाले व एकलव्या पर्यंत पोहोचले ..द्रोणाचार्यांच्या पुतळ्याकडे पाहून ते चकित झाले , पुतळा समोर ठेऊन धनुर्विद्या अभ्यासणारी व्यक्ती पाहून ते आश्चर्याने थक्क झाले ..
भिल्ल पुत्र असल्या कारणाने द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्देचे शिक्षण देण्याचे नाकारले होते ..पण हर न मानता एकलव्याने आपली आराधना सुरु ठेवली आणि सर्व राजकुमारांना लाजवेल एव्हढी निपुणता मिळवली.पुतळ्याचे निमित्त साधून ,द्रोणाचार्यांनी एक्लाव्याकडे गुरु दक्षिणेची मागणी केली ..ती म्हणजे अंगठ्याची !!! एकलव्य डगमगला नाही ..त्याने क्षणात अंगठा कापून द्रोणाचार्यांना अर्पण केला ..द्रोणाचार्यांनी अंगठाच का मागितला ? याचे उत्तर असे कि , अर्जुनापेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ धनुर्धारी गणला जाऊ नये ..पण खरी गम्मत पुढे आहे..
एकलव्याने पुढे आपली आराधना सोडली नाही ..तर्जनी आणि मधल्या बोटाने धनुर्विद्देचा अभ्यास सुरु केला आणि पारंगत झाला .आणि आधुनिक तिरंदाजी चा जन्म झाला आणि शास्राने सिद्ध केले आहे कि , तिरंदाजीची हीच खरी शास्रोक्त पद्धत आहे .. आज ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत हीच पद्धत वापरतात जी जगन्मान्य आहे ..आजच्या काळात अर्जुनाची तिरंदाजीची पद्धत कोणीही वापरत नाही .. मग श्रेष्ठ भिल्ल कुमार , एकलव्यच ना !!!!

ram more/01.06.2011

गुलमोहर: 

आज ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत हीच पद्धत वापरतात जी जगन्मान्य आहे ..आजच्या काळात अर्जुनाची तिरंदाजीची पद्धत कोणीही वापरत नाही .. मग श्रेष्ठ भिल्ल कुमार , एकलव्यच ना !!!!
>>>>>>>>>>> १००% पटलं.......

द्रोणाचार्य या व्यक्तीचा मला लहानपणी खूप राग यायचा ही एकलव्याची गोष्ट ऐकल्यावर......... त्यांचं वागणं एक गुरू म्हणून कधीच समर्थनीय नव्हतं.............

द्रोणाचार्य या व्यक्तीचा मला लहानपणी खूप राग यायचा ही एकलव्याची गोष्ट ऐकल्यावर......... त्यांचं वागणं एक गुरू म्हणून कधीच समर्थनीय नव्हतं.............>>> अगदी..
मी रडले होते लहन्पणी एकलव्य वाचुन.. आणि चिडले होते.. ही कसली पद्धत म्हणुन..

हम्म...! अनुमोदन.. मी अजुनही चिडते.. आपल्या मानापमानासाठी शिष्यांना युद्ध करायला लावणे पण अयोग्यच ना? मेला असता एखादा तर? Angry