..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिल लूटनेवाले जादूगर अब मैने तुझे पहचाना है...

~ कोडे घालणार्‍या मामी आणि ते ओळखणार्‍या श्रद्धा....दोघींच्या मेंदूना सलाम...!

लै भारी !

२२. नवाझ शरीफ पूर्वी उत्तम सारंगी वाजवायचे. त्यांच्या बायकोला सारंगी खूप आवडायची. घरी आले की आधी बायकोला सारंगी ऐकवायचे मग दोघे प्रेमाचे गुफ्तगू करत. एक दिवशी मात्र त्यांनी सारंगी ऐकवली आणि ते काम असल्यामुळे निघून गेले - प्रेमाचे गुफ्तगू न करताच. सौ. शरीफ कुठले गाणे म्हणतील?

>>~ कोडे घालणार्‍या मामी आणि ते ओळखणार्‍या श्रद्धा....दोघींच्या मेंदूना सलाम...!

अनुमोदन

माधव, कोडं १७ - हम बने तुम बने एक दूजे के लिये, आय डोन्ट नो व्हॉट टू से?
कोडं २२ - सारंगा तेरी यादमे?

माधव....कोडे क्रमांक १७ :

"नंदा माने' या क्लू वरून एक पतंग उडवितो :

"कोई माने या न माने, जो कल तक थे अन्जाने
वो आज हमें जान से भी प्यारे हो गये...."

'अधिकार' मध्ये नंदा हिरवीन होती म्हणून....!

प्रतीक उडला पतंग Happy

१७. बबन बनेला त्याचे आईवडिल वधुवर मेळाव्यात पाठवतात. तिथे त्याला नेहा नेने आणि मिरा माने या तोन मुली अतिशय आवडतात. पण जास्त कोण आवडली हे काही त्याला ठरवता येत नसते. दोघीही इतक्या आवडल्या असतात की त्यांच्याकरता जीव द्यायला पण तो तयार झाला असता. घरी आल्यावर आईवडिल विचारतात की कोणी मुलगी पसंत पडली का? बबन काय उत्तर देइल?
उत्तरः कोई माने या न माने, जो कल तक थे अन्जाने वो आज हमें जान से भी प्यारे हो गये

कोडं २३:
ऐन दिवाळीच्या दिवशी मुघलांच्या राजधानीतले वीजटंचाईमुळे दिवे गेले त्यामुळे प्रजा दु:खी होती. पण तानसेनच्या बायकोला काही चिंता नव्हती. का बरं?

कोडे २३ :

कारण मिसेस तानसेनना माहीत होते की, मि.तानसेन "दीप" राग आळवत आणि खालील गाणे म्हणत 'प्रकाश' पाडतील (च) :

"...दिया जलाओ, दिया जलाओ
जगमग जगमग दिया जलाओ..."

<<कारण मिसेस तानसेनना माहीत होते की, मि.तानसेन "दीप" राग आळवत आणि खालील गाणे म्हणत 'प्रकाश' पाडतील (च) :

"...दिया जलाओ, दिया जलाओ
जगमग जगमग दिया जलाओ..."<<

प्रतिकला अनुमोदन! चित्रपटही तानसेनच ना?
ओह!! Sad

कोडे क्रमांक २४:
अण्णा हजारे, बाबा रामदेव आदी प्रश्नावरून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग अतिशय चिंतातुर झाले आहेत. संध्या़काळी अगदी पडेल चेहर्‍यानेच ते घरी परततात. त्यांची वाढती काळजी पाहून सौ.सिंग गाणे म्हणतात :

होय आर्या.....'सैगल" अभिनीत तानसेन.
(पण, स्वप्नाला 'सैगलसाहेब' आठवले म्हणजे मला चक्करच आली.....तिची बस जॉन अब्राहम या स्टॉपच्या पुढेही जात नाही अन् मागेही नाहीच.)

२४.
मनमोहना बडे झूठे
हार के हार नहीं माने
मनमोहना ...

बने थे खिलाडी पिया
निकले अनाडी पिया
मोसे बेइमानी करे
मुझसे ही रूठे????

माधव ~~ "इस दुनियामे...." हा एक सल्ला झाला....नवर्‍याची उतरती अवस्था पाहून आणि त्यांच्याविषयी काळजी वाटून सौ.सिंग गाणे म्हणत आहेत.

@ आर्या....बघं मी म्हटलंच होत ना.....ही स्वप्नाली सायगलच्या पाठीमागे फिरणार नाही.

अगं आर्या.....सौ.सिंग नवर्‍याला "बडे झूठे" का म्हणतील ?...आणि शिवाय मनमोहनबाबू सौभाग्यवतीशी "रुठलेले" नाहीत.

(पण तू निवडलेले गाणे आहे छानच....माझेही याहीपेक्षा छान आहे.)

>>पण, स्वप्नाला 'सैगलसाहेब' आठवले म्हणजे मला चक्करच आली.....तिची बस जॉन अब्राहम या स्टॉपच्या पुढेही जात नाही अन् मागेही नाहीच.

काय रे! मी जुन्या गाण्यांवरची कोडी देत नाही का? Sad

कोडं २४

छोडो सनम, काहे का गम, हसते रहो, खिलते रहो, मिट जायेगा सारा गिला, हमसे गले मिलते रहो

कोणी हे गाणं ऐकलं नसेल तर राजेश खन्ना, हेमामालिनीच्या 'कुदरत' मधलं 'अ‍ॅनेट' ह्या गायिकेने गायलं आहे. ह्याच पिक्चरमध्ये 'दुखसुखकी हरेक माला कुदरतही पिरोती है' हे छान गाणं आहे. ऐकलं नसल्यास एकदा ऐकून बघा असं सांगेन नक्की.

इथे विषयांतर होईल कदाचित पण ह्या गाण्यातल्या काही ओळी मला भारी आवडतात त्या इथे द्यायचा मोह आवरत नाहिये. सॉरी म्हणून देतेच. नियतीला उद्देशून ह्या ओळी आहेत.

सामना करे जो इसका किसमे ये दम है कहा
इसका खिलौना बनके, हम सब जीते है यहा
जिस राहसे हम गुजरे ये सामने होती है..

"...काय रे! मी जुन्या गाण्यांवरची कोडी देत नाही का? ..."

~ होय गं...पण 'सायगल....पंकज मलिक...उमा शशी....' आदींच्या गल्लीत तुझी सॅण्ट्रो चालली की पाहणार्‍यांचे नयन विस्फारून जातीलच ना !

तरीही थोडेसे हिंटव ना !

>>तरीही थोडेसे हिंटव ना !

तुझी गल्ली बरोबर आहे पण घर चुकलंय. Proud आणि माझी 'सॅण्ट्रो' काय? आपुनको मर्सिडिज चाहिए बाबा!

इथेच रसिक भेटतील म्हणून आलो.
http://www.youtube.com/watch?v=j8CArPu0lmM

रफिचे हे गाणे, मेरा नाम जोकर मधे बघितल्याचे मला तरी आठवत नाही. (मला आशा मन्ना डेचे, काटे ना कटे रैना पण आठवतेय, पण हे नाही. )

"अ‍ॅनेट..." ही आर.डी.बर्मन यानी शोधलेली गायिका होती ना, स्वप्ना? तू दिलेले 'कुदरत' चे गाणेही त्यांचेच होते....(मात्र ते सौ.मनमोहन सिंग यांचे नव्हे...)

'सत्ते पे सत्ता' मध्येही अ‍ॅनेटचे एक गाणे होते....आठवत नाही. पण आर.डी. नंतर कुणी तिचा आवाज वापरला नसावा.

दिनेशदा युट्युब बॅन आहे हो इथे! Sad
पण तुम्ही रफीचे ते 'सदके हीर तुझपे हम फकीर सदके' हे गाणं म्हणताय का?

कोणी हे गाणं ऐकलं नसेल तर राजेश खन्ना, हेमामालिनीच्या 'कुदरत' मधलं 'अ‍ॅनेट' ह्या गायिकेने गायलं आहे. ह्याच पिक्चरमध्ये 'दुखसुखकी हरेक माला कुदरतही पिरोती है' हे छान गाणं आहे. ऐकलं नसल्यास एकदा ऐकून बघा असं सांगेन नक्की.>>>>>येस्स्स स्वप्ना, हे गाणं मलाही आवडतं. Happy
हे गाणे मोहम्मद रफी आणि चंद्रशेखर गाडगीळ असे दोघांनी वेगवेगळं गायलंय. Happy

अ‍ॅनेटचा उल्लेख आल्यावर "हॅलो इन्स्पेक्टर" या मराठी मालिकेचे शिर्षक गीतच पटकन आठवते (तीनेच गायलंय). Happy

कोडे क्रमांक २५:
झी मराठीवरची 'भाग्यलक्ष्मी' ही सिरियल पहाणार्‍यांसाठी हा प्लॉट परिचयाचा आहे. बाकी पामरांसाठी थोडक्यात स्टोरी अशी: संजय आणि काशीचं एकमेकांवर भारी प्रेम. घरी बाळ येणार म्हणून दोघेही खूष. पण दैवाला बघवलं नाही. एका कार अपघातात काशी मरण पावली. त्या धक्क्यातून संजय सावरतो न सावरतो तोच एक अनोळखी बाई एके दिवशी त्याच्यासमोर उभी राहिली. 'मी तुमची काशी' तिने असं म्हटलं मात्र संजयने एक किंकाळी मारली आणि 'तू काशी नाहीस' असं वेड्यासारखं ओरडायला लागला. भाऊकाकां आणि गोदात्याने काय झालं म्हणून विचारल्यावर तो काय म्हणाला असेल?

५.३० पर्यंत कोणी बरोबर उत्तर न दिल्यास मी सांगेन. उद्यापर्यंत पेंडिंग रहायला नको.

Pages