चिमणी

Submitted by साऊ on 6 June, 2011 - 10:48

एक चिमणी भिजलेली
विचारत होती मला -
' झाडावरती होते घरटे
दिसले का गं तुला? '

काय सांगू , कसं सांगू
चिऊताई तुला -
काय दिसले दुपारी
खिडकीतून मला

झाडावरती छोटी मुले
खेळत होती झुला -
खेळता खेळता पाडले घरटे ,
बेघर केले तुला !

रडू नको चिऊताई ,
समजाव आपल्या मनाला
नाही झालीस पोरकी तू
आधार माझा तुला ||

गुलमोहर: 
शब्दखुणा: