Submitted by dr.sunil_ahirrao on 4 June, 2011 - 01:18
ओंजळीत सूर्य घे,
एक नवी रात कर.
भंगल्या साऱ्या दिशा
श्वासातून एक कर.
रात्रीच्या चांदण्यात
स्वप्नांचा हात धर;
अधरांच्या ज्योतीवर
जरा माझी प्रीत धर!
- डॉ.सुनील अहिरराव
(C)copyright:all rights reserved.
गुलमोहर:
शेअर करा