एखाद्या विषयाची आवड कशी निर्माण करता येईल

Submitted by Meghana1 on 11 July, 2008 - 05:26

५/६ वर्षाच्या मुलांमध्ये भाषा, गणित ह्या विषयांची गोडी वाढावी म्हणून काय करता येईल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कहि यातली expert नाही. पण अनुभवावरुन सान्गते, भाषेची गोडी लाग्ण्या साठी अगदी लहान्पणापासून गोष्टी सान्गणे, वाचून दाखवणे ह सोपा प्रकार आहे. आणी गणीतासठी खेळत खेळत घरातच आद्गी सुरू करणे चान्गले.
फुलराणी.

माझा भाचा - भाषा आणि गणित दोन्हीत आवड आहे त्याला. मी माझ्या भावजयीला भाच्याशी कायम खेळताना बघितलं. (ती घरातली कामं कधी करत्ये कुणास ठाऊक)
त्याच्या उंचीला (वय वर्ष चार) येईल असा प्रचंड मोठ्ठा जगाचा नकाशा बैठकीच्या खोलीतच लावलेला होता. आधी बघून बघून आणि मग वाचत देश, राजधान्या शिकला. येणार्‍या पाहुण्यांशी तो खेळ खेळायचा, राजधान्या ओळखण्याचा.
गाडीतून दूरच्या प्रवासात जाताना शब्दांच्या भेंड्या... स्पेलिंग सकट असे अनेक खेळ खेळत. शब्दकोडी वगैरे तर कायम.
त्याच्या इथल्या शाळेत (सिडनी), चॅरिटी साठी वाचनाची एक स्कीम होती. मुलांनी शेजारच्या, जवळच्या, नातेवाईकांच्या घरी जाऊन पुस्तक वाचून दाखवायचं आणि त्याचे त्यांना पैसे (क्षुल्लक एक दोन डॉ) मिळतात ते शाळेने ठरवलेल्या चॅरिटीला द्यायचे. सगळ्यात जास्त पुस्तकं वाचणार्‍या मुलाला दर महिन्याला शाळेच्या असेंब्लीत रेकग्निशन मिळत असे. मला तो प्रकार प्रचंड आवडला.
दररोज रात्री झोपताना भाऊ किंवा भावजय गोष्टं सांगतातच, किंवा वाचून तरी दाखवायचे.. आता मोठा झाल्यावर (९ वर्ष), आठवड्यातले काही दिवस तो सांगतो, बनवून.
(माझा भाऊ आणि भावजय दोघेही त्याच्याशी प्रचंड वेळ घालवतात.)
गणितही खेळतच. समोर बसवून अभ्यास, पाढे करवून घेतलं नाही.
थोडक्यात काय तर - मुलांबरोबर खूप वेळ घालवण्याची तयारी हवी हे नक्की. कोणताही विषय खेळातून शिकवताना, खेळ बदलण्याची हुशारी, चिकाटी हवी. शिवाय प्रत्येक मुलाची वेगवेगळ्या विषयात गती, आवड असेल. ती ओळखून त्या नुसार पद्धत बदलता यायला हवी.
(लिहिताना मलाच हे प्रचंड कठीण वाटतय.... पण माझ्या भावजयीशी बोलशील तर.... अस्सं सोप्पं करून सांगेल!).

सहीच. आम्ही पण असाच प्रयत्न करतो ( पण इतक नाही ). त्यांच्याशी कसा contact करायचा?
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मेघना, मी विचारते तिला आणि तुला सांगते.

धन्यवाद दाद.
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मेघना
तुला एक स्वतंत्र मेल पाठवलं आहे. मिळालं का?

दाद,
मलाही मेल पाठ्वू शकाल का हीच। खूप वैयक्तिक नसेल तर?malaahi 3 varshaanchi kanyaa aahe,tyaamuLe mahitichaa veLevar upayog jhaalaa tar uttam asa vaaTala..
email address is mashwini@yahoo.com
धन्यवाद

दाद, भन्नाट आहे तुझी वहिनी. मी पण असा प्रयत्न करतो पण अभ्यास रहातो बाजुला आणि मी मुलीशी खेळतच बसतो.

मला सद्ध्या प्रश्न पडलाय की माझ्या मुलीला, जी ७ वर्षाची आहे, फिल्मी गाणी सोडुन चांगल्या गाण्याची आवड कशी लावु?

मला वृषालीसारखीच अजून काही मेल्स आली, ज्यात मी मेघनाला पाठवलेलं मेल त्यांनाही पाठवण्याची विनंती केलीये.
मी मेघनाला माझ्या भावजयीचा मुंबईतला संपर्क फक्त दिला होता.
मी वर दिलेली "किमया" तिची आहे. त्यामुळे तिनेच ह्यावर बोलणं जास्तं उचित.
पण इतक्या जणांना आवश्यक वाटतय तर मी तिच्याशी बोलून एखादा माहितीवजा लेख कंपाईल करू शकेन.
थोडा अवधी द्या. ह्यावर काही करता आलं तर मला आवडेल.

नकीच दाद, तुम्ही हवा तो वेळ घ्या आणी तुमच्या सुरेख शैली मधे capsule ची गोळी समस्त पालकांसाठी

डोळ्यावर विश्वास नाही बसत माणसा. धन्यवाद. आम्ही, हातपाय धड असलेल्यांनी शिकण्यासारखे आहे हे.

माझा एक प्रश्न : माझा मुलगा ४.५ वर्षाचा आहे. Sr KG त आहे. आता दिवाळी नंतर शाळेत writing सुरु होईल. मी घरी करुन घेते पण हा आहे की हातात पेन्सील धरायला तयार नाही. प्रेमानी, गोड बोलून, आमिश दाखवून, रागवून, धाक घालून सगळे प्रयोग झाले, पण लिहीत नाही अजिबात. तस लिहीता येत, पण अक्षरांची उंची, गॅप जमत नाही. wiriting करुया म्हणाले की चक्क झोपून जातो नाहीतर फेकाफेक करतो. शाळेत एकदा लिहायला दिल होत तर हा दुसर्या दिवशी जाणार नाही म्हणून हटुन बसला.
कस त्याला लिहायला लावायच? किंवा आवड कशी निर्माण करायची? प्लीज मार्गदर्शन करा.

एक आठवडाभर किंवा जास्तच त्याला काही लिहायला सांगु नका. मग एक सुंदर रंगीत, भरपूर चित्रे असलेली वही व त्याचे आवडते कार्टून असलेले पेन्/पेन्सिल आणुन तुम्ही स्वतः रोज काही तरी त्यावर खरडा अगदी १-२ शब्द किंवा ओळी. त्याला लिहायला सांगु नका. लिहुन झाल्यावर घरातल्या इतर मंडळींना ते वाचायला द्या व काय लिहीले आहे त्यावर दोन वाक्ये बोलायला सांगा. तसेच त्याने मागितलेच तर दुसरा वही-पेन सेट तयार ठेवा. तुमचे बघुन, घरातील इतर लोक पण आवडीने ते बघत आहेत बघुन तो पण लिहायचा प्रयत्न करेल. माझ्या मुलाला पुस्तके वाचायची/चाळायची सवय मी अशीच लावली. तो पुस्तके नुसती फेकुन द्यायचा, फाडुन टाकायचा. अर्थात तो १.५ वर्षाचा आहे. आई करते ते खरे नाही वगैरे चालाखपणा अजुन यायचा आहे Wink

रंगित खडु आणि फळा आणुन त्यावर तुम्हिच लिहित रहा. चित्रे काढा. तृप्ती म्हणते तसे तुम्ही करताय हे पाहुन तो पण करेल. तसेच तुम्ही रोज काहीतरी लिहायची सवय लावुन घ्य आणि मुद्दम त्यच्यसमोर मी आता जरा लिहित बसणार आहे असे बोल. अगदी रोजच्या कामाची यादी वगैरे केली तरी हरकत नाही.
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

त्यालाच दुकानात नेऊन त्याला आवडतील तशा वह्या, रंगित कागद, पेंसिली, स्केच पेन्स , मार्कर्स या वस्तू घेउन या. सुरवातिला नुस्त्याच रेषा, चौकोन, त्रिकोण इत्यादी काढायला द्या. हळू हळू आवडेल त्याला. इतक्यातच अक्षरांची उंची, त्यातली गॅप याकडे कक्ष देउ नये. let them focus on one thing at a time -trying to pay attention to too many things can be tough.

फळा, खडु सगळ आहे. घरात त्याच्या आवडत्या पेन्सिली, वह्या ह्यांचा गठ्ठा पडलाय. हा tp करायला सारख पेन्सिलला टोक कर, १०० वेळा खाली पाड, पडलीये अस दाखवून लांब फेक, शोधायला सगळ्या खुर्च्या हलव अस करत बसतो.
आणी त्याला लिहायच असत पण ते cheque book वरच. ते पाहील की आठवत की शाळेत writing करायचय. किंवा laptop वर लिहीतो म्हणतो. (कुठुन हे सगळ शिकतात कोण जाणे !)
बाकी सगळा अभ्यास छान करतो. गोष्टी वाचतो, ऐकतो आवडीने., पण हे writing भलतच कठीण वाटतय. (हताश चेहरा )

थकले मी.. हात टेकले ह्या मुलासमोर.... अजुनही काहीही लिहीत नाही.... मी सांगतो, तू लिही अस म्हणतो... साम्-दाम-दंड सगळ झाल; पण ....... काय करु मी आता?

शाळेत लेखन सुरु झालं की बाकी मुलांचं बघून त्यालाही लिहावं वाटेल. त्यालाच लिहावं वाटेपर्यंत बाकी कशाचा उपयोग होणार नाही. मागे नको लागू.
>>त्याला लिहायच असत पण ते cheque book वरच Happy
याचं कारण काय असावं? ते शोध. त्याला ते छोट्या वहीसारखं दिसत असेल आणि आवडल असेल तर तसंच दिसणारं काहीतरी आणून दे. किंवा ते फार काहीतरी महत्वाचं आहे आणि आई देत नाही म्हणून तेच हवं असेल तर एक छान डायरी आण. त्यात तारखा, बाकी काही गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्याला सांग तुझी आहे, मुळीच देणार नाही, पण तुला लिहायचेच असेल त्यात तर एक दोन पानावर लिहू देईन. Wink

tlsbooks.com इथे बरेच प्रिंटेबल्स आहेत. यात अक्षरं ट्रेस करायची, शेप्स, अंक ट्रेस करायची जी पानं आहेत ती छापून घ्यावी - जमल्यास रंगीत पानावर छापून बघावी - ही माझ्या मुलांना भयंकर आवडतात. वेळ अन पेशंस असल्यास प्रिन्टेबल घालून गूगल करुन पहा अजून हजारो पानं सापडतील....

खरेच, गूगलवर अतिशय चान्गल्या educational sites आहेत. हि साइट बघा:
DLTK's Printable Crafts for Kids

Jan Brett Coloring Traditional Alphabet Tracers

starfall.com

तनिष्का आता २.५ वर्शचि आहे पण ह्या साइट्मुळे सगळी alphabets(caps/lower) ओळखते अनि आजकाल T,U, I असे सोपे शब्द गिरवायला लगली आहे.

शुनू, स्वाती, खूप खूप धन्यवाद.... एकदम सही sites आहेत... लगेच प्रिंट्स काढते... एकदम मस्त.. पुन्हा एकदा धन्यवाद.

लालू, ताबडतोप एक डायरी आणते त्याच्यासाठी.

माझी मुलगी आता ३वर्ष वयाची आहे, तीला सन्गीत विशेशता नाचाची बरीच आवड आहे,अत्ताच जर चान्गले मार्गदर्शन मिळाले तर योग्यच नहि का? LA जवळ भरत नाट्यम क्लास असतील तर क्रुपया सुचवा.

वा अजुन १-२ वर्ष वाट बघावी, क्लास लावण्यासाथी??

>>अजुन १-२ वर्ष वाट बघावी, क्लास लावण्यासाथी??
माझ्या मते अगदी आत्ता देखिल क्लासला घालायला काहीच हरकत नाही. फक्त असा गुरु निवडा ज्याला तिचं वय लक्षात राहील. तिने नाचाऐवजी क्लासात जाऊन निव्वळ उड्या मारल्या तरी तो खपवून घेईल. हळुहळू तीचा कल बघून, तीच्या वयाला झेपेलसं शिकवेल.
ह्या वयात मुलं आपल्याला कळणार नाही इतकी पर्सेप्टीव्ह असतात. जोवर तुमचं पिल्लु एंजॉय करेल तोवर ,जास्त धक्के न मारता शिकु द्या.

धन्यवाद म्रु,
आधी तीच्या शाळेत (so called..:)) dance class ला जायचीहि, tv वर तसेच तिच्या dvd बघुन बरेच वेळा जरा sensible steps करयचा प्रयत्नही करतेय्..आता ह्या नवीन शाळेतही आहे क्लास

बरेच वेळा जरा sensible steps करयचा प्रयत्नही करतेय्>>>
असं असेल तर मग तर घालच तिला क्लासम्ध्ये.मृ अगदी बरोबर सांगत आहे.

स्वाती, मृण्मयी म्हणतेय ते १००% खरय. एकवेळ काही शिकली नाही तरी चालेल पण तिच्यातली नाचाची आवड खुडली जाऊ नये ह्यासाठी नक्की जागरुक रहा.
क्लासला जाण्यासाठी, तिथे अर्धा-एक तास काही "ठरीव" करण्यासाठी जी मानसिक तयारी हवी ती प्रत्येक मुला/मुलीत तयार व्हायला वेगवेगळा वेळ लागतो.
काही मुलं तिसर्‍या चौथ्या वयाला तयार असतात काहींना अजून काही वर्षं लागतात.
जरूर क्लासला घाला. पण कंटाळत नाहीयेना, ह्यावरही लक्षं ठेवा म्हणजे झालं. माझ्या अनेक शुभेच्छा.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

उपयोग झाला. कुरकुरत का होईना, मुलगा लिहायला लागला... हुश्श!

अरे वा अभिनंदन Happy

Pages