Submitted by aaftaab on 11 July, 2008 - 03:17
मी जेव्हा तुझ्या डोळ्यात पाहिलं..
तेव्हा मला तुझ्या डोळ्यातलं माझंच प्रतिबिंब दिसलं..
मग आणखी खोल जाऊन पाहिलं,
तर माझ्या प्रतिबिंबाच्या डोळ्यात मी डोळे घालून पाहू लागलो.
एकटक, अनिमिष..
काही क्षणानंतर लक्षात आलं, की
मी तुझ्या डोळ्यातल्या माझ्या प्रतिबिंबाच्या डोळयाशी नजरानजर करून
घायाळ झालो होतो..
आणि तूही..
माझ्या डोळ्यातल्या तुझ्या प्रतिबिंबाच्या डोळ्याशी नजरानजर करून
लाजून चूर झाली होतीस..
एक विचारू तुला, माझी डोळस सखी?
.. आता डोळे मिटून घेऊ यात का? गरगरायला होतय गं .... !
गुलमोहर:
शेअर करा
काहीही
काहीही

----------------------
The cheapest face-lift is a SMILE
खी खी.... हे
खी खी.... हे जबरा आहे... वाईट पाडली आहेस...

गरगरायला झाल वाचुन.
वाचूनपण
वाचूनपण गरगरायला झालं!!
काय हे...
काय हे...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
काहीच्या
काहीच्या काही....:खोखो:
आता नजरानजर करतांना काळा गॉगल घाला बरं का??:हहगलो:
फिस्सकन
फिस्सकन हसू आलं. मस्तं जेवण झाल्यावर हातात कॉफी असताना. कायच्याकायच मस्तच!