सध्या नव्या नियमांचा मोसम आहे, त्यामुळे सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे काही नियम बनवले आहेत. जाणकारांनी कृपया भर घालावी.
(१) खालील नियम सर्व विपुकर्त्यांवर बंधनकारक असून त्यांचे उल्लंघन केल्यास आमचे आंतरजालीम कायदा सल्लागार श्री. चिनूक्ष हे विश्वात कुठेही आपल्यावर 'पुणे मनपा माहिती तंत्रज्ञान अधिनियम १८५०' नुसार फायदेशीर कारवाई करू शकतील.
(२) वेळ अमूल्य आहे. आपली विपू थोडक्यात व नेमकेपणाने करा.
(३) एकदा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा विपू करा.
(३)(अ) पुन्हा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा कधीही विपू करू नका.
(४) विपू म्हणजे भोचकपणा नव्हे. या ( किंवा कुठल्याही) दोन शब्दामधला फरक समजून घेण्यासाठी शब्दार्थ बीबी ला भेट द्या.
(५) सर्वांचेच नवे लेखन नवीन लेखन मध्ये दिसते. सबब येथे रिक्षा फिरवू नका.
(५) (अ) अजिबात फिरवू नका.
(५) (ब) 'एकदाच' सुद्धा नाही.
(५) (क) "हे जरा वाचणार / बघणार का? " असे म्हणून पण नाही.
(५) (ड) "ही माझी रिक्षा" असे म्हणत म्हणत पण नाही.
(५)(इ) "ही मा़ही रिक्षा" असे म्हणून त्यापुढे स्मायली दिला असेल तरी सुद्धा नाही.
(५)(फ) तरीही रिक्षा फिरवल्यास अपमान होईल.
(६) महिलांबद्दल अथवा कुठल्याही स्त्रीलिंगी सजीव अथवा निर्जीव वस्तूबद्दल अपमानास्पद अथवा मध्ययुगीन मानसिकतेसह लिहिण्यास सक्त मनाई आहे. असे करणार्यास ताबडतोब पार्ल्याक्का ब्रिगेड (पुरोगामी गट) च्या तावडीत देण्यात येईल.
(७) फ्रेंडशिप मिळणार नाही.
(७)(अ) अजिबात नाही.
(७)(ब) 'जस्ट फ्रेंडशिप' सुद्धा नाही.
(७)(क) तुमच्या माझ्या आवडी निवडी जुळत असल्या तरीही नाही.
(७)(ड) तरीही फ्रेंडशिप मागितल्यास अपमान होईल.
(८) कृपया ज्यामुळे परराष्ट्रांशी संबंध बिघडतील, अणुयुद्धाचा धोका निर्माण होईल, परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील अथवा परमेश्वरी कोप होईल अशी कुठलीही विपू मला करू नये.
(८)(अ) एखाद्या विपुमुळे परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील किंवा नाही याबद्दल श्री. आस्चिग यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
(८)(ब) सर्व प्रकारच्या परमेश्वरांच्या कोपाबद्दल श्री. विकु निवाडा करतील.
(९) हिंदू वगळता इतर कुठल्याही जातिधर्मांची निंदा करणे हे प्रतिगामीपणाचे व भावना दुखावणारे असल्याने त्यास सक्त मनाई आहे.
(१०) घासून गुळगुळीत झालेले असले तरी हे सांगणे आवश्यक आहे की दुपारी एक ते चार विपू बंद राहील.
(११) लेख, कविता, प्रचि आवडल्यास तिकडेच प्रतिसादात तसे लिहावे, तिकडे न लिहिता विपू लिहून तिकडचा टीआरपी कमी करू नये. केल्यास जशास तसे अवलंबण्यात येईल.
(१२) आपण मला विपू लिहायला आला होतात हे विसरून, मला इतरांनी केलेल्या विपू वाचत बसू नये.
(१२)(अ) वाचल्याच तर मी त्यावर त्या इतरांना केलेल्या विपू वाचायला जाउ नये.
(१२)(ब) तेही केलेत ( तुम्ही अशक्य आहात!) तर त्याबद्दल फाजील चौकशा करू नये.
(१२)(क) केल्यास अपमान होईल.
(१३) विपुत धन्स, धन्यू असले आंग्लाळलेले मराठी शब्द वापरल्यास, अपराध्यास सत्वर झक्कींच्या तोंडी दिले जाईल.
(१४) तुम्ही एकाच्या विपुतून दुसर्याच्या, तिथुन पुढे तिसर्याच्या असे करत माझ्या विपुत पोहोचला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. ताबडतोब, मंदार जोशी यांचा 'व्यसन' हा लेख वाचावा आणि मुक्तांगण गाठावे ही नम्र विनंती.
(१५) आणि हो, माझ्या विपुत आपले स्वागत आहे
भाऊ, व्यंगचित्राबद्दल
भाऊ, व्यंगचित्राबद्दल धन्यवाद.
अश्विनीमामी
>> मला ते खरेच नियम वाटले म्हणून सकाळधरनं वाचलेच नव्हते.
अस्चिग
>>झक्कींच्या लग्नाच्या बाफवर.....
अरे बापरे! आता हे रे काय...
प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
इथे प्रत्येक प्रतिसाददात्यास एक असा धन्यवादाचा शेपरेट प्रतिसाद लिहून शिवाय प्रत्येकाच्या विपुत भावूक धन्यवाद द्यावेत काय ?
लई भारी..
लई भारी..
>इथे प्रत्येक प्रतिसाददात्यास
>इथे प्रत्येक प्रतिसाददात्यास एक असा धन्यवादाचा शेपरेट प्रतिसाद लिहून शिवाय प्रत्येकाच्या विपुत भावूक धन्यवाद द्यावेत काय ? >> नियमावलीत बसेल काय?
इथे प्रत्येक प्रतिसाददात्यास
इथे प्रत्येक प्रतिसाददात्यास एक असा धन्यवादाचा शेपरेट प्रतिसाद लिहून >>> यावर कॉपीराईट आहे. योग्य ठिकाणी चोक्सी करून परमिशन घ्यावी.
<< इथे प्रत्येक
<< इथे प्रत्येक प्रतिसाददात्यास एक असा धन्यवादाचा शेपरेट प्रतिसाद लिहून शिवाय प्रत्येकाच्या विपुत भावूक धन्यवाद द्यावेत काय ? >> " विपु सुलतान " पदवी केली बहाल तुम्हाला !
जी एस , लई भारी
जी एस , लई भारी
भाउ लईच भारी तुम्ही आता एक
भाउ लईच भारी तुम्ही आता एक माबो विशेष व्यंगचित्र मालिका काढाच!!!
" विपु सुलतान " पदवी केली
" विपु सुलतान " पदवी केली बहाल तुम्हाला >>>
भाऊ तुम्ही जीएसला भेटला आहात का? तुमच्या व्यं.चि. मधे जीएस अगदी तंतोतंत उतरला आहे. :p
भाऊ
भाऊ
भाऊ
भाऊ
मस्त
मस्त
आणखी काही नियम : - स्वतःच्या
आणखी काही नियम :
- स्वतःच्या विपुत ( ) दिसतंय का हे पाच पाच मिनिटांनी पाहू नये. दुस-याच्या विपूत ( ) वाढवल्याशिवाय स्वतःची विपु वाढत नाही.
- आपली विपु गच्च भरण्यासाठी ड्युआय ला फुकट राबवू नये.
<< भाऊ तुम्ही जीएसला भेटला
<< भाऊ तुम्ही जीएसला भेटला आहात का? तुमच्या व्यं.चि. मधे जीएस अगदी तंतोतंत उतरला आहे. >> इंद्रधनुषजी, तुम्ही माझ्या 'व्यक्तीरेखे'तला माझा फोटो पाहिलाय का ? पाहिला असतात, तर असं म्हणाला नसतां !
मस्तच रे! खूप हसले.. खूप
मस्तच रे! खूप हसले.. खूप दिवसांनी..
(No subject)
भाउ तुस्सी ग्रेट हो....
भाउ तुस्सी ग्रेट हो....
भाऊ नमसकरांच्या व्यंचिमध्ये
भाऊ नमसकरांच्या व्यंचिमध्ये वहिनी नमसकर हमखास असतातच
<< भाऊ नमसकरांच्या
<< भाऊ नमसकरांच्या व्यंचिमध्ये वहिनी नमसकर हमखास असतातच >> म्हणूनच तर त्याना "प्रचि" न म्हणता "व्यंचि" म्हणतात ना !
हाहा, भाउ, मस्तच ! सन्मि,
हाहा, भाउ, मस्तच !
सन्मि, बर्याच दिवसांनी...
मस्तच एकदम.. विपु नियम मस्त
मस्तच एकदम..
विपु नियम मस्त नी त्यावरचे व्यंचिही खुप्च छान..
जीएस आणि भाउ एकदम जबरीच! अजुन
जीएस आणि भाउ एकदम जबरीच!
अजुन एक:
विपुचा उपयोग नळावरच्या भांडणात पाठिंबा मागण्यासाठी करु नये
(अ) अजिबातच करु नये
(ब) उघडउघड करु नये
(क) केविलवाण्या सुरात करु नये
(ड) चेहरापुस्तिकेत/समस/मेल वाच असा आडुनआडुनही करु नये
(इ) तरीही केल्यास तुमच्याशी भांडणार्या आयडीची बाजू घेणारी पिंक टाकली जाईल
जीएस पुनरागमनार्थ
जीएस
पुनरागमनार्थ स्वागतम्.
तुमचे जुन्या गुलमोहरातले एक रसग्रहण मला अजून आठवतेय (डुबूक डुबूक).
धागा वर आणतेय!! पुन्हा वाचून
धागा वर आणतेय!!
पुन्हा वाचून अजून मजा आली!
(No subject)
भाऊ..मस्तच! तुमची सगळीच
भाऊ..मस्तच! तुमची सगळीच व्यंचि छान असतात.
तुफान
तुफान
विपू म्हणजे काय?
विपू म्हणजे काय?
(No subject)
हे विपु म्हणजे काय ते कोणी
हे विपु म्हणजे काय ते कोणी सांगेल काय?
आईशप्पथ, काय भन्नाट लिहिलंय
आईशप्पथ, काय भन्नाट लिहिलंय आणि प्रतिसाद व व्यं चि देखील अफलातूनच....
लई खास, लई भारी.......
Pages