- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
योग आणि आयुर्वेद
सदस्य प्रवेश |
योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणेयोगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे याबद्दलचे हितगुज. |
|
माज़े हात फ़ार जाड आहेत.... जरा बारिक करण्यावर Yoga मधे काहि आसन आहे का?
डायेट करण्या साठी काय खावे आणि काय खाऊ नये ?
लवकर वजन कमि करावयाचे असल्यास तुम्हि GM डायेट करु शकता. ७ दिवसात ७-१० lbs वजन कमि करु शकता. http://www.iimahd.ernet.in/~jajoo/gmdiet.html
कुठलंही crash diet करू नका. त्याने metabolism अजून खालावतो आणि तात्पुरते वजन कमी झाले तरी ते दामदुपटीने वाढते. जे उतरवायला जास्त कष्ट पडतात.
संपूर्ण lifestyle change आणि त्यात नियमित व्यायाम व संयमित आहार ह्याने हळूहळू जे वजन उतरते ते खरे.
मुळात बाहेरचं अबरचबर आणि तळलेल्या गोष्टी रोजच्या आहारातून कमी केल्या नी फळं, सॅलडस याचं प्रमाण वाढवलं तर शरीर लगेच रिस्पॉण्ड करू लागते.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मी GM diet केले आहे आणि मला काहि त्रास नाहि झाला. तरी तुमच्या कडे काहि diet चार्ट आहे का ? which can tell what to eat and what to not?
मी केलंय GM Diet आणि माझा हा अनुभव होता.
Diet Charts भरपूर उपलब्ध आहेत नेटवर पण ते तसे वापरण्यात अर्थ नाही. आपली प्रकृती बघून आपल्याला योग्य सल्ला देईल असा आहारतज्ञ शोधणे ही पहिली पायरी.
उपाशी रहाण्याची diets देणारेही अनेक जण बाजारात आहेत त्यांच्यापासून जपून.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
रोज फक्त ६ सुर्यनमस्कार घातलेत की जाड्/लठ्ठ हात लवचिक आणि पातळ होतात हा माझा स्वानुभव आहे. सुर्यनमस्कार केल्यानी काही प्रमाणात उंची देखील वाढते. हात बारीक करण्यासाठी चक्रासन, गोमुखासन, उष्ट्रासन ही आसनं उपयुक्त ठरतील.
दिपा
मी जीएम डाएट ४ महिन्यापूर्वी २-३ आठवडे केले होते(सलग नाही, १-२ आठवड्याचे अंतर ठेवुन). त्यात माझे ९ किलो वजन कमी झाले. मी ७० वरुन ६१ किलो वर आलेय्.आता वजन उंचीच्या प्रमाणात योग्य आहे. आणी गेले ४ महिने माझे वजन ६१ किलो च रहिलेय.
आहारात चांगला बदल झाला आहे.फळे, सलाड खाण्याची तसेच रोज चालण्याची सवय झाली आहे. पण विशेष म्हणजे डाएट करताना किंवा केल्यानंतर कसलाही त्रास झाला नाही.डाएट संपल्यानंतर मी लगेच रेग्युलर जेवण घ्यायला सुरवात केली.तरी वजन तेवढेच आहे. त्यामुळे मला तरी या डाएटचा खूप फायदा झाला आहे.
thyroid मुळे वाढलेल वजन कमी कस करता येईल.
coz Thyroid मुळे माझ वजन ५५ वरून सध्या ६९ झाल आहे.
दिवसेंदिवस वजन वाढ्तच जातेय...
आधी इतक काही वाटलं नाही , पण आता खूप त्रास होतोय.
औषध चालू आहे, पण तरीही diet vagaire control करुनही फारसा फरक दिसत नाहिये...
कुणाला याबद्दल माहित असल्यास सांगेल का?
शाकाहारी लोकांसाठी जीएम डाएट मधे काय फरक करायचा?
बीफ ऐवजी काय खायचे???
कोणी सांगेल का?
धन्यवाद.
हा बीबी फक्त वजन कमी करण्यासाठी नसून.. योगासनांच्या माध्यमातून वजन कमी करण्याबद्दल आहे.
माझ्या अनुभवावरुन खालील आसने उपयुक्त:
उष्ट्रासन
उत्तानपादासन
हलासन
पवन्मुक्तासन
मत्स्यासन