करड्या निस्तेज राखाडी आकाशात,
पांढुरक्या हिमशिखरांच्या मागून
आत्ता कुठे उगवायला लागलाय चंद्र,
वार्याने हलणार्या पाईनच्या सावल्या मात्र,
तितक्याच गडद आणि भेसूर ……
नेहमीचा स्निग्ध शीतल चंद्रप्रकाश,
आज ओरबाडून काढतोय अंधाराला
त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी, हवा तसा.
…. दिसू लागलंय त्याचं शरीर
त्या उरल्या सुरल्या अंधारातूनही
देहाच्या उष्ण मांसल गोळ्यातून
फांद्या फुटावेत तसे फुटलेले हातपाय
आता मुडपून पडलेत वेडेवाकडे
शिशीराची पानगळ नेहमीच त्रासदायक
झडून गेलेल्या पानांच्या आठवणीतलं झाड
भरकटलेल्या मनाला देऊन जरब
डोळे स्थिरावतात पुन्हा समोर
….. जमिनीवरच्या किड्यासारखी रेंगाळत
नजर सरकत चाललीये त्याच्या बुटांवरून…..
चिखल, माती, बर्फाची चढलेली पुटं
अन् जीर्ण वस्त्रांच्या मागून दात विचकणार्या,
वेदना हरवलेल्या जुनाट काळसर जखमा
छातीवरची जखम मात्र ताजीतवानी,
तारूण्याच्या ऐन भरात असलेली
रक्त ठिबकतंय मंदावणार्या स्पंदनाबरोबर
एक एक थेंब…. मृत्युची वाट शोधणारा
बर्फाळ वारा माजलेल्या सांडागत धडका देतोय
जीव घेण्याचा बेत दिसतोय बेट्याचा
हुं: .... अशा तशाने मरायचा नाही मी
…… कळलं का रे !!
घोटू शकतो मी गळा मृत्यूचाही
पुरावा ….. ? समोरच पडलाय
… छातीवर भोसकलाय मीच त्याला…. आत्ताच
मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!!
मायभूमी लुटायला आला होता
मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!>>>
उत्तम शेवट, रहस्यमय व खिळवून ठेवणारा मध्य आणि निसर्गचित्रण असावा असा आरंभ!
कवितेची लांबी घसघशीत आणि व्याप्ती धरतीमातेशी निगडित!
भोसडीचा हा शब्द काहीसा विसंगत, फुलांच्या बागेत सरडा दिसावा तसा!
एकंदर इफेक्ट फार आवडला.
द्या अजून कविता!
-'बेफिकीर'!
"उत्तम, गुढ युध्द वर्णन"...
"उत्तम, गुढ युध्द वर्णन"... छान चँप.
अ:[मी विचार करतोय तु सध्या कोणत्या परिस्थीतीतुन जात असशील..?
काळजी घे रे.]
जबरदस्त!
जबरदस्त!
जबर्दस्त!!
जबर्दस्त!!
आशू ... सहीच आहे .... तुझ्या
आशू ... सहीच आहे .... तुझ्या कवितांची पंखा ....
धन्यवाद सर्वांना.... भोसडीचा
धन्यवाद सर्वांना....
भोसडीचा हा शब्द काहीसा विसंगत, फुलांच्या बागेत सरडा दिसावा तसा!
बेफी - शक्यता आहे पण मला तर याहीपेक्षा तीव्र शब्द वापरायचा होता. त्यावेळी त्याचा संताप व्यक्त शिवीने जितक्या चांगल्या प्रकारे व्यक्त होतो तो आणखी कशाने नाही असे मला वाटते.
आणि भारतीय जवान शिवी कसा देईल मारल्यानंतर असा प्रश्न असेल तर त्याबाबत अधिक माहीत देऊ शकेन...
चातका - असे काही नाहीये रे...ही फक्त कविता आहे...स्फुरलेली..आणि त्याचा प्रेरणास्त्रोत वेगळा आहे..
धन्यवाद रश्मे
भीतीदायकच वाटली
भीतीदायकच वाटली
दणदणीत
दणदणीत
आशु... जरा उशीरा
आशु...
जरा उशीरा कळाली.....
खुप छान.....
सावरी
जबरी.... आवडली
जबरी.... आवडली
बापरे आशु ही तुझी कविता
बापरे आशु ही तुझी कविता आहे.... दम लागला मला वाचुन
सह्ही सह्ही,सह्ही... :
जबरदस्त..
जबरदस्त..
धन्यवाद ... स्मिता, किश्या,
धन्यवाद ...
स्मिता, किश्या, मंदार, सावरी, चिमुरी, आणि स्मिहा
बापरे आशु ही तुझी कविता आहे....
जबरदस्त...!
जबरदस्त...!
जबरदस्त..! आशू तुने एक मारा
जबरदस्त..!
आशू तुने एक मारा पर शॉल्लीट मारा..!
अमित, अगदी अगदी.
अमित, अगदी अगदी.
आशु, मस्तच आहे कविता मायभूमी
आशु, मस्तच आहे कविता
मायभूमी लुटायला आला होता भोसडीचा,
सिमेपल्याड वळवळणारा गांडूळ…..
कसा मस्त चिरडून टाकलाय !!!>>> हे अगदी त्या जवानाची मनस्थिती स्पष्ट करतं आणि त्याला मिळालेलं समाधानही.
जबरी आहे
जबरी आहे
आणि भारतीय जवान शिवी कसा देईल
आणि भारतीय जवान शिवी कसा देईल मारल्यानंतर असा प्रश्न असेल तर त्याबाबत अधिक माहीत देऊ शकेन...>>
असा माझा काही प्रश्न नाही आहे.
अमित, मुक्ता, ठमा, मुक्तेश्वर
अमित, मुक्ता, ठमा, मुक्तेश्वर खूप धन्स...
बेफी - मग क्षमा असावी, तुमचा प्रतिसाद समजला नाही.
मस्तच रे आशु!!!! आपल्या
मस्तच रे आशु!!!! आपल्या सर्वांच्याच मनातला संताप, उद्वेग तू सही व्यक्त केला आहेस! आवडली एकदम!!!
धन्यवाद सानी...खूप सुंदर
धन्यवाद सानी...खूप सुंदर प्रतिसाद
आवडली रे...मस्तच कविता !
आवडली रे...मस्तच कविता !
बाप रे! डेडली. असंच हवं मस्त
बाप रे! डेडली. असंच हवं
मस्त
धन्य चैतन्य, पल्ली
धन्य चैतन्य, पल्ली
आशुचँप
आशुचँप ,
मस्तच.......
'भोसडीचा' अगदी चपखल बसला आहे.
तिथे पोहोचल्यावर त्या शब्दाने तापलेले डोके थोडे शांत झाल्यासारखे झाले.......
धन्यवाद निशदे... आपण भेटलो
धन्यवाद निशदे...
आपण भेटलो आहोत का याआधी?
व्वा ..... आशुचॅंप ....
व्वा ..... आशुचॅंप .... जबरदस्त वाटली कविता.
सुरवातीला किंचित् गूढ वाटली, नंतर काहीसा बीभत्स रस डोकावला आणि अखेरीस वीररस.
.... छान. बीभत्स आणि वीर या दोन्ही रसांचं संतुलित मिश्रण.
आणि त्या जवानाच्या तोंडातून सहजतेने बाहेर पडलेली शिवी, अगदी समर्पक….
.... कवितेला एक जोष, जान देऊन गेलेय. अश्लील/अश्लाघ्य वाटत नाही.
अफाट आणि काय!!!?
अफाट आणि काय!!!?
चँप, एकदम चँप कविता झालिये!!
चँप, एकदम चँप कविता झालिये!! कविता वाचून शेवटच्या ओळीवर येईपर्यंत डोकं भणाणून मुठी वळू लागल्या होत्याच....
Pages