Submitted by धनेष नंबियार on 4 May, 2011 - 11:15
आई तुझ्या कथेतील
परी सांग ना कोणाची?
शांत लाजर्या चांदोबाची
कि लखलखणार्या सुर्याची....
आवकाशातुन कोसळणारे
हे आश्रु सांग ना कोणाचे?
रंगबेरंगी धनुष्याचे
कि गडगडणार्या ढगांचे...
झाडांमध्ये लपलेले ते
घरटे सांग ना कोणाचे?
चिऊताईचे मेणाचे
कि कावळ्याचे ते शेणाचे...
आई तुझ्या हातातले
गोड घास सांग ना कोणाचे?
इथे इथे बस रे मोराचे
कि तुझ्या या छकुल्या बाळाचे....
- धने(श)ष
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान रे !!
छान रे !!
झाडांमध्ये लपलेले ते घरटे
झाडांमध्ये लपलेले ते
घरटे सांग ना कोणाचे?
चिऊताईचे मेणाचे
कि कावळ्याचे ते शेणाचे... >> कि कावळ्याचे ते शेणाचे... ही ओळ नाही समजली. (लाहानांसाठी आहे म्हणुन काहीही कसं चालेल...) मुलाने झाडावरचे घरटे विचारले त्यात 'शेण' कसंकाय मिळालं...?
इतकी मेहनत घेउन प्रतिसाद दिला आहे.
तुम्हाला माहीत असलेल्या साहेबांकडुन अर्थ वाचुन घ्यायचा नसेल तर तुमचा अर्थ लवकर सांगा... काय धने(श)ष साहेब..?
कि कावळ्याचे ते शेणाचे... ही
कि कावळ्याचे ते शेणाचे... ही ओळ नाही समजली. (लाहानांसाठी आहे म्हणुन काहीही कसं चालेल...) मुलाने झाडावरचे घरटे विचारले त्यात 'शेण' कसंकाय मिळालं...? >> जर म्हातारी भोपळ्यात बसू शकते, जर पोटामध्ये बी गेल्यावर त्याचे झाड होऊ शकते, तर माझ्या कवितेतल्या झाडावर शेणाचे घरटे का आसू शकत नाहि?
कि कावळ्याचे ते शेणाचे.... अर्थ : लहानपणी आजी मला एक मल्याळम भाषेतले बालगीत ऐकवायची ' काके काके कुडएविडे', पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्याशी मिळते जुळते कथा - कविता मराठी भाषेत सुद्धा ऐकायला मिळाले... ' चिऊताईचे घर मेणाचे असते आणि कावळ्याचे घर शेणाचे. एकेदिवशी खुप मोठा पाऊस येतो... कावळ्याचे घर वाहून जाते..........' या कल्पनेचा वापर मी माझ्या कवितेत करण्याचा प्रयत्न केला...
सर्व साहेबांचे येथे स्वागतच आहे....
चातक साहेब,
फुल्या, बेफिकीर, भुंगा इ. साहेबांच्या यादित तुम्ही सुद्धा आहात... आणि फक्त माहीत असलेले नाहि तर आवडते सुद्धा.... किरण्यके यांच्या कवितेला दिलेला प्रतिसाद हा केवळ एक विनोद होता.... आणि प्रयत्नहि तुमच्यात सहभागी होण्याचा.
असो, कवितेस दिलेल्या प्रतिसादा बद्दल मनःपुर्वक धन्यवाद!
किरण्यके धन्यवाद!
किरण्यके धन्यवाद!
' चिऊताईचे घर मेणाचे असते आणि
' चिऊताईचे घर मेणाचे असते आणि कावळ्याचे घर शेणाचे. >> असं यमक आहे तर. धन्यावाद आता ही गोष्ट मलाही माहीत झाली.
पण त्या गोष्टी आता जुन्या झाल्या.
आजकालची मुलं एडवान्स आहेत.
म्हातारी भोपळ्यात बसवली तर आपल्यालाच 'भोपळा' समजतील, इतकी.
आजकालची मुलं एडवान्स
आजकालची मुलं एडवान्स आहेत.
म्हातारी भोपळ्यात बसवली तर आपल्यालाच 'भोपळा' समजतील, इतकी. >>
चातका.... किती सुटलाहेस बाबा?
चातका.... किती सुटलाहेस बाबा?
चातका.... किती सुटलाहेस बाबा?
चातका.... किती सुटलाहेस बाबा? >> ??????
छान
छान
चातका.... किती सुटलाहेस बाबा?
चातका.... किती सुटलाहेस बाबा? >> ??????
>> धनेष साहेब, ते खाली 'अवांतर' चे नोट लिहायला विसरले आहे.
त्यांच्यावतीने मी माफी मागतो.
आणि हो ते खरे साहेब आहेत. मला कृपया एकेरी नावानेच संबोधा.
धनेष साहेब, ते खाली 'अवांतर'
धनेष साहेब, ते खाली 'अवांतर' चे नोट लिहायला विसरले आहे.
त्यांच्यावतीने मी माफी मागतो. >>>
चातका अवांतरच्या टिप्पण्या मी नेहमी पांढर्या शाईने लिहीतो. आय होप, तू वाचले असशीलच
रचु धन्यवाद! चातका अवांतरच्या
रचु धन्यवाद!
चातका अवांतरच्या टिप्पण्या मी नेहमी पांढर्या शाईने लिहीतो.>> चातक, पांढर्या शाईने लिहीलेल्या टिप्पण्या काळा गॉगल लावुन वाचावे लागत असेल, नाही का ?