द एक्स्ट्रॉ मॅरायटल - प्रेमा कतलानी

Submitted by बेफ़िकीर on 4 April, 2011 - 11:44

प्रेमा कतलानी!

२९ नोव्हेंबर १९९७ ची ती रात्र! अहमदनगरलाही पाऊस होता. त्यावेळेस कंपनीत माझी जी पोझिशन होती तिला प्रवासासाठी कार मिळायची नाही. पण त्या दिवशी अहमदनगरच्या प्लँटला एक साहेबही आलेले होते, जे परत जाणार असूनही नेमके काहीतरी अर्जन्सीमुळे थांबले आणि त्यांची कार त्यांच्याविनाच जाणार हे ठरले. कॉस्ट सेव्हिंग! लग्गेच कुणीतरी विषय काढला की कटककर पुण्याला चाललाय, त्याला जाऊदेत की त्या गाडीतून!

जन्म मुत्यूच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे असेल किंवा 'किमान' खरोखर व्यक्त व्हायचे असेल तर स्वतःला स्वतःसमोर आणि समाजासमोर नागडे करावे लागते. 'नागडे' याचा अर्थ वस्त्रहीन शरीर नाही. मनाला नागडे करावे लागते.

धाडस लागते त्याला!

आणि ते कवितेच्या माध्यमातून होणे सोपे असले तरीही गद्यात मुळातच एक नागडेपण असते आणि त्यामुळे आपले मन नग्न करणे गद्याच्या माध्यमात अधिक सुलभ ठरते.

सुंदर वस्त्रांमध्ये झाकलेले आणि त्याचमुळे लोभस, अप्राप्य, गूढ, आकर्षक आणि हृदयद्रावक वाटणारे लेखन म्हणजे कविता आणि नग्न असल्यामुळे हिडीस तरीही कुतुहलजनक आणि प्राप्य वाटणारे लेखन म्हणजे गद्य! ओह, मी कवितेला पद्य का नाही म्हणालो? कारण पद्य लोभस किंवा आकर्षक असेलही, पण अप्राप्य, गूढ आणि हृदयद्रावक यांच्यापैकी बहुतेक सर्व किंवा किमान दोन घटक त्यात नसतील.

तर गद्य!

प्रेमा कतलानी गद्य नव्हती, कविताही नव्हती, ती केवळ पद्यही नव्हती. ती या तिन्हींचे मिश्रण होती.

हे वाक्य मात्र च्यायला मी गद्यात लिहीले राव!

कधी एकदा पुण्याला पोचतोय ही पुण्याबाहेरून पुण्यात यायला निघालेल्या तमाम पुणेकरांची भावना प्रवासाच्या सुरुवातीला निर्माण झाली आणि अर्ध्या तासातच ती नामशेष होऊन 'कशाला पुण्यात जायचंय' अशी नवीन 'गूढ' भावना निर्माण झाली.

पाऊस हा माझ्या आयुष्यातील काही वैतागांपैकी एक वैताग आहे. आणि मी हा पावसाच्या आयुष्यातील एकमेव वैताग आहे. नशीब एकेकाचे! पावसाला मी आवडत नाही. कारण त्याला मी घाबरत नाही. मी मलाही घाबरत नाही. नाहीतर दिवसाला साडे सहा पेग्ज आणि सोळा गुडांग गरम हे कुणी केले असते?

मी घाबरतो फक्त माझ्या प्रतिमेला! 'लोक काय म्हणतील' हा प्रश्न मला वयाच्या कितव्यातरी वर्षापासून सर्वाधिक छळत आलेला आहे.

हं! तर पावसाला मी घाबरत नाही. कारण पाऊस आला की मी मुद्दाम कोणतेही 'पाऊसरोख' अस्त्र न घेता बाहेर पडतो. सुदैवाने माझ्याकडे चिक्कार टी शर्ट्स आणि शर्ट्स आहेत. सरळ टू व्हीलरवरून बाहेर जातो, एका ठेल्यावर सिगारेट ओढतो आणि परत येतो. आल्यावर डोके पुसतो. बाकी अंग पुसले नाही तरच बरे वाटते. 'तू असा का बाहेर चालला आहेस' हा प्रश्न घरच्यांनी विचारणे सोडल्यालाही आता कितीतरी वर्षे झाली असावीत. अरे हो, कुणीतरी म्हणेलही की 'माझ्याकडे चारचाकी आणि दुचाकी दोन्ही असल्याचे सांगण्याचा क्षीण प्रयत्न'! म्हणूदेत! मायबोलीवरील काही काही कमेंट्स मला अतिशय व्यवस्थित लक्षात असतात. माझ्या धाग्यावरच्या नसल्या तरीही! हं! आता ती कमेंट देणारा माझाच दुसरा आय डी आहे हेही म्हंटले जाईल म्हणा, पण म्हणोत बापडे!

"मुझे पता नही था के इंदौरके लिये यहांसे बसही नही है"

प्रेमा कतलानीचे ते विधान कानात गुंजते!

तिथे तंबाखू घ्यायला कृष्णा नावाचा ड्रायव्हर जर थांबला नसता तर? काय बनलो असतो मी? एक नक्की, कुणीच बनलो नसतो इतके नक्की! आज मी निदान कुणीतरी आहे. किमान थट्टेचा विषय!

माणसाने झाडे कापली, डांबरी रस्ते केले, इमारती बांधल्या पण श्वासासाठी प्राणवायूची गरज, तहानेसाठी पाणी, भूकेसाठी अन्न आणि कामभूकेसाठी परलिंगाचे आकर्षण या चार गोष्टींवर विजय नाही मिळवला. चंद्रावर पोचला साला! समलिंगी आकर्षण असणार्‍यांना सलाम! ते त्या चार घटकांपैकी एकावर विजय मिळवतात. आपल्याला नाय जमायचं! है ना?

"पूनासे इंदौर जानेवाली हर बस यहींसे जाती है"

मी माझे अगाध प्रवास केल्यानंतर मिळवलेले ज्ञान पाझळले.

मला आता नक्की आठवत नाही, पण बहुतेक पाऊस हसला होता माझं वाक्य ऐकून!

कुणी मला 'सुसंस्कृतता' या शब्दाचा अर्थ नीटपणे सांगाल का?

म्हणजे असा अर्थ, जो सापेक्षतावादाच्या पलीकडचा आहे? सापेक्ष हा एक गोंडस शब्द वापरला की किती प्रश्न सुटतात नाही? प्रेमा कतलानीच्या मते अहमदनगरहून इंदौरची बसच न सुटणे ही गोष्ट वाईट होती. आणि माझ्यामते पुण्याहून इंदौरला निघालेली प्रत्येक बस तिथूनच जाते आणि तिथे थांबतेच हे ज्ञान तिला नसणे हे वाईट होते. की चांगले होते?

"डेढ घंटेसे खडी हूं"

कोणत्याही मुक्तछंदात खपावे असे हे वाक्य!

पराकोटीचे चांगले वागायचे संस्कार अत्यंत दबावपूर्ण पद्धतीने केल्यानंतर व्यक्तीमत्वाचा स्फोट होऊ शकतो हे जाणवण्याचे आई वडिलांचे तेव्हा वय नसते आणि स्फोट होतो तेव्हा तो रोखण्याची त्यांची 'पोझिशन' नसते.

झालं?? आई बापांना दोष दिला की मी मोकळा! मला जन्माला घालायचा काय अर्ज केला होता मी? हा प्रश्न टाकला की जन्माला आल्याचे सर्व नैतिक व अनैतिक फायदे घ्यायला मी मोकळा!

पुरुष अत्यंत चारित्र्यवान व संयमी असू शकतो व त्याने तसेच असावे.

कोणत्या 'येड**'ने हे वाक्य म्हंटलंय कुणास ठाऊक!

आपण पुरुषाला पुरुष म्हणतो हीच चूक आहे. स्त्रीने निर्मिलेला आणि स्त्रीला प्राप्त करण्याची आकांक्षा बाळगणारा व त्याचबरोबर स्वतःसाठी सर्व प्रकारची भौतिक, अध्यात्मिक वगैरे सुखे मिळवण्याचा प्रयत्न करणारा व स्त्रीला प्रजनन करण्यास सहाय्यकारक ठरणारा दुराभिमानी माणूस! एवढे दर वेळेस बोलायचा कंटाळा म्हणून पुरुष म्हणायचे!

असो! या 'असो'चेही असेच! सापेक्ष या शब्दासारखेच! गेल्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा एखाद्याच्या अणि शेवटी लिहायचे 'असो'! ब्रह्मदेवाचे बाप सगळे!

भिजलेली नसती तरी प्रेमा कतलानीच्या स्ट्रॅप्स दिसल्याच असत्या असे ब्लाऊझ होते तिचे!

निषेध निषेध! बेफिकीरला हाकलून द्या!

एकेकाळी मी जानवे घालायचो आणि दिवसातून एकदा संध्या करायचो.

या विधानातील 'मी' हा शब्द गाळणे व 'घालायचो' अन 'करायचो' या शब्दातील 'चो' चा 'चा' करणे आवश्यक आहे. 'तो' मी आता राहिलेलो नाही.

"ये इधर सामने रुकती है बस... "

मी बहुतेक ड्रायव्हर गाडीत आहे या गोष्टीला लाजत असणार! हल्ली मला माझा स्वतःचा अभ्यास फार छान करता येतो. 'हा असताना मी कसा काय हिला लिफ्ट ऑफर करणार?' असेच मला वाटलेले असणार हे उत्तर लगेच दिले की नाही?

सवाष्ण चारचौघांसमोर वागते तसा मी त्या फियाटमध्ये वागत होतो आणि वेश्या चारचौघांना वागवते तसा पाऊस लोकांना भिजवत होता.

साडी, पंजाबी ड्रेस, टीशर्ट, पोषाख काहीही असो! काय बघायचे हे पुरुषांना आणि काय दिसू द्यायचे हे बायकांना माहीत असते. त्याउप्पर कुणी जात नाही. नाहीतर असे कित्येक लेख इथे असते.

मला स्त्रीचे आकर्षण, भीती आणि कीव एकाचवेळी वाटते. स्त्रीलाही पुरुषांचे आकर्षण, भीती आणि दुर्दैवाने उगाचच दरारा वाटत असतो. पुरुष खरे तर बिचारा असतो. हेही 'सापेक्षच'! 'असो'!

"पहुंचादेंगे क्या पूनातक??"

प्रेमा कतलानी ड्रायव्हरच्या शेजारी बसू नये याचे मी प्रयत्न केले हे न सांगणे म्हणजे माझ्याचविरुद्ध मी वागत आहे असे होईल.

फियाट फार चांगली गाडी आहे. तिच्या पुढच्या सीटला पुण्यातल्या बीआरटी का काय ते तसा डिव्हायडर नसतो. सलग सीट! कित्ती कित्ती हीन माणूस आहे नाही मी?

मोह!

ज्यांना लेख वाचण्यात प्रॉब्लेम्स आहेत, माझा निषेध करायचा आहे, मला लवकरात लवकर 'डिसाअयडी' करावे अशा तक्रारी करायच्या आहेत त्यांनी आपले वाचन नेमके याच पातळीला थांबवावे.

हा लेख निरुद्देश नाही. हा लेख 'माझे अधिकाधिक वाचक असावेत' या उद्देशाचा नाही. चीप पॉप्युलॅरिटी तर आपण रोजच मिळवतो. त्यात काय विशेष?

अहमदनगरला पाऊस पडू शकतो, इंदौरच्या बसेस पुण्याहून सुटतात आणि फियाट ही एक चांगली कार आहे यापैकी काही सांगणे हाही उद्देश नाही या लेखाचा!

मानवी समाजात निर्माण झालेले सर्व कायदे तात्कालीन व असमर्थ आहेत हे सांगणे! हा उद्देश आहे. आपण निसर्गाला नाही जिंकू शकत! जे खरे आहे ते खरे आहे! उगाच गुडीगुडी किती दिवस लिहायचे राव?

हे इथल्या पॉलिसीत बसत नसेल तर उद्यापासून मी पुन्हा कादंबरी लिहिताना दिसेनच, किंवा अजिबात नाहीसुद्धा काही लिहिताना दिसणार आयुष्यभर! माझी एवढीच विनंती आहे की 'हा लेख ही केवळ एक काल्पनिक कथा आहे' असे समजून प्रशासकांनी ती प्रकाशित होऊ द्यावी. काही कारणाने पटले नाही तर मग 'छान छान' लिहिणारे खूप आहेतच.

अंतर्बाह्य भिजलेल्या प्रेमा कतलानीचे अनवधानाने होणारे स्पर्श काय करून गेले याचा तपशील मांडणे हा कथेचा उद्देशच नाही.

पुण्यात पोचलो तेव्हाही फियाटमध्येच होतो हा बहुधा माझ्या संस्कारांची परिणाम करण्याची अतिरिक्त क्षमता असावी.

मी प्रवासात, म्हणजे एकटाच ड्राईव्ह करत जात असेन तर, खूप गाणी म्हणतो.

२९ नोव्हेंबर १९९७ ला ही मी एकटाच समजत होतो स्वतःला! खूप खूप गाणी म्हंटली.

दीज फेसलेस एन्काऊंटर्स टेक यू नो व्हेअर!

पुण्यात अशा वेळेला पोचलो जेव्हा इंदौरची शेवटची गाडी निघून गेलेली होती. धुळ्याची एक गाडी होती. त्यात तिला बसवून दिले.

आय वॉज बॅक होम! टू बी अ‍ॅन आयडियल हसबंड!

नीतीमत्तेच्या सर्वमान्य व्याख्या आणि स्वमान्य व्याख्या यांच्यामध्ये गोंधळलेल्या अवस्थेत येण्याची ही पहिली पायरी! व्याख्या तरी कशाची करता येते? सूर्याची करता येते? जो प्रकाश देतो तो सूर्य? असे म्हणता येईल? किंवा जो पृथ्वीवर जीवनसृष्टी निर्माण करतो तो सूर्य? मग जो सध्या एप्रिलमध्येच भारताला भाजत आहे तो कोण आहे? जो मावळल्यावर काहींचा दिवस सुरू होतो तो कोण आहे? चांगला कोण आणि वाईट कोण हे नाही ठरवता येत. सूर्यही वाईट वागू शकतो. माणसाने फक्त चांगल्या स्वभावाचे असावे असे मला वाटते. बाकी दुनिया खड्यात गेली. कुणीही कुणाचाही नाही.

प्रेम! सहवासाचे प्रेम हे एकमेव प्रेम आहे. जन्माला आलेल्या मुलाला जन्मल्याजन्मल्याच तिसर्‍याच पाजत्या बाईकडे ठेवले, जसे संभाजीमहाराजांना धाराऊकडे सोपवले होते, तर त्या मुलाला स्वतःच्या जन्मदात्रीची भेट वीस वर्षांनी झाली तरीही सांभाळणार्‍या आईबद्दलच अधिक प्रेम वाटेल.

सहवास!

आपला आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी फक्त सहवास असतो आणि त्या सहवासामुळेच ते प्रेम असते. या तत्वाला अपवाद एकच! आई आणि अपत्य यातील आईचे अपत्यावरील प्रेम! सईबाई जर जिवंत राहिल्या असत्या तर संभाजी महाराजांना जरी त्यांच्यापेक्षा धाराऊबद्दल अधिक वाटले असते तरीही सईबाईंना संभाजीला पाहिल्यावर मातृत्वच उफाळुन आल्याचा अनुभव आला असता.

आपली आई आणि आपण हे नाते सोडले तर संपूर्ण जग तात्कालीन प्रेमावर उभारलेले आहे असे मला वाटते. अगदी बाप आणि मुलगासुद्धा!

हं! वादोत्पादक आहे खरे असे म्हणणे! पण ... का कुणास ठाऊक, त्या पावणे दोन तासात प्रेमा कतलानीने ते खरे ठरवले.

दोष नक्कीच माझाच असावा... की मी ते आधी जाणलेले नव्हते.

दिवसातले काही तास मायबोलीवर असणे यात आपण आपल्या एंप्लॉयर, लाईफ पार्टनर यांच्यापैकी कुणाचा विश्वासघात करतो असे आपल्यापैकी कुणाला वाटते का?

मला नाही वाटत! इन्टरनेटचे बिल शक्य असूनही मी कंपनीला नाही लावत! कंपनीचे काम करून मग लेखन करतो. पण तरीही... कोणत्याही समाजाच्या नीतीमूल्यांनुसार.. मी कंपनीचा विश्वासघातच करत असतो ना?

विश्वासघात ही एकच गोष्ट सापेक्ष नाही असे मला वाटते. विश्वासघात केला आहे हे न कळणे आणि विश्वासघात केला हे कळणे यात फरक आहे.

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

'भुषणराव', पुन्हा एकदा वैचारीक पातळीवरचा लेख.

त्या प्रसंगा समयी झालेली 'मनाची' जी सत्य अवस्था तुम्हाला मांडायची आहे, ती तुम्ही वेळोवेळी लेखात पटवुन देताना स्पष्ट होत आहे. आणि 'ती' पटवुन देण्याची रोकठोक 'पद्धत' ही आवडली. मुळात लेखक असाच असावा या विचाराचा मी आहे.

मानवी समाजात निर्माण झालेले सर्व कायदे तात्कालीन व असमर्थ आहेत हे सांगणे! हा उद्देश आहे. आपण निसर्गाला नाही जिंकू शकत! जे खरे आहे ते खरे आहे! उगाच गुडीगुडी किती दिवस लिहायचे राव? >> अगदी सहमत. या लेखात आपण 'मानवी' मनाची एक बाजु मांडली आहे जी सर्वज्ञात आहे, पण त्यावर कुणी स्पष्ट लिखाण (माझ्या मते निदान मायबोलीवर तरी) करताना आढळत नाही किंवा तिरस्कार नसला तरी त्यांना या गोष्टींवर लिहण्यास, चर्चा करण्यास संकोच वाटतो.

तुमच्या रचनेत अश्या प्रकारचे आणखी लेख वाचायला आवडतील.

धन्यवाद चातकराव,

आपण माझाच किंवा मी आपलाच ड्यु आय डी आहे अशा आरोपांना मी आता तयार आहे. किमान एका माणसाने हे लेखन गौरवले. वा वा!

पण त्यावर कुणी स्पष्ट लिखाण (माझ्या मते निदान मायबोलीवर तरी) करताना आढळत नाही किंवा तिरस्कार नसला तरी त्यांना या गोष्टींवर लिहण्यास, चर्चा करण्यास संकोच वाटतो.>>>

आंतरजालीय लेखकांना इतके धाडस होत नाही. पुस्तके छापणार्‍यांना होते. आंतरजालाचे कायदे हार्ड कॉपी प्रकाशकांपेक्षा 'का वेगळे असावेत' हे काही लक्षात येत नाही.

आपल्या प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

सवाष्ण चारचौघांसमोर वागते तसा मी त्या फियाटमध्ये वागत होतो आणि वेश्या चारचौघांना वागवते तसा पाऊस लोकांना भिजवत होता. >> जोरदार टाळ्या

बाकी लेख प्रामाणिकपणे मांडला आहे, त्याबद्दल अभिनंदन

आपण माझाच किंवा मी आपलाच ड्यु आय डी आहे अशा आरोपांना मी आता तयार आहे. >> Lol
'भुषराव' हरकत नाही... "लॉग इन" 'आय.पी' एड्रेसमुळे कमीत कमी अ‍ॅडिमिनकडे सर्व माहिती असते, प्रतिसाद कोणत्या ठीकाणाहुन येत आहेत ते..!

आंतरजालीय लेखकांना इतके धाडस होत नाही. पुस्तके छापणार्‍यांना होते. आंतरजालाचे कायदे हार्ड कॉपी प्रकाशकांपेक्षा 'का वेगळे असावेत' हे काही लक्षात येत नाही. >>>'भुषणराव' माझ्या मते "आंतरजालावर" प्रत्येक विषयातील प्रामाणिक मते, लेख, सुचना, सत्य घटनेवर आधारीत कादांबर्‍या, घटना, प्रामाणिकपणे मांडण्यास काहीच हरकत नसावी.
पुस्तकांतुन लेखकाशी वाचकांना थेट संपर्क करता येत नाही, त्यामुळे तत्कालिन मत प्रदर्शन होत नाही. पुस्तक लेखाकाची हक्काची वस्तु असल्यामुळे ते लिहताना मनावर दडपण येत नाही.

उलट्पक्षी आंतरजालावर आपण पुर्णपणे दुसर्‍यावर अवलंबुन असतो. जरी अगदी मालकीचे संकेत स्थळ असले तरी... काही प्रमाणात हे घटक कारणीभुत असु शकतात.
(तरी 'हद्दपार' पार करणारी 'किळसवाणी' संकेत स्थळे आहेतच)

किमान एका माणसाने हे लेखन गौरवले. वा वा! >> पारंपारिक लेखक अशी परीस्थिती मांडताना तिला असं काही 'वळण' देतात की त्यातला खरेपणा जाउन 'सुमार कल्पनाविलासच' कोरुन ठेवतात किंवा तशी मुळ्परिस्थितीच नसते.
खरंतर लोकांना असा 'विरोध' करुन हेच दाखावयचे असते की आपण किती सभ्य आहोत, पण लेखाकाने कितीही "वैधानिक इशारे" दिले तरी 'ते' लेख पुर्णपणे वाचुनच काढणार. आणि मग लेखकाच्या जिवावर आपल्या "तथाकथित सभ्यपणाचा" गावभर 'गाजावाजा' करणार. अशा 'सभ्य' लोकांच्या समाजात साधुसंतही (ज्यांना 'खरेच' "ब्रम्हज्ञान" प्राप्त आहे) खरे बोलण्याचा धाडस करत नाही.... ते फक्त म्हणतात "भक्तजनांनो आपले नयन चक्षु बंद करा आणि अनुभवा..अहाहा.. की तुम्ही 'स्वर्गात' आहात".
(ज्याचे 'अस्थित्त्वच' वादीत)

धन्यवाद!*

नितिन, चातकराव, भिब्ररा,

आभारी आहे.

अवांतर - ही व्यक्ती संथारा घेणार्‍यां जैन महिलांच्या मध्ये कार्यरत होती. तिलाही जैन पद्धतीने सन्यास घ्यायचा होता. हे लिहायचे राहिलेच!

सुंदर लेख!!

जन्म मुत्यूच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे असेल किंवा 'किमान' खरोखर व्यक्त व्हायचे असेल तर स्वतःला स्वतःसमोर आणि समाजासमोर नागडे करावे लागते. 'नागडे' याचा अर्थ वस्त्रहीन शरीर नाही. मनाला नागडे करावे लागते.

हा लेखातील सर्वात जास्त आवडलेला आणि पटलेला परीच्छेद!!

कैचयाकै परेमा कतलानि मन्जे शिला कि जवानि सार्ख वात्तयं.
चार चान्गल्या वाक्याचा मसाला ताकुन थोबाद रन्गवुन रन्गवुन मिरवलि आहे परेमा २४ मधे आता शबनम सहारा , आलिया भोगासि, नारि नादान, मन्चली दास, मोरनि पन्खेवालि अशि नाव बगायला मिल्तिल.

दिवसातले काही तास मायबोलीवर असणे यात आपण आपल्या एंप्लॉयर, लाईफ पार्टनर यांच्यापैकी कुणाचा विश्वासघात करतो असे आपल्यापैकी कुणाला वाटते का?
>>

नाही मी पहीले कामाला प्राधान्य देतो

मला नाही वाटत! इन्टरनेटचे बिल शक्य असूनही मी कंपनीला नाही लावत! कंपनीचे काम करून मग लेखन करतो. पण तरीही... कोणत्याही समाजाच्या नीतीमूल्यांनुसार.. मी कंपनीचा विश्वासघातच करत असतो ना?

नेटचे बिल हे नेट वापरले काय किंवा नाही वापरले काय आज प्ल्यान अनलिमिटेड असल्यामीळे तेवढेच बिल येणार.

बाकी लेख. एकदम मस्त आहे. बर्‍याच ठिकाणी संयम महत्वाचा वाटतो
देर आये दुरुस्त आये.
धन्यवाद

असं वरिजनल पायजे.....................जोरदार टाळ्या (सॉजन्य : नितीन बोरगे)

बाकी मूळ लेख नि मायबोली (कंपू) संर्दभातील मते मिक्स न होती तर आणखी जोरदार.
त्यामुळेच कदाचित लेख थोडा त्रोटक वाटतोय.

तुमच्या बेफिकिरीला __/\__

तुम्ही त्या स्त्रीला "अ" ठिकाणाहून "ब" ठिकाणी सोडलत आणि तुम्हाला तिच्याबद्दल शारिरिक आकर्षण निर्माण झालं या व्यतिरिक्त काहीही घडलं नाही. मग त्यात विवाहबाह्य (extra marital) काय आहे?

अशा प्रकारे विवाहित स्त्रीयांना पुरुषांविषयी आणि विवाहित पुरुषांना स्त्रीयांविषयी आकर्षण वाटणे शक्य आहे. तसं वाटल्यास तो काही लगेच विवाहबाह्य संबंध होत नाही.

बाकी अनेक मतं पटली.

!!

कनखर, काकुबाई, मुक्तेश्वर व संदिप,

मनापासून आभारी आहे.

मंदार,

मी त्या स्त्रीला "अ" ठिकाणाहून "ब" ठिकाणी सोडताना "य" प्रकार झाले जे तपशीलपुर्वक लिहीणार नाही असेही लेखात म्हंटले आहे व सूचकतेने लिहीलेलेही आहेत.

वाचन करताना 'काय लिहिलेले नाही आहे' याकडे अधिक लक्ष पुरवणे आवश्यक असते असे मला वाटते.

आपण दखल घेतलीत व प्रतिसाद दिलात याबद्दल मनापासून आभारी आहे.

प्रसादराव,

!! म्हणजे काय ते कृपयालिहावेत अशी विनंती!

धन्यवाद !

-'बेफिकीर'!

मंदार,

जे जे झालं ते सगळंच लिहीतील का ते? तूही जरा कल्पनाविलास कर की काय काय झाले असेल ह्याचा Lol

तू बेफिकीरांच्या जागी असतास तर काय काय केले असतेस त्याचाही विचार कर Light 1 मी तर करीत होतो बुवा!! अजून एक Light 1 Rofl

(भूषणजी : अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!!)

विजय Rofl

मंदार, शीर्षकात फक्त एक्स्ट्रॉ- मॅरिटल इतकेच लिहिलेय.... अफेअर किंवा संबंध असे कुठे आहे? अनैतिक विचार मनात येणे ह्याची फक्त प्रक्रिया इथे शब्दबद्ध केलेली आहे. चोरी करणे हा समाजात गुन्हा ठरतो ती चोरी सिद्ध झाल्यावर, पण तोवर तो चोर आपल्यातलाच एक बनून उजळ माथ्याने समाजात वावरत असतोच ना? त्याच चोराने, 'माझ्या मनात असा असा चोरीचा विचार आला होता' असे बोलून दाखवले, म्हणजेच कबूली दिली, तर आपण त्या माणसाला कुठले लेबल लावू? त्याच्याशी कसे वागू? हा विचार आपण करतो का कधी?

बेफिकीरजी.मला अजूनही समजलं नाही. असो. वाचनातील दोष असावा. >>> मंद्या, हरकत नसेल तर मी प्रयत्न करतो थोडक्यात,

लेखात "भुषणरांवांनी' मनाची 'गढुळ' अवस्था दाखवण्याचा प्रयत्न केला जे त्या प्रसंगात, स्त्रि वा पुरुष कुणाच्याही मनात तसे विचार येणे स्वभाविक आहे, जसं तु मान्य केलंच आहेस.

तेव्हा, काही काळासाठी का होइना मन "गढुळ" झालेलं असतं, जिवनसंगिनी (बायको) ला विसरुन क्षणिक सुखाकडे दुसर्‍याच 'ललनेने' आकर्षलेलं असतं. त्या वेळी जर 'मोका' भेटलाच आणि दोन्ही बाजुंनी स्विक्रुति असलीच.. तर, तु म्हणतोस तसा "विवाह बाह्य" संबध प्रस्थापित होण्यास क्षण ही लागणार नाही.

तर एकुण, 'मनाने' विवाह्बाह्य संबध व्हावा असा मनापासुन आग्रह धरलेला असतो. पण, 'दुर्दैव'.. शरिर एक होण्या आधीच ती वेळ निघुन गेलेली असते. आणि मन हळहळते अरेरे.. हात ची संधी गेली.

भुषणरावांनी तुला याला "विबासं" म्हट्ले तरी या शब्दापुढे "मनातुन" हा शब्द लावला असता तर लक्षात आलं असत. ( "विबासं-मनातुन" मनापासुन)

भुषणराव, समजण्यात "गल्लत" असल्यास
मोठ्यामनाने माफ करावे.

धन्यवाद!*

अगं साने तुझा प्रतिसाद पहीलाच नाही...तेव्हा मी माझा वरचा प्रतिसाद लिहत असेन्..,
पाहिला असता तर माझ्या प्रतिसादाची गरज नव्हती. इतके लिहले...आता बदलत नाही.

मंद्याला कळलं..! बघुन बरं वाटलं.

विदिपा Proud

हरकत नाही चातका.... तुझा समजवण्याचा दृष्टिकोन बर्‍यापैकी वेगळा आहे, त्यामुळे तुझा प्रतिसाद बदलूही नकोस! Happy
आणि मंद्याला कळलं की नाही/ पटलं की नाही, माहिती नाही... त्याच्या सुस्कार्‍याचे बरेच अर्थ असू शकतात, जे तो स्वतः विषद करत नाही, तोवर समजणार नाहीत Proud

त्याच्या सुस्कार्‍याचे बरेच अर्थ असू शकतात, जे तो स्वतः विषद करत नाही, तोवर समजणार नाहीत >>> असो..असो.. आता"तो" आणि "भुषणराव" बघुन घेतील. Happy

त्याच्या सुस्कार्‍याचे बरेच अर्थ असू शकतात, जे तो स्वतः विषद करत नाही, तोवर समजणार नाहीत >>> असो..असो.. आता"तो" आणि "भुषणराव" बघुन घेतील. >>> हम्म्म्म्म्म्म Proud

वा रे बेफिकिर, हे २४ पैकी १ प्रकरण आहे काय?
असूदे असूदे,
:बाकीच्या २३ प्रकरणांची (कल्पित का असेना) वाट पाहणारा बाहूला: Proud

सवाष्ण चारचौघांसमोर वागते तसा मी त्या फियाटमध्ये वागत होतो आणि वेश्या चारचौघांना वागवते तसा पाऊस लोकांना भिजवत होता.

Rofl

प्रतिसादात वापरलेली नैतिकता, चोरी ई ई विशेषणे ह्या विषयाच्या अनुषंगाने वादग्रस्त आणि सापेक्ष आहेत.

लिखाण छान आणि खुसखुशीत आहे.

लिहा की राव! मुळातल्या प्रवृत्तीला हा प्रश्न शोभत नाही.( तुमच्याकडुन तरी अश्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. :D)

माझ्या प्रवृत्तीला न शोभणारा नाही विचारला राव प्रश्न मी! अनेक प्रतिसाद मंदाररावांच्या सुस्कार्‍यावर आहेत हे पाहून मला वाटले की लेखापेक्षा सुस्कारे अधिक बरे वाटले असावेत. Lol

ऑर्फियस - Happy

मंदार रावांच्या निमित्ताने हे सर्वांनाच कळले असेल.ज्यांना हा प्रश्न पडला. ज्यांनी प्रतिसाद दिले, नाही दिले त्यांनाही.
पुढच्या लेखात असे प्रतिसाद देण्याची गरज लागणार नाही ! हा एक बाकी २३ साठी पुरेसा आहे.

(तसे कुणालाच नाही कळ्ले तरी आपल्याला काय..फरक पडतोय...आपण तर "बेफिकीर"!)

Pages