रेकी क्लासेस

मुंबईत रेकी क्लासेस कुठे आणि कोण घेतात याची माहिती हवी आहे? विशेषतः मुलुंड ठाणे परिसर.
या क्लासेसचा कुणाला वैयक्तिक अनुभव आहेत का? एका रेकी पुस्तकात वाचले होते की पुस्तक वाचून रेकी शिकता येत नाही त्याला रेकीमास्टरकडेच जावे लागते.. शिवाय बर्याच जणांकडून ऐकलेही आहे. हे खरं आहे का? खरतर बाजारात रेकी वर असंख्य पुस्तके आहेत. तसे नेटावर शोधाशोध केल्यावर बर्याच क्लासेसची माहिती मिळते पण ते कितपत व्यवस्थित शिकवतात, योग्य आहेत का याची खात्री नाही.

रेकी विषयी अजून ही काही माहिती असल्यास तीही कृपया ईथे सांगावी.

Submit to kanokani.com

नीलू, मी स्वतःच त्या कोर्सच्या शोधात आहे.
माझ्या रूमीने बँगलोरमध्ये ३ महीन्यांचा केला होता...

मुंबईमध्ये मी पण शोध घेतला पण इथे सगळ्या गोष्टींचे क्रॅश कोर्स करायची सवय असल्याने २ दिवसांचा कोर्स आहे अंधेरीमध्ये.. २ दिवस जेवण नाष्ता फ्री... १०००/- फक्त!
पण २ दिवसांत काय उरकणार मला शंकाच आहे. म्हणून नाही विचार केला. तसं पण मुंबईमध्ये हल्ली पैसा काढू मनोवृत्ती बोकाळली आहे, आणि सगळ्यांनाच पैशांच्या मोबदल्यात तेवढी क्वालिटी देता येत नाही. म्हणून नीट चौकशी करूनच पैसे गुंतवावेत कुठल्याही छंदवर्गात्/कोर्समध्ये! मी आहे चौकशीत, समजलं तर तुला नक्की कळवेन!

नीलू, माझ्या आईने कैक वर्षांपुर्वी कळव्याच्या 'शामल दुर्वे' यांच्याकडे रेकिच्या दोन पदव्या घेतल्या होत्या. पण आता त्याविषयी माहिती तिच्याकडून मिळणं अशक्य आहे. शामल दुर्वे, रेकीमास्टर, कळवा असं काही गूगल करून बघतेस का?

रेकी हा काय प्रकार असतो?? अ ओ, आता काय करायचं

रेखा काळे ९८२००४४२५४ /९८७००४४२५४ सायनला रहातात.
मी रेकी मास्टर आहे. हिच्याकडेच शिकलोय. माझ नाव सांग

नीलू...
ठाणे परिसरात एक आतुरालय नावाची संस्था आसा, तीचे संचालक श्री. चन्द्रशेखर (आडनाव विसारलय)... ते रेकी चे क्लासेस घेतत... रेकी सोबत शिव-स्वरोदय शास्त्र देखिल ते शिकवतत... चौकशी करुन बघ...

जयश्री फाटक ९८६९४६४९४६ / ९९२०१४७८०९, या ठाण्याला राहतात. त्या दादर येथेही शिकवतात पण ४-५ जण असतील तर.

'रिकी' (?) या प्रकारात दम नाही असे माझे स्पष्ट मत आहे.

'रिकी' (?) या प्रकारात दम नाही असे माझे स्पष्ट मत आहे.>> अनुमोदन. फेक सायन्स आहे ते.

नीलू माझ्या आईने केलाय ठाण्यात क्लास. मला वाटतं नवरंगे आडनाव आहे त्यांचं. आईला विचारून नंबर देते. तुला सुद्धा आईशी बोलायचं असेल तर येताजाता घरी चक्कर मार. आकृती आर्केडच्या समोरच राहते आई. संपर्कातून देते नंबर

मामीसा, असहमत स्मित

नीलूटाय माझी पण आय रेकी शिकलीये. अ‍ॅक्चुअली अतिरेकीच....

रेकी हे रीयल सायन्स आहे की नाही असा विषय आहे का या बाफ चा? नाही.. रेकीचे क्लासेस कुठे आहेत असा आहे!
वरील काही प्रतिक्रियानी मला वाटले बाफ ला चुकीचे शिर्षक दिले की काय. असो.

नवरंगे अ‍ॅक्युप्रेशर करतात ना? त्यांचा नंबर 9820190545

अश्विनी मामी आणि बेफिकीरजी
माझ पण तेच मत होत. एका मित्राने मला जबरदस्ती त्या सेशनला नेल आणि रेकीत इनिशिएट केल.
आता पुढे गेल्यावर मात्र माझे अनुभव वेगळे आहेत.

तुम्हाला जर काही त्रास झाला (उदा. writer's block) तर मला जरूर कळवा मलाही आवडत स्वतःची परीक्षा पहायला. gunmalshe@gmail.com हव असल्यास नंबरही कळवेन

कितीजणांच्या आयांनी रेकी क्लासेस केलेत इथे ! बहुतेक मुलांना वठणीवर आणत असतील रेकी देऊन दिवा घ्या स्मित

मी हे काही कुणी करताना पाहिलं नाहिये पण कुणा कुणाला अनुभव आलेले ऐकलेत. पण ते अनुभव, असलेल्या प्रॉब्लेममधून थोडा रिलिफ, इतके मर्यादित होते. कदाचित बरेच दिवस रेकी दिल्यावर जास्त गुण येत असेल.

कदाचित बरेच दिवस रेकी दिल्यावर जास्त गुण येत असेल>>>

हाहा

माझी एक मावसबहीण रिकी शिकवते. पण ती पुण्यात असते. आणि एक मावस काका ठाण्यात राहतो. पण त्याला काही रिकी येत नाही.

त्यामुळे हा माझा शेवटचा प्रतिसाद, मनस्मि १८ यांची व मूळ लेखिकेची माफी मागून!

रेकी म्हणजे काय यावर कोणीतरी जाणकाराने सविस्तर लेख टाकावा ही नम्र विनंती ....

( अवांतर : A 2008 systematic review of randomised clinical trials[4] concluded that "the evidence is insufficient to suggest that reiki is an effective treatment for any condition." ---- विकीपेडीया वरुन नाभार )

( बाकी वीकीपेडीया वरील एक चित्र पाहुन वाटले की रेकी हा ...आमच्या आवडत्या " डॉक्टर डॉक्टर " ह्या खेळाचा आधुनिक आवतार असावा खो खो )

अरेच्चा बर्याच प्रतिक्रिया आल्यात... माहिती मिळाली स्मित
माहिती देणार्‍या सर्वाचे मन:पूर्वक धन्यवाद.
प्रज्ञा आई अंजली मध्ये रहाते??
गुगु मी रेखा काळे याविषयी बरेच वाचलय. त्यांची ऑरकुटवर बरीच माहिती आहे. पण नक्की समजत नव्हते धन्यवाद!! पण पुस्तकातून रेकी शिकता येत नाही हे खरं आहे का?

>>>अ‍ॅक्चुअली अतिरेकीच.>> म्हणजे रे काय बाबु??
विवेकदा, मंजू तुम्ही सांगितलेले बघते.

अंजली नाही पूनम मधे.पिंपळसकर. नवरंगे अ‍ॅक्युप्रेशर की .. बरोबर. ते पण केलंय मातोश्रींनी. रेकी वाले कुणी वेगळे मग. विचारते तिला. ते पण ठाण्यातच केलंय.

नीलू
पुस्तकातून नाही शिकता येत काही गोष्टी या अनुभवायच्या असतात.
त्यात atunement म्हणून एक प्रकार असतो थोडक्यात दिक्षा घेण्याबद्दल जर ऐकल असशिल तर तसच काही.
गुरूनेच तुम्हाला atune कराव लागत.

भेट रेखाला चांगली शिक्षिका आहे.

नीलू
पुस्तकातून नाही शिकता येत काही गोष्टी या अनुभवायच्या असतात.
त्यात atunement म्हणून एक प्रकार असतो थोडक्यात दिक्षा घेण्याबद्दल जर ऐकल असशिल तर तसच काही.
गुरूनेच तुम्हाला atune कराव लागत.>>>> अनुमोदन
मी ही एक कोर्स केलेला आहे रेकीचा. स्मित
मला माझ्यापुरता तरी बराच फायदा झाला आहे.

येस निलु रेखा काळेना भेटच तू. तुला नंबर हवा असेल तर देते संपर्क्लातुन

मनिषा लिमये ही एक चांगली मुलगी (मुलगी????)आहे अस म्हटल्यामुळे ही रेखावर बेहद्द खुष आहे

मणिसा
मी दिलाय नंबर वर पहा. गेल्या आठवड्यात आपला बांबडूबाबा आजारी होता त्याच्यावर केला प्रयोग अजुन रीझल्ट मिळालेला नाही.

>>>>> रेकी विषयी अजून ही काही माहिती असल्यास तीही कृपया ईथे सांगावी. <<<<
या वाक्याला अनुसरुन पुढील पोस्ट केली असे

रेकी ही हिन्दू धर्मपद्धतीला नविन नाही.
मस्तकावर हात धरून आशिर्वाद देणे, अवघ्राण करणे, षडङ्गन्यास, आसनबंध इत्यादिक अनेक कृतिमध्ये दुसर्‍याकरता वा स्वतःकरता, हल्लीची आधुनिक "रेकीच" केली जाते असे माझे मत.
हाताचे तळवे एकमेकावर जोरात चोळून नन्तर ते अतिशय थोड्या अन्तरावर समान्तर ठेवुन एखाद सेन्टिमीटर जवळ दुर करत राहिले असता दोन्ही तळव्यान्ना "म्याग्नेटीक फिल्ड" आकर्षण स्पष्ट जाणवते व मधिल अन्तर मी स्वतः आठ इन्चान्पर्यन्त नेऊनही अतिशय तीव्र आकर्षणबन्धाचा (म्याग्नेटिक फिल्डचा) अनुभव घेतलेला आहे. या आकर्षणबन्धाला इश्वरीय अनुसन्धानातुन आत्यन्तिक इच्छाशक्तिद्वारे सुनिर्मितीची जोड देऊन अन्य व्यक्तिच्या शारिरिक दु:खावर त्या व्यक्तिच्या आन्तरिक चेतनाशक्तीस उद्दीपित करुन उपचार होऊ शकतो यात मला कसलीही शन्का नाही. (शन्का असेलच तर ती माझ्या व्यक्तिगत क्षमते बद्दल जरुर आहे.)
वरील वर्णन रेकीचे नाही, पण एका विद्याशाखेची मला ज्ञात असलेली थोडी अनुभूती आहे. कदाचित ती "रेकी" असेल वा तिस अजुन काही म्हणत असतील.
या रेकीबाबत अजुनहि शन्का असेल तर एक उदाहरण देतो, अर्थात हे उदाहरण कमि वयात जितक्या तिव्रतेने जाणवेल तितके वाढीव "बनचुक्या" व गेन्ड्याच्या कातडीच्या बनलेल्या जास्तवयाच्या व्यक्तिस अनुभवणे कठिण जाईल. कुणास आठवत असेल तर बघा, लहानपणी, शाळेत असताना वा कुठे, स्वतःचे बोट दोन भिवयान्च्या मधे एखाद सेन्टिमीतर अन्तरावर धरले असता कपाळामधे भुवयान्च्या मधे एक प्रकारची "हवीहवीशी" वाटणारी कळ म्हणा वा जाणिव म्हणा (सेन्सेशन?) निर्माण होत असे पण जी फार काळ सहन करता यायची नाही. स्वतःच्या बोटाने स्वत:वर वा अन्य व्यक्तीवर हा प्रयोग केला तरी जिच्या कपाळी बोट धरलय, तिला तोच अनुभव यायचा. माझ्या आठवणीप्रमाणे, मित्रामित्रान्मधे देखिल, काहीन्नी धरलेल्या बोटामुळे तीव्र सन्वेदना व्हायच्या तर काहीन्च्या बाबतीत नि:ष्क्रियता असायची. हा प्रयोग आत्ताही कोणीही करुन बघु शकते. माझ्या मते रेकी मधे बोट धरणार्‍या व्यक्तिच्या मधुन बाहेर पडणार्‍या कम्पन(?) लहरींचा योग्य सुदुपयोग करण्याचे योजिलेले असावे.
तरीही, माझ्या अल्प माहितीप्रमाणे, रेकी करण्यासाठी, व्यक्ति समोर हजरच पाहिजे असेही नाही. व्यक्तिस एकदा बघितले असता, वा तिचा फोटो बघुन, दूर अन्तरावरुनही रेकी करता येऊ शकते. अर्थात समोरासमोर कमी अन्तरावर व्यक्ति असता परिणाम जास्त तिव्रतेने मिळतिल यात शन्का नाही. तज्ञान्नी खुलासा केला तर बरे! स्मित

इथे प्रत्येक पोस्टच्या डाव्या वरच्या कोपर्‍या + व - चे चिन्ह दिसल्यावर मला पहिल्यान्दा वाटले की रेकी सन्दर्भात विद्युतधारेबद्दल ही चिन्हे दाखविताहेत की काय? फिदीफिदी मग कळले की हे तर व्होटिन्ग आहे! पोस्ट आवडली की नाही याबद्दलचे.
तर वाचकहो, वरील पोस्ट आवडली की नाही ते जरुर तिथे नोन्दवा.

लिंबुदा, ही चर्चा करण्याची अथवा मते नोंदवण्याची जागा नाही. परंतु, रेकी जर ईतकी 'पावरबाज' असेल तर अनेक आजारांवर प्रभावी उपचारपद्ध्ती म्हणुन का स्विकारली/वापरली जात नसावी?

>>> तर अनेक आजारांवर प्रभावी उपचारपद्ध्ती म्हणुन का स्विकारली/वापरली जात नसावी?
चान्गलाहे प्रश्न! स्मित
ही आत्ताही वापरली जाते, (केवळ रेकीबाबत, ही नव्यानेच नव्या नावाने आलेली शाखा आहे) पण शैक्षणीकदृष्टीने "सरकारमान्यता" नसल्यामुळे व विज्ञानवादी घटकान्चा आत्यन्तिक एकतर्फी विरोध असल्याने हीचा उघड प्रसार व्हावा तितका झाला नाहीये.
येवढेच नव्हे तर स्नायुन्चे दुखण्याबाबत विशिष्ट नसा दाबुन उपचार करणारे लयाला गेलेत. मान लचकली असता/उसण गेली असता अन्गठ्याचे नख विशिष्ट जागी दाबून व काखेतील एक आतवरील नस दाबुन मान धरणे हा प्रकार काही मिनिटात घालविणारा एक नाथपन्थिय उपासक "पानपट्टीवाला" होता लक्ष्मीरोडवर, मी स्वतः अनुभव घेतला आहे, पण हे सर्व लयाला गेले/जात आहे.
याव्यतिरिक्त ज्या "आत्मनिष्ठेने" व "शारिरिक-मानसिक शुचिर्भुततेने" ही उपचारपद्धती अम्मलात आणावयाची, तितकी शुचिर्भूतता पाळू शकणार्‍या प्रविण व्यक्तिच तयार न होणे हा सगळ्यात मोठा अडथळा आहे.
शिवाय, खात्रीशीर पैसा मिळविण्याचा "मार्ग" शिकण्याकडे कल असणारे बुद्धिमान, डॉक्टर इन्जिनिअर बनतील की असल्या उपायान्चे शिक्षण घेतिल? सबब हे शिकण्यास, सत्पात्र व्यक्ति न मिळणे हा एक मोठा अडथळा आहे.

गुगु.. ओह असं असतं का? धन्स माहिती बद्दल.. ठीक आहे रेखा़जींशी संपर्क करेन.

मने तू पण रेकी शिकलियस?? स्मित

>>माझ्या अल्प माहितीप्रमाणे, रेकी करण्यासाठी, व्यक्ति समोर हजरच पाहिजे असेही नाही. व्यक्तिस एकदा बघितले असता, वा तिचा फोटो बघुन, दूर अन्तरावरुनही रेकी करता येऊ शकते.>> हो हे मी पण बघितलय. माझी एक मावशी स्नायूदुखीने आजारी होती ती असा उपचार घेत होती. पण माहित नाही तिला त्याचा कितपत उपयोग झाला.

विशिष्ट नसा दाबुन उपचार करणे हे "अ‍ॅक्युप्रेशर" या शाखेत समाविष्ट आहे असे मला वाटते. असो. ईथे विषयांतर होईल. एक नविन धागा उघडुया आपण या चर्चेसाठी.

माझे वडील जेव्हा रेकी शिकले तेव्हा " हे मुंबईतल्या अती श्रीमंताचे एक फॅड आहे तुम्ही पाचशे रुपये अक्कलखाती जमा केले!! " अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. पण मग एक अनुभव आला व विश्वास बसला. मी रात्रपाळीला कामावर गेलो तर कळले की त्या दिवशी कारखान्यात अपघात झाला होता, एक इलेक्ट्रिकल इंजिनीयर मित्र बरेच भाजले होते. मग सकाळी माझी झोप झाल्यावर साडेअकरा बाराला त्यांना बघायला हॉस्पीटल मधे गेलो; वडील ही माझ्या बरोबर आले होते. माझे इंजिनीयर मित्र वेदनांनी तळमळत होते, २४ तास ते दोनही हाताची बोटे उघडू शकले नव्हते. रेकी उपचार हा काय प्रकार आहे याची थोडी कल्पना देउन वडिलांनी उपचार करून पाहुया का? असे विचारले. व उपचार सुरु केला माझ्या डोळ्यांसमोर १५ मिनीटांनी मित्रांनी आपली भाजलेली बोटे हलवली व हळू हळू उघडली. त्यांच्या चेहर्‍यावर वेदनांपासून आराम मिळाल्याचे जे भाव मी पाहिले त्या नंतर माझा विश्वास बसला. पुढे एक आठवडा वडील रोज त्यांना उपचार करायला जात होते व ८दिवसांनी हॉस्पीटल मधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी ही भाजल्याच्या जखमा एव्हड्या लवकर बर्‍या झाल्याबद्द्ल आश्चर्य मिश्रीत आनंद व्यक्त केला.
असे अनेक अनुभव नंतर आमच्या कुटुंबात घेतले लिहायला बसलो तर मोठा ग्रंथ होईल. अन्य उपचारांबरोबर एक पूरक उपचार म्हणून रेकी चा नक्कीच उपयोग होतो असे माझे अनुभवान्ती मत झाले आहे.

हा धागा मला माहीतच नव्हता. मी आपले आजच २ धागे याच विषयावर काढून बसलोय. शिवाय नेटावरही हुडकत बसलो होतो. असूदे. इथे चर्चा छान सुरु आहे. मला रेकीवरील मराठी पुस्तक हवे आहे.

रेकीमध्येही सात चक्रे व अवयव अ‍ॅक्टिवेशन ( की रिलॅक्सेशन) साठी आधी प्रोसेस करावी लागते, असे नेटवर मिळाले. म्हणजे आधी कपाळावर हात ठेऊन आज्ञा चक्र उद्दीपीत झाले अशी भावना जागृत करायची. मग क्रमाक्रमाने तळहात पायापर्यंत नेऊन मध्ये जाताना एकेका चक्रावर, अवयवावर उद्दीपनाचा थांबा घ्यायचा ३-४ मिनिटे प्रत्येकी.

आता यात बेसिक श्म्का आहे.. योगशास्त्रानुसार चक्रांचे उद्दीपन खालून वर मानले जाते. मग रेकीत उलट क्रम कसा काय? का रेकीचा क्रम बरोबर असावा.. कारण कुंडलिनी जागृतीलाही शक्तिपातच म्हटलेले आहे.. म्हनजे वरुन खालच्या चक्राप्र्यंत असाच त्याचाही अर्थ आहे.
लिंबुभाऊ खुलासा कराल का?

या धाग्यावर रेकीबाबत सर्वांगीण चर्चा सुरु राहिली तर उपयुक्त ठरेल

जामोप्या, चक्रांचे उद्दीपन हा महत्वाचा भाग झाला, ते कुठल्या क्रमाने होते हे माझ्या मते गौण आहे. मुळात चक्रांच्या जागा आणि आंतर्स्त्रावी ग्रंथी (Endocrine glands) यांचा फार जवळचा संबंध आहे. चक्र उद्दीपन करतो तेव्हा त्या ग्रंथींची कार्यक्षमता वाढवण्याचे कार्य केले जाते. (योगसनांमधे हेच केले जाते). माझ्या योगगुरुंनी चक्र उद्दीपन शिकवताना खालुन वर, वरुन खाली आणु पुन्हा वरुन खाली असा क्रम शिकवला होता.

रेकीबद्दल काही कल्पना नाही, योगशास्त्राचा उल्लेख केला म्हणुन ही पोस्ट! स्मित

धन्यवाद भ्रमर. क्रम गौण आहे/असू शकते हा मुद्दा ध्यानात आणून दिल्याबद्दल

अहो कागलकर, तुम्ही इथे ऑब्जेक्शन वर ऑब्जेक्शन कसे घेतलेले दिसत नाही? कदाचित तुमच्यावर मी केलेल्या रेकीचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय......... खो खो

साधारण तेरा एक वर्षांपूर्वी मला एक मुलगी फार आवडली होती.........तिला वश करण्यासाठी / ती "हो" म्हणावी म्हणून मी मला जे जे पर्याय सुचले ते ते सर्व करुन बघितले होते........... एकाही पर्यायाचा मला फायदा झाला नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून मी रेकी सुद्धा करुन पाहिली होती.... परिणाम असा झाला होता की ती मुलगी माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती नि मी दुसर्‍या मुलीचा पर्याय निवडला होता.... !! स्मित

वरील गोष्ट खरी आहे....... पाहिजे तर माझ्या बायकोला विचारा...... तिला सर्व ठाऊक आहे...... स्मित

कदाचित तुमच्यावर मी केलेल्या रेकीचा चांगलाच परिणाम झालेला दिसतोय.........

तुम्ही? आणि रेकी? अग्गोबाई, रेकणं आणि रेकी एकच असा गैरसमज झालेला दिस्तोय तुमचा!

मी रेकीबद्दल थोड फार सांगू शकते. त्याच्या अगोदार थोडिशी बॅकग्राउंड!

२००५ मध्ये मी माझ्या गुरुंकडून कुंडलीनी रेकी (Reiki Tummo) ची दिक्षा (Attunement) घेतली. त्या संस्थेची जाहीरात स्थानिक मंदिराच्या पत्रिकेत नेहमी यायची आणि कुतुहल वाटायच. कोर्स घ्यायचे बरेच प्रयत्न ह्या ना त्या कारणाने सफल होउ नाही शकले. माझी इच्छा तीव्र नसावी, वा committment नसावी वा योग नव्हता! (या वाक्यात खूप गर्भितार्थ आहे हे आत्ता कळत).
palm chakra, heart chakra, root chakra असे अगम्य शब्द त्या जाहिरातित असायचे आणि माझ्यातला scientist म्हणायचा हे काय तरी weird वाटतय. पण का कोण जाणे मन परत परत त्या जाहिरातीकडे वळायच. शेवटी २ वर्षांनी तो योग आला. Attunement झाली त्या दिवशी अंगाला अभूतपूर्व अशी खाज सुटली. बाकि काही खास अनुभव आला नाही. पण थेअरी ऐकून, प्रार्थना करून कुतुहल खूपच चाळवल गेल होत. गुरु इंडोनेशियन असल्याने त्यावेळी बहुतेक टिचर इंडोनेशियन होते. माझ्या टिचर च नाव होत रामा! दुसर्‍या दिवशी सुट्टी घेउन मेडिटेशन म्हणून एक वर्कशॉप होत ते घेतल. आणि खरी गंमत सुरु झाली. आगोदर आम्हाला त्या particular attunement बद्दल सांगितल कि दोन भुवयांच्या मध्ये जे आज्ञा चक्र आहे ते रुद्र गाठी मधे बांधलेल असत. ते चक्र acivate करायच्या अगोदर ती गाठ हळुवार पणे सोडवण महत्वाच असत. ते काम ही attunement करणार आहे. परत वाटायला लागल हे काय मंबो-जंबो चाललय्..अशी काय गाठ असते काय? X Ray मधे का दिसत नाही ती ..वगैरे वगैरे! छे उगाच सुट्टी आणि पैसे वाया घालवतोय आपण. मग Attunement सुरु झाली. ह्या particular attunement ची प्रार्थना इंडोनेशियन भाषेत असल्याने शब्द कळतच नव्हते मात्र मस्त म्युझिक चालू असल्याने एकदम रीलॅक्स झाले होते. थोड्या वेळाने भुवयांच्या मधे दुखायला लागल्..रादर गाठ सोडवताना जशी माईल्ड वेदना होइल तशी सुरु झाली आणि मग मी चक्क शांत झाले! अतिशय वेगळीच अनुभुती होती ती. त्यानंतर मी नियमीत self healing, grounding इ. प्रार्थना करायला लागले. पहिल्या-पहिल्यांदा फिजीकल अनुभवांनाच (हात गरम होण, पाठीत स्पंदन जाणवण, पाठ गरम होण, आज्ञा चक्र फिरण वगैरे) चिकटून रहायचे.
असो, रेकी हे फक्त निमित्त होत आणि सुरुवात होती! खरा अभ्यास नंतर चालू झाला आणि माझ्याबरोबरच संपेल.. Spiritual retreats नंतर खूप मस्त मस्त अनुभव आले आहेत. त्यांनाच धरून राहीले तर माझा प्रवास थांबेल. आणि अजून खूप पल्ला गाठायचा आहे. आता इथेच थांबते.

नमस्कार कल्पु, तुम्ही रेकी भारतात शिकलात का? मलाही शिकायची खुप इछा आहे. मी मुम्बईत १५ दिवस येणार आहे. तेवढे दिवस शिकायला पुरतात का?

परी७८:

मी भारतात नाही राहत हो. तेव्हा भारतातल्या कोर्सेस चे माहिती इतर मायबोलीकर देतील. मी सध्या शिकागोत राहते आणि रेकी शिकले तेव्हा कॅन्सस सिटीमधे होते.

मलाही माहिती हवी आहे. लिंबूटिंबूंचं मराठी अवजड वाटलं.