इथल्या माझ्याच बर्याच पोस्टी मीच उडवल्या होत्या २००९ मधे!
एक विचार असा की इत्क्या मोठ्या विश्वातील मोहोरीच्या दाण्यायेवढ्या पृथ्वीवर वावरत असलेल्या अब्जावधी जीवान्मधिल एक अमिबासमान मी, त्याने काय इकडुन तिकडे हलवले, केले तर त्यात विशेष ते काय? तरी पण..... रहावत नाही ना सान्गितल्याशिवाय, तर..;
मे २०१२ मधे आधीच ठरविल्याप्रमाणे मी लिम्बीच्या जमिनीवर जन्गलाशेजारी तम्बुवजा झोपडी उभारुन लिम्बीसहित आठ दिवस राहिलो अन जे काय केले त्याचे निवडक फोटो पुढे देत आहे.
१ हा इथे असा तम्बु उभारला होता
२ हे असे पावसाचे पाणी साठविण्याकरता सिमेण्टच्या रिकाम्या पोत्यात माती भरुन शेततळे करायचे काम सुरू केले.
३ शेवटच्या दिवशी म्हणजे १३ च्या रविवारी, लिम्बी अन थोरली काम करताना
४ दरम्यान, पेरणीची जागा "तरवं" ते भाजण्याचे हे काम
५ पोत्यात भरण्याकरता माती/मुरुम खणुन काढताना लिम्ब्या
६ आणि हे अंतिम दृष्य स्वरुप शेततळ्याचे
आकार साधारणतः १६' x १६' x ७.५'
दर घनफुटास २७.३०० लिटर पाणी म्हणजे, यात ५२,४१६ लिटर पाणी मावेल.
यामधे अजुन प्लॅस्टिक कागद अंथरायचा आहे. 
येत्या दोनएक वर्षात अशीच एकापुढे एक अशी चार पाच तळी तयार करता आली तर दीडदोन लाख लिटर पाणी सहज साठू शकेल, त्यामुळे शेतीची तसेच जवळील जन्गलातील वन्यप्राण्यान्ची पाण्याची सोय होईल.
एकुण ४५० रिकामी पोती वापरली, प्रत्येक पोत्यात ३ घमेली माती/मुरुम म्हणजे १३५० घमेली माती भरली, म्हणजेच तितकेवेळा ते घमेले पायावर नळगीच्या हाडावर आपटत्/घासत होते, शेवटी त्याला पोते बान्धावे लागले.
प्रत्येक पोते माती भरताना, भरल्यावर बाजुला ठेवणे, स्टेपल करणे, पुन्हा उचलुन जागेवर आणणे व भितीवर नीट रचणे असे किमान पाच वेळा हाताळले जायचे.
पोत्यान्च्या दोन ओळिन्च्या मधे भरलेले डबराचा घनफुटाचा हिशोब अजुन केला नाहीये.
सोमवार ७ मे ते रविवार १३ मे इतके दिवस सलग काम केले.
शेवटच्या दिवशी मुलिन्ची मदत झाली तर मधल्या दिड दिवसात कामावरील एका बाईची मदत झाली.
प्यायच्या पाण्याचि सोय अंदाजे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहीरीवरुन डोक्यावरुन हण्डेकळशीतुन पाणी वाहून आणुन करावी लागत होती.
सकाळ सन्ध्याकाळ एकेक कळशीभर पाणी प्यायले जात होते.
सकाळी साडेसहा/सात ते बारा आणि दुपारी ३ ते ५/६ वाजेस्तोवर काम करता यायचे.
दरम्यान एका दिवशी शुटिन्ग करत असता, पायाखालील फासेपारध्यान्नी सशाकरता लावलेल्या फाशातील टोकदार काडी पायात घुसल्याने झालेल्या जखमेमुळे धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्याकरता दुसर्या गावी जावे लागल्याने अर्धा दिवस वाया गेला.
पण एकुणात काम छान, भरपुर मनपसंद झाले.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करत, अर्थात लिम्बीच्या सहाय्याशिवाय असे काम होणे अशक्यच.
_____xXx______
July & August, 2012
तळे तर बनविले, पण पुढे काय? हे तळे "ट्रायल प्याच" म्हणूनच बनविले आहे, खरे तर तिथेच एक विहीर खोदायची आहे व सध्याच्या तळ्याच्या बाजुला दोनएक लाख लिटर पाणी साठविण्याची सोय करायची आहे.
तर यंदाच्या मोसमात, तळ्याकरता वापरलेल्या पोत्यान्वर उन्हाचा परिणाम काय झाला, आत अन्थरायचा कागद कसा अन्थरावा इत्यादी प्रात्यक्षिक करुन झाले.
उन्हाने पोती इतकी कुरचुक झाली की बोट लावले तरी फाटू लागली. शिवाय नाठाळ पोरे/लोक इत्यादीन्नी मारलेले ब्लेडचे काप देखिल प्रश्नचिन्ह उमटवुन गेले.
ऐनवेळेस योग्य प्लॅस्टिकची सोय करु न शकल्याने एक जुना ३०'X४०' आकाराचा भोके पडलेला कागद काही भोके बुजवायचा प्रयत्न करुन कसातरी अन्थरला, व उन्हाने रापलेल्या पोत्यान्ची तळ्याची आतली बाजुतरी सुरक्षित करुन घेतली. भोकामुळे पाणी साठून रहाणार नाही हे निश्चितच होते, पण येणार्या पाण्याचा प्रवाह संयमित करण्याचे, व वेळेस जास्तीचे जे काय पाणी साठले असेल ते ऐनवेळेस वापरण्याचे नियोजन होते. ते यशस्वी झाले. आत्ता घेतलेल्या धड्यातुन पुढील वर्षातील कार्यवाहीदेखिल निश्चित झाली आहे. हा अनुभव उपयोगी पडेलच.
४ ते ६ आगस्ट, २०१२ दरम्यान पाणी आत घेऊन, लावणी पूर्ण झाली, त्यावेळचे काही फोटो. लो क्वालिटी मोबाईलवरुन घेतल्याने तितकेसे चान्गले नाहीत पण कल्पना येण्यास पुरेसे आहेत.








सही आहे.
सही आहे. आजूबाजूला मस्त हिरवंगार दिसतंय. कुठे आहे तुझं सासर ? काय पिकवतात तिथे ?
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
श्रीमंत
श्रीमंत आहात तुम्ही लिंबुराव. हिरवी आई जवळ असल्यावर काय हवे अजून?
लिंबु, सही!
लिंबु, सही!
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस,
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर
काहि
काहि महिन्यापुर्वी, जुन्नरला गेलो होतो, तिथल्या दुकानात एकापेक्षा एक सुगंधी तांदूळ होते. दुकानदाराला सहज विचारले कि खास इथला कुठला, तर त्याने अभिमानाने सांगितले कि सगळे मावळ प्रांतातलेच आहेत.
आता अगदी नावाने लिंबीचा तांदूळ मागायला हवा.
लिंबु,
लिंबु, अंबेमोहोरची लावणी करणार का? औन्दा भात चांगला आला तर आम्हाला कळवा राव! आम्हाला अंबेमोहोर बासमतीपेक्षा जास्त आवडतो!! आणि तो तुम्ही पिकवला असेल तर सोन्यहून पिवळे!!!
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस,
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर
प्रत्येक
प्रत्येक वेळी असं काही वाचलं की मला आयटी वगैरे सोडून लांब शांत ठीकाणी जाऊन असं जीवन चालू करायचा झटका येतो. तुमच्या या लेखामुळे परत तसा एक झटका आला आहे. आता २-३ दिवस या मोड मधे आणि मग परत नॉर्मल - असा दुसरा लेख वाचेपर्यंत !
तुम्हाला खूप शुभेच्छा आंबेमोहोरासाठी ! फोटो मस्त.
लिंबुराव ,
लिंबुराव , तुम आगे बढो, हम "आंबेमोहोर भात" खानेवाले तुम्हारे साथ है!!

भात खाणार्या आणि खिलवणार्याच्या पाठीशी (हाताशी ..!) देव नेहमी उभा असतो ..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
आमेन!
आमेन!
लिम्बु शेठ
लिम्बु शेठ फोटो छान.
हि दोनच शेतं आहेत का?????????
पुढच्या वर्षी आंबेमोहोरची मेजवानी आहे तर आम्हाला.
.............................................................
लिंबुदा
लिंबुदा सर्वांशी सहमत,
आंबेमोहरचि मेजवानि घ्यायला नक्की येऊ.
शेतजमीन
शेतजमीन जंगलाच्या आत असल्यासारखीच दिसत आहे. झोपडे बांधून राहता आले तर काय तूपात गुळ/साखर!
पुढील सर्व उपक्रमांना मनापासून शुभेच्छा!
पण अजून काही बांधायच्या आत चांगले कुंपण वगेरे घालून प्राणिमित्रांचा बंदोबस्त केलेला बरा. आंबेमोहोराची सळी नजरेसमोर लवलवत आहे आताच
भातलावणीन
भातलावणीनन्तरचे फोटू वर टाकलेत!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
सध्या
सध्या पाण्याची कमतरता आहे तर तोपर्यंत लिम्बाची लागवड करून टाक!:)_________________________
-A hand that erases past can create a new begining.
लिंबू,
लिंबू, इकडे मायबोलीवर 'आंबेमोहोर' विकणार असशील तर माझा नंबर नक्की.
स्वप्नं
स्वप्नं पूर्ण होईल लिंबू ... शुभेच्छा आहेत.
भरपूर पीक येऊ द्या रं द्येवा
लिम्बुटिम
लिम्बुटिम्बु तुम्हाला सांगु का आत्ता कुठतरी रानात जाउन रहावं वाटतय बघा !!!
वाढलेली
वाढलेली लोंबी गोड दिस्त्येय.
वा छान
वा छान
लिंबुदा,
लिंबुदा, मस्तच आहेत हिरवीगार शेते. कुठे आहेत तेही सांगा ना. आम्ही पण येवु.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस,
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर
लिंब्या भो
लिंब्या भो इथे मला काळी चौकट का दिसतीये त्या फोटोत

अन शेजारी असल्यामुळे थोडा अंबेमोहोर मिळेलच आम्हाला, हो की नाही ??
-----------------------------------------
सह्हीच !
लिंबुभौ..
लिंबुभौ.. भारी शेतं आहेत तुमची...वर त्यात आंबेमोहोर पिकवता.. हेवा वाटतोय
कधी कधी शहरीकरणाचा एवढा कंटाळा येतो .. कुठंतरी लांब हिरवाई असेल तिथे जावेसे वाटतं.. मग कोणत्यातरी बोटॅनिकल गार्डनला जाऊन अशी तहान भागवुन घेतो.. आणि तिथे गेल्यावर काय वाचतो पाट्या "इथे हात लावु नका" "या शेतात शिरु नका" .. नुसतं लांब राहुन.. कपड्याची घडी न मोडता शेतात जाऊन येतो.. धत.. या 'चेंज' ला काय अर्थ आहे ?
म्हणुनच तुमचा हेवा वाटतो.. की तुम्हाला स्वतःचे शेत असल्यामुळे रुटीनमधुन खरोखरचा बदल मिळत असेल. शेवटी शेती करायची म्हणजे भांडवल, मनुष्यबळ, निसर्गाची कृपा या गोष्टीपण आल्याच.. तिकडे दुर्लक्ष करुन पण नाही चालणार... या सगळ्या गोष्टी जमवता जमवात तोंडाला फेस आणतातच की. ... नाहीतर शेतकर्यांनी आत्महत्या कशाला केल्या असत्या...
पण मनुष्यस्वभावच आहे ना की, जे नाहीये त्याचे अप्रुप जास्त असते'... असो तुमच्या आंबेमोहराच्या गिर्हाईकांच्या यादीत माझं पण नाव लिहा बरका आठवणीने... (त्यासाठी माझं नाव तुम्हाला माहित पाहिजे आणि मी कोणाला ऑर्डर दिली त्या 'शेतकर्याचे' नाव आम्हाला माहित पाहिजे ना ;-))
बाय द वे... आंबेमोहर ५७ हे वाण मिळतं का हो आजकाल ?
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस,
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर
लिम्बु भाउ
लिम्बु भाउ आपल भी झकास वावर हाय गोळेगाव, तालुका खुल्ताबाद, जिल्हा औरंगाबाद ला. आपल्या कड भी आंब्याची बाग हाय ३ वर्स ची, तुम्हाला पाहिजे असतील तर घेवुन जा १०० आंब्याची रोप, आहेत मझ्याकड.
सागर आढाव
लिंब्या
लिंब्या सही रे. शेताच्या कडेला आंबा लाव चारी बाजुने. कुठल्या गावाजवळ आहे शेत?
लिंबूभौ.. म
लिंबूभौ..
मस्त हो! कधी देणार आम्हाला घरच्या तांदुळाचा मासला!
needhapaa
needhapaa
-----------------------------------------
सह्हीच !
>>सर्व गाव
>>सर्व गाव विरुद्ध मताचे असताना, म्हणजे तिथे काय उगवणार? पक्षी खाऊन टाकतील, रानडुकरे पीक आडवे करतील वगैरे असन्ख्य नकारात्मक बयादी समोर असतानाही लिम्बीच्या बाबान्नी इर्ष्येने शेत पिकवले!
हे वाचून "नातीगोती" आठवला.
असो. आमच्याकडून अनेकानेक शुभेच्छा. फोटो छान आहेत.
-योगेश
Pages