लिम्बीच शेत आणि बन्धार्‍याच पाणी

Submitted by limbutimbu on 25 June, 2008 - 07:15

इथल्या माझ्याच बर्‍याच पोस्टी मीच उडवल्या होत्या २००९ मधे!
एक विचार असा की इत्क्या मोठ्या विश्वातील मोहोरीच्या दाण्यायेवढ्या पृथ्वीवर वावरत असलेल्या अब्जावधी जीवान्मधिल एक अमिबासमान मी, त्याने काय इकडुन तिकडे हलवले, केले तर त्यात विशेष ते काय? तरी पण..... रहावत नाही ना सान्गितल्याशिवाय, तर..;
मे २०१२ मधे आधीच ठरविल्याप्रमाणे मी लिम्बीच्या जमिनीवर जन्गलाशेजारी तम्बुवजा झोपडी उभारुन लिम्बीसहित आठ दिवस राहिलो अन जे काय केले त्याचे निवडक फोटो पुढे देत आहे.

१ हा इथे असा तम्बु उभारला होता
Photo0424.jpg

२ हे असे पावसाचे पाणी साठविण्याकरता सिमेण्टच्या रिकाम्या पोत्यात माती भरुन शेततळे करायचे काम सुरू केले.
Photo0434.jpg

३ शेवटच्या दिवशी म्हणजे १३ च्या रविवारी, लिम्बी अन थोरली काम करताना
Photo0446.jpg

४ दरम्यान, पेरणीची जागा "तरवं" ते भाजण्याचे हे काम
Photo0436.jpg

५ पोत्यात भरण्याकरता माती/मुरुम खणुन काढताना लिम्ब्या
vlcsnap-128434.jpg

६ आणि हे अंतिम दृष्य स्वरुप शेततळ्याचे
vlcsnap-44789.jpg

आकार साधारणतः १६' x १६' x ७.५'
दर घनफुटास २७.३०० लिटर पाणी म्हणजे, यात ५२,४१६ लिटर पाणी मावेल.
यामधे अजुन प्लॅस्टिक कागद अंथरायचा आहे. Happy
येत्या दोनएक वर्षात अशीच एकापुढे एक अशी चार पाच तळी तयार करता आली तर दीडदोन लाख लिटर पाणी सहज साठू शकेल, त्यामुळे शेतीची तसेच जवळील जन्गलातील वन्यप्राण्यान्ची पाण्याची सोय होईल.
एकुण ४५० रिकामी पोती वापरली, प्रत्येक पोत्यात ३ घमेली माती/मुरुम म्हणजे १३५० घमेली माती भरली, म्हणजेच तितकेवेळा ते घमेले पायावर नळगीच्या हाडावर आपटत्/घासत होते, शेवटी त्याला पोते बान्धावे लागले.
प्रत्येक पोते माती भरताना, भरल्यावर बाजुला ठेवणे, स्टेपल करणे, पुन्हा उचलुन जागेवर आणणे व भितीवर नीट रचणे असे किमान पाच वेळा हाताळले जायचे.
पोत्यान्च्या दोन ओळिन्च्या मधे भरलेले डबराचा घनफुटाचा हिशोब अजुन केला नाहीये.
सोमवार ७ मे ते रविवार १३ मे इतके दिवस सलग काम केले.
शेवटच्या दिवशी मुलिन्ची मदत झाली तर मधल्या दिड दिवसात कामावरील एका बाईची मदत झाली.
प्यायच्या पाण्याचि सोय अंदाजे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहीरीवरुन डोक्यावरुन हण्डेकळशीतुन पाणी वाहून आणुन करावी लागत होती.
सकाळ सन्ध्याकाळ एकेक कळशीभर पाणी प्यायले जात होते.
सकाळी साडेसहा/सात ते बारा आणि दुपारी ३ ते ५/६ वाजेस्तोवर काम करता यायचे.
दरम्यान एका दिवशी शुटिन्ग करत असता, पायाखालील फासेपारध्यान्नी सशाकरता लावलेल्या फाशातील टोकदार काडी पायात घुसल्याने झालेल्या जखमेमुळे धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्याकरता दुसर्‍या गावी जावे लागल्याने अर्धा दिवस वाया गेला.
पण एकुणात काम छान, भरपुर मनपसंद झाले.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करत, अर्थात लिम्बीच्या सहाय्याशिवाय असे काम होणे अशक्यच.

_____xXx______

July & August, 2012
तळे तर बनविले, पण पुढे काय? हे तळे "ट्रायल प्याच" म्हणूनच बनविले आहे, खरे तर तिथेच एक विहीर खोदायची आहे व सध्याच्या तळ्याच्या बाजुला दोनएक लाख लिटर पाणी साठविण्याची सोय करायची आहे.
तर यंदाच्या मोसमात, तळ्याकरता वापरलेल्या पोत्यान्वर उन्हाचा परिणाम काय झाला, आत अन्थरायचा कागद कसा अन्थरावा इत्यादी प्रात्यक्षिक करुन झाले.
उन्हाने पोती इतकी कुरचुक झाली की बोट लावले तरी फाटू लागली. शिवाय नाठाळ पोरे/लोक इत्यादीन्नी मारलेले ब्लेडचे काप देखिल प्रश्नचिन्ह उमटवुन गेले.
ऐनवेळेस योग्य प्लॅस्टिकची सोय करु न शकल्याने एक जुना ३०'X४०' आकाराचा भोके पडलेला कागद काही भोके बुजवायचा प्रयत्न करुन कसातरी अन्थरला, व उन्हाने रापलेल्या पोत्यान्ची तळ्याची आतली बाजुतरी सुरक्षित करुन घेतली. भोकामुळे पाणी साठून रहाणार नाही हे निश्चितच होते, पण येणार्‍या पाण्याचा प्रवाह संयमित करण्याचे, व वेळेस जास्तीचे जे काय पाणी साठले असेल ते ऐनवेळेस वापरण्याचे नियोजन होते. ते यशस्वी झाले. आत्ता घेतलेल्या धड्यातुन पुढील वर्षातील कार्यवाहीदेखिल निश्चित झाली आहे. हा अनुभव उपयोगी पडेलच.
४ ते ६ आगस्ट, २०१२ दरम्यान पाणी आत घेऊन, लावणी पूर्ण झाली, त्यावेळचे काही फोटो. लो क्वालिटी मोबाईलवरुन घेतल्याने तितकेसे चान्गले नाहीत पण कल्पना येण्यास पुरेसे आहेत.
Photo0174.jpgPhoto0180.jpgPhoto0182.jpgPhoto0184.jpgPhoto0187.jpgPhoto0189.jpgPhoto0207.jpgPhoto0210.jpgPhoto0185.jpg

गुलमोहर: 

जबर्दस्त चिकाटी आणि मेहनत करणार असाल तर काहीही शक्य आहे याच उदाहरण दिलत तुम्ही !!

सलाम तुम्हाला !!

लिंबु अभिनंदन..... आता पुढच शेततळ सरकारी योजनेतुन करा. तळ्यात घालायच्या कागदाला पण ७५% अनुदान आलय. बरोबर ठिबक सिंचनाला पण अनुदान मिळेल.

वा! मस्तच!
उन्हाळ्यातला तळे बांधतानाचा रखरखीतपणा आणि आताचे हिरवे फोटो. एकदम कॉन्ट्रास्ट.
पिकाला शुभेच्छा!

पर्यावरणावर लेख, भाषणे व गीते लिहिणार्‍यांचि तोबा गर्दी आहे ; पण पर्यावरणासाठी (तसा डांगोरा न पिटता) खरोखरच कांही करणार्‍यांची मात्र मोठीच उणिव आहे. आपल्या आपल्या उपलब्ध साधनसामुग्रितही कल्पकता,चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर काय काय करता येतं त्याचं उदाहरणच समोर ठेवलय तुम्ही! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
लिंबुभौ,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दंडवत !

सुंदर फोटो.
वर कुणी तरी म्हटल्याप्रमाणे, असं काही वाचलं की आयटी सोडून कुठे तरी लांब शांत ठिकाणी जाऊन राहावंसं वाटतं.
असो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

limbutimbu, खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांच, कारण हे खूप मेहनतीच काम आहे.
जिद्दीने एवढ सर्व हिरव विश्व उभ केलत.
तुमच हे काम प्रेरणादायी आहे. Happy

पर्यावरणावर लेख, भाषणे व गीते लिहिणार्‍यांचि तोबा गर्दी आहे ; पण पर्यावरणासाठी (तसा डांगोरा न पिटता) खरोखरच कांही करणार्‍यांची मात्र मोठीच उणिव आहे. आपल्या आपल्या उपलब्ध साधनसामुग्रितही कल्पकता,चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर काय काय करता येतं त्याचं उदाहरणच समोर ठेवलय तुम्ही! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
लिंबुभौ,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दंडवत !>>>>>>> अनुमोदन

धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर' >>>>हे कशाबद्दल आय थिन्क् द पोस्ट ईज वर्थ मिलियन्स.

लिंबुदा.. हॅट्स ऑफ! Happy
शहरातल्या लोकांना शेतीची/कष्टाची कामं जमत नाही म्हणतात तुम्ही हे खोटं ठरवलत. अगदी शेतात तंबु ठोकुन तुम्ही स्वतः आणि लिंबिवहिनींनी मेहनत केल्याचं दिसत आहे. तुमच्या चिकाटीला सलाम!
पुढच्या वेळेस आम्हाला बोलवा. माबोची फौज तयार करु तुमच्या शेततळ्याच्या निर्मितीला आणि लावणी/ कापणीला.

छान ... नाला बंडिंग म्हणुन एक प्रकार असतो.. इयत्ता सातवीच्या विज्ञान पुस्तकात वाचणे किंवा गुगळून पाहणे. तो तुम्हाला उपयोगी पडेल का?

DSCN0196-2.JPG
वरील फोटो लिम्बीच्या शेतातील भाताच्या ओम्बीचा आहे.
हा इथे देण्यामागे विशेष कारणे, ती म्हणजे,
१) नुकताच महिन्यापूर्वी मित्राने मला निकॉन चा कूलपिक्स हा कॅमेरा भेट म्हणून दिला, पण मला त्यातुन नीटसे फोटो काढता येत नव्हते, परवा शनिवारी अन रविवारी लिम्बीच्या शेतावर गेलो असता निरनिराळी गवतफुले, भातपिके वगैरेचे फोटो काढण्याचे प्रयोग करताना हा असाही एक फोटो घेता आला, त्या आनन्दाप्रीत्यर्थ इथे टाकला
२) ही भाताची ओम्बी आहेच, पण एरवी बघायला न मिळणारे भाताचे पूंकेसर व स्त्रीकेसर स्पःष्टपणे दिसत आहेत. ते बघितल्यावर मी देखिल आश्चर्य चकित झालो होतो.
अजुन बरेच फोटो आहेत, पण वेळ मिळाल्यावर वेगळ्या धाग्यावर टाकीन. Happy
[फोटोच्या साईझच्या बन्धनामुळे क्वालिटी मार खात्ये Sad अन इतरत्र अपलोड करुन इथे लिन्का देणे मला शक्य नाही असो]

शेतकर्‍यान्च्या आत्महत्यामागे "कर्ज", "कर्जाचा अनावश्यक खर्च/विनियोग", "कमजोर मानसिक स्थिती", "व्यसने" वगैरे कारणे सरकारदरबारातुन व इतर ठिकाणी बोलली जातात, पण शेती करताना प्रत्यक्षात काय परिस्थिती असते, किती व कशा कशा प्रकारची नाडवणूक होते, ते स्वतः अनुभवुन बघतो आहे. यथावकाश त्या आत्यन्तिक प्रतिकुल परिस्थितीबद्दल लिहीनच, पण सध्या इतकेच सान्गतो, आजुबाजुच्या समाजाचा देखिल प्रतिकुल परिस्थिती बनविण्यामागे "भरीव हातभार" असतो. अन्यथा लावलेल्या पिकात गुरे चारण्याचा अगोचर पणा हाच समाज न करता. अन आता तर "सुधारित" अन्निस वाल्यामुळे वगैरे "देवराया" तोडून पाप लागत नाही हा समज / धारणा पक्की होत चालल्यामुळे त्यान्च्यावर देखिल सर्रास धाड पडते, तिथे लिम्बिच्या शेताची काय तमा? असो.

लिम्बु
फारच सुंदर आणि स्पष्ट फोटो, मस्त, धंन्यवाद

फोटोचा साईज अ‍ॅडजस्ट करायला इर्फान व्ह्यू वापरून पहा. क्वालीटी न बिघडवता बर्‍यापेकी साईज कमी करता येतो.

सुधीर

लिम्बु, कष्ट तिथे फळ हे अगदी प्रत्यक्षात उतरंवलंत. सलाम तुमच्या मेहनतीला..
रच्याकने, ओंबीमधले केसर कधीच एवढे स्पष्ट पाहिले नव्हते. प्रचि खुप छान आहे.. Happy

Pages