आपलाच बोन्साय !!

Submitted by manya_joshi on 21 June, 2008 - 10:27

ग्लोबलायझेशनच्या नादात
जग झाले छोटे,
माणसं लाख जवळ आली
पण माणूसकी कोठे ?

SMS, Email च्या वापरात
शब्द झाले छोटे,
भावना लाख मनी दाटल्या
व्यक्त कराल कोठे ?

फास्टफूडच्या जमान्यात
फूड झाले छोटे,
पोट लाख भरत असेल
त्यात सत्व कोठे ?

फास्ट प्रॉडक्शनच्या जगात
हस्तकौशल्य थिटे,
व्हॉल्यूम लाख वाढला असेल
त्यात नजाकत कोठे ?

डेलीसोपच्या युगात
स्लॉट झाले छोटे,
मनोरंजन लाख होत असेल
त्यात डेफ्थ कोठे ?

झकास!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

ग्लोबलायझेशनच्या नादात
जग झाले छोटे,
माणसं लाख जवळ आली
पण कुटुंब मात्र छोटेच....( हे आपल उगाच हं Happy )

वा!
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"

वा रे वा! मस्तच जमलिये, अगदी अचूक! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

ग्लोबलायझेशनच्या नादात
जग झाले छोटे,
माणसं लाख जवळ आली
पण माणूसकी कोठे ?

वा..! जोशी.. छान जमली कविता.

आशु... कुलदीप.... लिंबुटिंबु.... सुभाष... चिनु....
माझ्या छोट्या मोठ्या प्रयत्नांना खतपाणी घातल्याबद्दल आनंद वाटला.
आपल्या प्रतिसादाबद्द्ल मन:पूर्वक धन्यवाद !!!

मन्या तुमको मान्या

मस्त लिहीलय

सुधीर

मनोरंजन लाख होत असेल
त्यात डेफ्थ कोठे ? --> मस्त रे... काहीच्या काही नक्कीच नाही. सुरेख. नावातच सर्व आहे.

जो... येडाकीखुळा... गोदेय.... सत्यजीत.....
प्रतीसादाबद्द्ल आनंद वाट्ला. आभारी आहे.