या वादात कुणीही ’कधीही’ पडू नये!

Submitted by लसावि on 21 February, 2011 - 05:15

त्यालाच प्रतिक्रिया का येती, आणि मला का येऊ नये
या वादात कुणीही ’कधीही’ पडू नये!

त्याचा असेल कुठला तरी कंपू, आणि माझे मात्र फॅन
दुसर्‍याची पाठ खाजवताना ही वल्गना करु नये!

उठसूठ जे टाकतात पोस्टी-गोष्टी
असंबद्धतेचे मायबोली अवॉर्ड त्यांना का देऊ नये?

देती वेदांचे दाखले छेडछाडीच्या समर्थना
खरे ’नतद्रष्ट’ त्यांनाच का म्हणू नये?

गेले समोरच्या गल्लीत तरी येई प्रवासवर्णन
बंदी तयांच्या फ़िरण्यावर का घालू नये!

थकलो वाचून बेताल वादांची मांदिआळी
शुद्ध ’आगाऊ’पणा त्याच्या विरोधा का करु नये?

आगावा, मस्त आहे. Rofl Biggrin Biggrin Biggrin

शीर्षक वाचून टाळून पुढे चालले होते. कोणत्या चक्कीवरचं दळण आहे ते पहावं म्हणून बघितलं तर साक्षात आपण.... म्हटल्यावर वाचलं. Happy

जास्त लिहित नाही. मी आता खाली कोथंबीर आणायला चाललीये. आल्यावर प्रवासवर्णन आणि फोटो टाकतेच. Proud

Proud

मामी, कोथिंबरिचे वडे करुन त्याचे फोटो टाकले तरी चालतील, म्हंजे प्रवासवर्णन आणि पाककृती एकदम Proud

हा हा!

बेफिकीर यांची गझल (?) हे मुळातच गझलेचे विडंबन असते वाईझमॅन Lol

आगाऊ निश्चीतच विडंबनाचे विडंबन करणार नाहीत.

कडक

Pages